Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack : ‘पाकिस्तानच्या नागरिकांना शोधा आणि …’; अमित शहांचे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आदेश

गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांचे मुख्यमंत्र्याशी संपर्क साधून आपल्या राज्यांमधील पाकिस्तानी नागरिकांना शक्य तितक्या लवकर हद्दपार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Apr 25, 2025 | 03:47 PM
'पाकिस्तानच्या नागरिकांना शोधा आणि ...'; अमित शहांचे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आदेश

'पाकिस्तानच्या नागरिकांना शोधा आणि ...'; अमित शहांचे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आदेश

Follow Us
Close
Follow Us:

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने पाकिस्तानशी संबंधित सर्व व्हिसा रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांचे मुख्यमंत्र्याशी संपर्क साधून आपल्या राज्यांमधील पाकिस्तानी नागरिकांना शक्य तितक्या लवकर हद्दपार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Pahalgam Terror Attack: भारताने घेतला पहलगामचा बदला; ‘LET’ च्या टॉप कमांडर अल्ताफ लालीला ठोकला

पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरका अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. या हल्ल्यानंतर सरकारने सर्वप्रथम भारत-पाकिस्तानमधील सिंधू नदी पाण्याच्या करारास (इंडस वॉटर ट्रीटी) स्थगित करण्याचा निर्णय घेतला. भारताने याबाबत पाकिस्तानला पत्र पाठवले असून, करार रद्द केल्याची माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या सुरक्षा समितीच्या बैठकीत काही महत्त्वाचे आणि कडक निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णयही समाविष्ट होता.भारत-पाकिस्तान दरम्यान १९६० पासून हा करार अंमलात आहे. सिंधू नदीला पाकिस्तानची जीवनवाहिनी मानले जाते. सुमारे २१ कोटीहून अधिक लोकसंख्या सिंधू आणि तिच्या चार उपनद्यांवर पाण्याच्या गरजांसाठी अवलंबून आहे.

‘सर्जिकल स्ट्राईक’पेक्षाही मोठी कारवाई होणार? आता तर विरोधकांकडूनही मिळतीये मोदींना साथ

याशिवाय, अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना १ मे पर्यंत देश सोडण्याचा वेळ देण्यात आला आहे.भारतामधील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात कार्यरत डिफेन्स अ‍ॅडव्हायझर्सना एक आठवड्यात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, दोन्ही देशांच्या उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या ५० वरून ३० पर्यंत कमी करण्यात आली आहे. दरम्यान २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू, तर १७ लोक जखमी झाले होते.

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम या पर्यटनस्थळी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला. या हल्ल्यात २६ निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला, तर १७ जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर भारत सरकारने तातडीने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने काही ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत.

Web Title: Pahalgam terror attack home minister amit shah instraction to all state cm pakistani citizens deported as soon as possible

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 02:44 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Pahalgam Terror Attack
  • Pakistani Terrorist

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.