नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपच्या बीचवर फोटोशूट केल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेसनं मोदींच्या या फोटोशूटवरुन टीका केली आहे. पंतप्रधानांना मणिपूरला जायला वेळ नाही परंतु लक्षद्वीपला फोटोशूट करायला वेळ आहे, अशी गंभीर टीका कॉंग्रेसने केली. यावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोदींच्या या फोटोशूटमागचं कारण सांगितलं आहे. ट्विट करुन शहा यांनी सविस्तर माहिती दिली.
With its mesmerising beaches, blue water lagoons and much more, Lakshadweep has immense potential to become a global tourist destination. Gratitude to PM @narendramodi Ji for promoting Lakshadweep, this will surely boost tourism, and the economy and thus elevate the living… pic.twitter.com/z1OXicn24h — Amit Shah (@AmitShah) January 4, 2024
गृहमंत्री अमित शहांनी ट्विटद्वारे लक्षद्वीपवरील फोटोशूटचे स्पष्टीकरण
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीपवरील फोटोशूटवरून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना म्हटले आहे की, लक्षद्वीपमध्ये जागतिक पर्यटन स्थळ होण्याची क्षमता आहे. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोत्साहन दिले आहे. मंत्रमुग्ध करणारे समुद्रकिनारे, निळ्या पाण्याचे सरोवर आणि बरेच काही, लक्षद्वीपमध्ये जागतिक पर्यटन स्थळ बनण्याची अफाट क्षमता आहे. अमित शहा यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून म्हटले की, पंतप्रधानांचे आभार @narendramodi लक्षद्वीपला प्रोत्साहन दिल्याबद्दल. यामुळे पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला नक्कीच चालना मिळेल आणि त्यामुळे तेथील लोकांचे जीवनमान उंचावेल.
मोदींनी केलेले फोटोशूट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीपला नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी एक दिवस निवांत बीचवर घालवला. यामध्ये त्यांनी वॉटर स्पोर्ट्स तसेच स्नॉर्कलिंगचा आनंदही लुटला. लक्षद्वीप या बेटावरील सौंदर्याचं यावेळी मोदींनी कौतुक केलं आहे.
काँग्रेसनं काय केली टीका?
काँग्रेसनं ट्वीट करुन मोदींवर निशाणा साधला आहे. ८ महिन्यांपासून मणिपूर जळत आहे. अजूनही लोकांच्या हत्या होत आहेत. भारताचे नागरिक मारले जात आहेत, बेघर आहेत. बहिष्कार झेलत आहेत. पण भारताचे पंतप्रधान कुठे आहेत? आपण स्वतःचं पाहा, असं काँग्रेसनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
भारताचे पंतप्रधान मजा करत आहेत, समुद्र किनारी चांगली फोटोग्राफी सुरु आहे. वेगवेगळ्या पेहरावात फोटो घेतले जात आहेत. शानदार पोज दिल्या जात आहेत. कधी किनाऱ्यावर निवांत बसलेले तर कधी समुद्राच्या लाटांशी खेळताना मौजच मौज सुरु आहे. जबाबदाऱ्यांपासून पळून जाण्याच्या कलेत PM मोदी माहिर आहेत.






