Maharashtra Breaking News Updates Today:
25 Mar 2026 10:45 AM (IST)
Iran’s Threat To Donald Trump : वॉशिंग्टन/तेहरान : पश्चिम आशियातील तणाव आता नियंत्रणाबाहेर गेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतरही इस्रायलचे इराणवर तीव्र हल्ले सुरुच आहेत. यामुळे इराण चवताळला असून त्यांनी ट्रम्प यांचा 5 दिवसांचा युद्धविराम नाकारला आहे. तसेच अमेरिकेने पाठवलेल्या 15 कलमी प्रस्तावलाही नकार दिला आहे. इराणने थेट डोनाल्ड ट्रम्प यांना युद्धाची अंतिम चिथावणी दिली आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ स्पष्ट केले आहे.
25 Mar 2026 10:35 AM (IST)
Donald Trump Iran War Victory Claim : जागतिक राजकारणात आज एक मोठा भूकंप झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-अमेरिका संघर्षात (US-Israel Iran War) आता अमेरिकेने आपला विजय जाहीर केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका जाहीर कार्यक्रमात स्पष्ट केले की, इराण आता लष्करीदृष्ट्या पूर्णपणे संपला आहे. गृह सुरक्षा सचिवांच्या शपथविधी सोहळ्यात बोलताना ट्रम्प यांनी जे विधान केले, त्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. “आम्ही हे युद्ध जिंकलो आहोत,” या ट्रम्प यांच्या वाक्याने मध्य-पूर्वेतील युद्धाचे चित्रच बदलून टाकले आहे.
25 Mar 2026 10:25 AM (IST)
गेममध्ये सध्या बाइंड योर अकाऊंट ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना व्हॅम्पायर बॅकपॅक आणि 999 गोल्ड मोफत जिंकण्याची संधी मिळणार आहे. हे दोन्ही रिवॉर्ड्स टास्क पूर्ण प्लेअर्स क्लेम करू शकणार आहेत. गरेनाचं असं म्हणणं आहे की, या प्रकारच्या ईव्हेंटमध्ये डायमंड्सची बचत होते आणि प्लेअर्स विविध रिवॉर्ड्स क्लेम करू शकतात.
25 Mar 2026 10:15 AM (IST)
बटाटा त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर मानला जातो. यामध्ये असलेले नैसर्गिक गुणकारी घटक त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करते. चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग किंवा पिंपल्स कमी करण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या रसाचा वापर करू शकता. यामध्ये असलेले विटामिन सी, अँटिऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक त्वचा उजळदार करण्यास मदत करतात. त्वचेचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर करावा. यामध्ये असलेले नैसर्गिक एन्झाइम्स आणि स्टार्च त्वचेला आतून थंडावा देतात. उन्हामुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ, लालसरपणा आणि रॅश कमी करण्यासाठी बटाट्याचा रस अतिशय प्रभावी ठरतो. यामध्ये असलेले नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यास मदत करते.
25 Mar 2026 10:05 AM (IST)
PCMC Budget 2026-27: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या ९३२२.१७ कोटी रुपयांच्या मूळ अर्थसंकल्पात स्थायी समितीने ४१४.२२ कोटी रुपयांची महत्त्वपूर्ण वाढ सुचविली आहे. जुन्या कामांसाठी १३०० कोटी आणि नवीन कामांसाठी २०० कोटींची तरतूद असलेला हा अर्थसंकल्प आता महापालिका सभेकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन यामध्ये आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प शहराच्या सर्वांगीण विकासाचा दावा करत असला, तरी धकीत ६२२ कोटींचा मालमत्ता कर वसूल करणे आणि वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे.
25 Mar 2026 09:51 AM (IST)
पुणे : पुणे येथील नवले पुलावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सुमारे 6 हजार कोटी रुपयांचा एलिव्हेटेड रोड प्रकल्प केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत सांगितले. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी नवले पुलावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांबाबत तसेच ते रोखण्याबाबत सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत, याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. संबंधित राष्ट्रीय महामार्गाचा सुमारे पाच ते सहा किलोमीटरचा भाग तांत्रिकदृष्ट्या संवेदनशील आहे. रस्त्याचा उतार अत्यंत तीव्र नसला तरी ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱ्या जड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण आहे. पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून एलिव्हेटेड रोड उभारणे आवश्यक आहे, असे कदम म्हणाले.
25 Mar 2026 09:35 AM (IST)
अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात याच्याशी असलेल्या कथित संबंधांमुळे रुपाली चाकणकर यांना आधीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, आता त्यांच्या राजकीय कारकिर्दीला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पक्षांतर्गत नाराजी आणि उचलबांगडीचे संकेत रुपाली चाकणकर यांच्याकडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) महिला प्रदेशाध्यक्षपद आहे. मात्र, खरात प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा डागाळल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला संघटनेतूनच चाकणकर यांच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. "अशा प्रकरणांमुळे पक्षाला जनतेसमोर जाणे कठीण होत आहे," अशी भूमिका अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
25 Mar 2026 09:30 AM (IST)
मुंबई: क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत लीग असलेल्या आयपीएलमध्ये दोन दिग्गज संघांच्या मालकीमध्ये मोठे बदल झाले आहेत. राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी या दोन्ही संघांना आता जागतिक स्तरावरील मोठे उद्योजक आणि कंपन्यांनी विकत घेतले आहे. राजस्थान रॉयल्स (RR): अमेरिकन उद्योजकाचा ताबा राजस्थान रॉयल्स या संघाची विक्री पूर्ण झाली असून, अमेरिकन उद्योजक कल सोमानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाने हा संघ विकत घेतला आहे. १.६३ अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे १५,२८६ कोटी रुपये) इतकी आहे. या व्यवहारामुळे राजस्थान रॉयल्स ही आता आयपीएलमधील अत्यंत मौल्यवान फ्रँचायझी बनली आहे.
25 Mar 2026 09:25 AM (IST)
नाशिक: अंधश्रद्धेचा बाजार मांडून अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या 'कॅप्टन' अशोक खरातला नाशिक सत्र न्यायालयाने २९ मार्चपर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. २४ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालेली धक्कादायक माहिती न्यायालयासमोर मांडली.
पोलिसांनी न्यायालयात माहिती दिली की, तपासादरम्यान खरातने केवळ नाशिकच नव्हे, तर राज्याच्या इतर भागांतील महिलांचीही फसवणूक केल्याचे धागेदोरे हाती लागले आहेत. ज्योतिषविद्या आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली त्याने गोळा केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा आणि संशयास्पद बँक व्यवहारांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी अधिक कोठडीची मागणी केली होती
25 Mar 2026 09:20 AM (IST)
लोकांना ग्रहांची चाल आणि अंकांची किमया सांगून फसवणाऱ्या अशोक खरातचे शैक्षणिक वास्तव आता समोर आले आहे. सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी येथील रहिवासी असलेला आणि वावी येथील माध्यमिक शाळेचा विद्यार्थी असलेल्या खरातचा धाकधूक वाढवणारा निकाल आता सार्वजनिक झाला आहे. गुणपत्रिकेतील धक्कादायक वास्तव: अशोक खरात हा दहावीच्या परीक्षेत दोन विषयांत नापास झाला होता. विशेष म्हणजे, ज्या अंकशास्त्राच्या जोरावर तो लोकांची फसवणूक करायचा, त्याच गणित विषयात त्याला केवळ २८ गुण मिळाले होते. त्याच्या गुणपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
25 Mar 2026 09:10 AM (IST)
मुंबई : साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. त्या आदेशावरूनच राजकारण तापले आहे. असे असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आदेशावरून महत्त्वपूर्ण विधान केले. ‘सभापती आपल्या अधिकारात आदेश देऊ शकतात. मात्र, त्यांचा आदेश म्हणजे ‘ब्रह्मवाक्य’ नाही’, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कायदेशीर आणि घटनात्मक पेचप्रसंगावर भाष्य केले. वाचा सविस्तर-
25 Mar 2026 09:05 AM (IST)
तुम्ही देखील युट्युब चॅनेल सुरू करण्याचा विचार करताय का? तुमच्या यूट्यूब चॅनेलचे संपूर्ण भवितव्य चॅनेलच्या नावावर अवलंबून असते. यासाठीच तुमच्या चॅनेलचे नाव अत्यंत प्रभावी असणे गरजेचे आहे. अनेक युट्यूबर्सची ओळख त्यांच्या चॅनेलचे नावच आहे. कारण लोकं तुमच्या चेहऱ्यापेक्षा जास्त तुमच्या चॅनेलचे नाव लक्षात ठेवता. यामुळे तुम्ही जर यूट्यूब चॅनेल सुरू करण्याचा विचार करत असाल आणि तुमच्या चॅनेलचे नाव काय असावे यामध्ये तुम्ही गोंधळले असाल तर सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या चॅनेलचे नाव अतिशय सोपे आणि लोकांना समजेल असे असले पाहिजे. यामुळे युजर्सना समजेल की त्यांना तुमच्या चॅनेलवर कोणत्या प्रकाराचा कंटेंट पाहायला मिळणार आहे. तुमच्या चॅनेलचे नाव नक्की कसे असले पाहिजे, याबाबत आता आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगणार आहोत.
India Share Market Update: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यपूर्वेतील इराणमध्ये सुरु असलेले युद्ध पाच दिवसांसाठी थांबल्याची घोषण केली आहे. तसेच याबाबत वरिष्ठ नेत्यांसोबत सकारात्मक चर्चा सुरु असल्याची असल्याचे देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. याचाच सकारात्मक परिणाम आता शेअर बाजारावर देखील होत आहे. जागतिक बाजारातील तेजीच्या अनुषंगाने भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, बुधवारी वाढीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास १९२ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, सुमारे २३,१२० च्या पातळीवर व्यवहार करत होता.






