Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाबा रामदेवच्या अडचणी काही कमी होईना, उत्तराखंड सरकारकडून दिव्य फार्मसीच्या 14 उत्पादनांवर बंदी!

सर्वोच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर आता पंतजलीवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. उत्तराखंड सरकारने दिव्य फार्मसीच्या 14 उत्पादनांवर बंदी घातली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 30, 2024 | 12:07 PM
बाबा रामदेवच्या अडचणी काही कमी होईना, उत्तराखंड सरकारकडून दिव्य फार्मसीच्या 14 उत्पादनांवर बंदी!
Follow Us
Follow Us:

बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाही आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना फटकारल्यानंतर आता बाबा रामदेव यांच्या मालकीच्या पंतजली कंपनीवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. उत्तराखंड सरकारने पंतजलीच्या 14 उत्पादनावर बंदी घातली आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकाशन आणि प्रसारणाबाबत सर्वोच्च न्यायालयात ३० एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. सुनावणीच्या एक दिवस आधी, उत्तराखंड सरकारने पतंजलीच्या दिव्या फार्मसीच्या 14 उत्पादनांवर बंदी घातली.

[read_also content=”मोठी बातमी! AstraZeneca कंपनीनं मान्य केलं की, लोकांमध्ये कोवीशिल्ड लसीचे दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात https://www.navarashtra.com/india/astrazeneca-admits-that-covishield-can-cause-rare-side-effect-like-blood-clotting-nrps-528471.html”]

‘या’ उत्पादनांवर घालण्यात आली बंदी

पतंजलीच्या दिव्या फार्मसीच्या 14 उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. पतंजली दृष्टी आय ड्रॉप व्यतिरिक्त, यात श्वासरी गोल्ड, श्वासरी वटी, दिव्या ब्रॉन्कोम, श्वासरी प्रवाही, श्वासरी अवलेह, मुक्ता वती एक्ट्रा पॉवर, लिपिडॉम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्ट्रा पॉवर, लिवामृत ॲडव्हान्स, आयजी गोल्ड यांचा समावेश आहे.

 दिव्या फार्मसीचा परवानाही निलंबित

उत्तराखंड सरकारच्या औषध नियंत्रण विभागाने नोटीस जारी केली की, दिव्या फार्मसीचा परवाना त्याच्या उत्पादनांच्या परिणामकारकतेबद्दल दिशाभूल करणाऱ्या जाहिराती वारंवार प्रसारित आणि प्रकाशित केल्यामुळे थांबवण्यात आला आहे. परवाना निलंबित करण्याबरोबरच इतर सर्व तपशील आणि कागदपत्रे तातडीने सादर करण्याच्या सूचनाही विभागाने दिल्या आहेत.

खरे तर सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती सुरूच होत्या. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती बंद करण्याच्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल न्यायालयाने सरकारला फटकारले होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ३० एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. सुनावणीच्या एक दिवस आधी, उत्तराखंड सरकारने पतंजलीच्या 14 उत्पादनांवर घाईघाईने बंदी घातली. पतंजली आयुर्वेदाचे संस्थापक बाबा रामदेव यांच्या विरोधात अवमानाचा खटला चालवायचा की नाही याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय 30 एप्रिल रोजी होणार आहे.

 

Web Title: Patanjali divya pharmacy 14 products ban by uttarakhand government nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2024 | 12:07 PM

Topics:  

  • Baba Ramdev
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Supreme Court : तिसरे अपत्य झाल्यास निवडणूक लढवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
1

Supreme Court : तिसरे अपत्य झाल्यास निवडणूक लढवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

POCSO Act Misuse:पालक ‘प्रतिष्ठेसाठी’ फौजदारी गुन्हे दाखल करतात; पॉक्सो कायद्याच्या गैरवापराबाबत सर्वोच्च न्यायालयाची चिंता
2

POCSO Act Misuse:पालक ‘प्रतिष्ठेसाठी’ फौजदारी गुन्हे दाखल करतात; पॉक्सो कायद्याच्या गैरवापराबाबत सर्वोच्च न्यायालयाची चिंता

…आणि छाती दाबणे म्हणजे बलात्काराचा प्रयत्न नाही; पटना हायकोर्टाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाची तीव्र नाराजी
3

…आणि छाती दाबणे म्हणजे बलात्काराचा प्रयत्न नाही; पटना हायकोर्टाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाची तीव्र नाराजी

Samay Raina: ‘न्यायालयाची दिशाभूल…’, समय रैनाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, ठोठावला भारी दंड; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?
4

Samay Raina: ‘न्यायालयाची दिशाभूल…’, समय रैनाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, ठोठावला भारी दंड; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.