आकाराने लहान असलेल्या भोपळ्याच्या बिया शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात. या बियांमध्ये प्रथिने, चांगले फॅट्स, मॅग्नेशियम, झिंक, लोह आणि इतर पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. भोपळ्याच्या बिया केवळ शरीरासाठीच नाहीतर त्वचा आणि केसांसाठी सुद्धा खूप जास्त गुणकारी ठरतात. भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे मज्जासंस्था आणि स्नायू मजबूत राहतात. भोपळ्याच्या बियांमध्ये इतर बियांचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. चला तर जाणून घेऊया नियमित चमचाभर भोपळ्याच्या बिया खाण्याचे फायदे.(फोटो सौजन्य – istock)
अँटी ऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या भोपळ्याचे सेवन केल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, हार्मोन्स राहील संतुलित

भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिने आणि चांगले फॅट्स असतात, ज्यामुळे पोट भरलेले राहते. अधून मधून लागलेली भूक भागवण्यासाठी भाजलेल्या भोपळ्याच्या बिया खाव्यात.

झिंक शरीरासाठी फार महत्वाचे असते. शरीरातील स्नायू मजबूत करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी भोपळ्याच्या बिया खाव्यात.

भोपळ्याच्या बियांमध्ये अँटी ऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे शरीरातील पेशींमध्ये वाढलेला ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होतो. यामध्ये कमी कॅलरीज असतात. त्यामुळे डाएट स्मूदी बाऊल बनवल्यानंतर त्यावर मिक्स करून भोपळ्याच्या बिया खाव्यात.

एक मूठभर भोपळ्याच्या बियांमध्ये २० ते ३० ग्रॅम पोषण असते. तसेच नियमित तेल आणि मिठात भाजलेल्या भोपळ्याच्या बियांचे नियमित सेवन करणे टाळावे.

आहारात केवळ भोपळ्याच्या बियाचं नाहीतर इतर फळे, भाज्या, कडधान्य इत्यादी पदार्थांचे सेवन करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. यामुळे शरीर निरोगी राहते.






