Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Patna Chhath Ghat Accident : छठ महापर्वाच्या उत्साहावर विरजण; पुनपुन नदीत बुडालेल्या तिघांचा शोध सुरू

Patna Chhath Ghat Accident : बिहारच्या पटणा येथील मिर्झापूर गावात छठ घाटाच्या साफसफाईदरम्यान चार किशोर पुनपुन नदीत बुडाले. एका किशोराला वाचवण्यात यश आले असून तीन जण बेपत्ता आहेत. SDRF आणि स्थानिक गोताखोरांकडून शोधमोहीम सुरू आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 15, 2026 | 09:30 PM
Patna Chhath Ghat Accident : छठ महापर्वाच्या उत्साहावर विरजण; पुनपुन नदीत बुडालेल्या तिघांचा शोध सुरू

Patna Chhath Ghat Accident : छठ महापर्वाच्या उत्साहावर विरजण; पुनपुन नदीत बुडालेल्या तिघांचा शोध सुरू

Follow Us
Follow Us:
  • साफसफाई सुरू असताना घडली घटना
  • बेपत्ता तरुणांचा शोध सुरू
  • बचाव पथक उशिरा पोहोचल्याचा ग्रामस्थांचा आरोप
 

Patna Chhath Ghat Accident : बिहारची राजधानी पटणा येथे छठ महापर्वाच्या तयारीदरम्यान एक मोठा अपघात घडला. दीदारगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिर्झापूर गावात छठ घाटाची साफसफाई सुरू असताना चार तरुण पुनपुन नदीत बुडाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने एका तरुणाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले मात्र, इतर तिघे अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छठ महापर्वानिमित्त मिर्झापूर घाटावर स्वच्छता आणि पूजेची तयारी सुरू होती. त्याचवेळी चार तरुण नदीत बुडाले. ही घटना लक्षात येताच घाटावर उपस्थित नागरिक आणि स्थानिक गोताखोरांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. प्रयत्नांनंतर एका तरुणाला नदीतून बाहेर काढण्यात यश आले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

बेपत्ता तरुणांचा शोध सुरू

नदीत बुडालेल्या इतर तिघांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यांच्या शोधासाठी स्थानिक गोताखोरांसह राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) पथकाला पाचारण करण्यात आले आहे. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत.

या दुर्घटनेनंतर मिर्झापूर गावात शोककळा पसरली आहे. बेपत्ता तरुणांचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले असून त्यांचा आक्रोश सुरू आहे. गावातील नागरिकही मोठ्या संख्येने घाटावर जमले आहेत.

Amit Shah on Rahul Gandhi : राहुल गांधींनी भारताची बदनामी थांबवावी, पुढील 30 वर्षे सत्तेपासून दूर राहाल! अमित शाहांचा थेट इशारा

बचाव पथक उशिरा पोहोचल्याचा ग्रामस्थांचा आरोप

घटनेची माहिती दिल्यानंतरही एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके घटनास्थळी पोहोचण्यास बराच वेळ लागल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या व्यवस्थेबाबत आणि छठ घाटांवरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना नदीच्या खोल पाण्यात न जाण्याचे आणि छठ घाटांवरील सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. बेपत्ता तरुणांचा शोध घेण्यासाठी बचाव मोहीम सुरू आहे.

रामलीला मैदानात आंदोलनासाठी आता नवे निर्बंध; एका सभेला केवळ 50000 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा

💡

Frequently Asked Questions

  • Que: पटणामध्ये छठ घाटावर दुर्घटना कुठे घडली?

    Ans: पटणा येथील दीदारगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिर्झापूर गावातील छठ घाटावर ही दुर्घटना घडली.

  • Que: दुर्घटनेनंतर ग्रामस्थांनी कोणता आरोप केला?

    Ans: घटनेची माहिती देऊनही एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

  • Que: बेपत्ता तरुणांचा शोध कोण घेत आहे?

    Ans: स्थानिक गोताखोर आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) पथकाकडून बेपत्ता तरुणांचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Patna chhath ghat accident four teenagers drown punpun river rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 09:30 PM

Topics:  

  • bihar
  • Chhath Puja
  • Mirzapur

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis Chhath Pooja : जुहू चौपाटीवर छठपूजेचा जनसागर! ‘एक समुद्र पाण्याचा, दुसरा जनतेचा!’ चौपाटीवर फडणवीसांचं खास भाषण
1

Devendra Fadnavis Chhath Pooja : जुहू चौपाटीवर छठपूजेचा जनसागर! ‘एक समुद्र पाण्याचा, दुसरा जनतेचा!’ चौपाटीवर फडणवीसांचं खास भाषण

Prakash Ambedkar : छटपूजेवरून प्रकाश आंबेडकर आक्रमक, ठाकरे बंधूंवर NSA लावणार की नाही? भाजपला थेट सवाल!
2

Prakash Ambedkar : छटपूजेवरून प्रकाश आंबेडकर आक्रमक, ठाकरे बंधूंवर NSA लावणार की नाही? भाजपला थेट सवाल!

Rani Chatterjee Chhath Puja: मुस्लिम असूनही दरवर्षी छठपूजा करते ही अभिनेत्री; नाव का आणि कसं बदललं?
3

Rani Chatterjee Chhath Puja: मुस्लिम असूनही दरवर्षी छठपूजा करते ही अभिनेत्री; नाव का आणि कसं बदललं?

Mumbai Chhath Puja: जुहू बीचसह चौपाट्यांवर जाण्यासाठी बेस्टच्या जादा बसगाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4

Mumbai Chhath Puja: जुहू बीचसह चौपाट्यांवर जाण्यासाठी बेस्टच्या जादा बसगाड्या; जाणून घ्या वेळापत्रक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.