काँग्रेस नेते राहुल गांधी यांची इराण इस्रायल युद्धावर प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Rahul Gandhi on War : नवी दिल्ली : सध्या इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका संघर्ष सुरु आहे. (World War 3) मध्यपूर्वेतील युद्ध आता अशा वळणावर पोहोचले आहे जिथून परतणे अशक्य वाटते. इराण आणि इस्रायलमधील संघर्षाने आतापर्यंतचे सर्वात भीषण रूप धारण केले आहे. या देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्याचे प्रयत्न जोरदार सुरु आहेत. लाखो भारतीय विद्यार्थी आणि पर्यटक हे अडकले आहेत, या युद्धाचे पडसाद भारतामध्ये जाणवू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सध्या सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीवर भाष्य केले आहे. राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करत या युद्धाची किंमत भारताला चुकवावी लागणार अशी टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, युद्धामुळे भारतात इंधनाचे दर वाढतील आणि आर्थिक विकास मंदावेल. हे युद्ध अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील दिसत असले तरी, प्रत्यक्षात ते अमेरिका, चीन आणि रशियामधील धोरणात्मक व्यापार स्पर्धेचे प्रतिबिंब आहे. अमेरिका जागतिक शक्ती म्हणून आपले वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर चीन सतत जागा मिळवत आहे आणि अंतर कमी करत आहे, अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली.
हे देखील वाचा : बजेटमध्ये कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय! 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी
“तणाव वाढल्याने परिस्थिती आणखी बिकट होईल.”
राहुल गांधी म्हणाले की मध्य पूर्व हे जगातील ऊर्जा उत्पादनाचे एक प्रमुख केंद्र आहे आणि आता या पुरवठ्यावर दबाव आणला जात आहे. ते म्हणाले की होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील तेल पुरवठ्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग आहे. वाढत्या तणावाचे परिणाम या प्रदेशाच्या पलीकडेही जाणवतील.
“भारताला किंमत मोजावी लागेल.”
राहुल गांधी म्हणाले, “जेव्हा या शक्ती एकमेकांशी लढत असतील तेव्हा इतर देशांनाही किंमत मोजावी लागेल. मध्य पूर्वेकडून ऊर्जा आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या भारतावर विशेषतः परिणाम होईल.”
हे देखील वाचा : बिहारच्या राजकारणातील नीतीश कुमार पर्व समाप्त! मंत्रिमंडळाची संभाव्य यादी आली समोर
24 तासांत 3 वेळा भारत-इराणमध्ये गुप्त चर्चा
दिल्लीत सुरू असलेल्या ‘रायसीना संवादा’च्या निमित्ताने इराणचे उपपरराष्ट्र मंत्री खतीबजादेह सध्या भारतात आहेत. जयशंकर यांच्याशी झालेल्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अधिकृतपणे बाहेर आला नसला तरी, खतीबजादेह यांनी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प प्रशासनावर तोफ डागली. “ट्रम्प हे न्यू यॉर्कचा महापौर निवडू शकत नाहीत, मग ते इराणचा सर्वोच्च नेताकोण असेल हे कसे ठरवू शकतात?” असा खोचक सवाल त्यांनी केला. अमेरिकेचा हा दृष्टिकोन वसाहतवादी असून ते इराणच्या लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारला अस्थिर करू इच्छितात, असा आरोप त्यांनी केला.






