Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Narendra Modi: पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचे मोठे विधान! संसदेत कायदा आणण्यापूर्वी जारी केला नवीन Video, म्हणाले…

रविवारी, पंतप्रधान मोदींनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करताना महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, परीक्षांमधील सुधारणांसाठी एका उच्च-स्तरीय कार्यगटाची (टास्क फोर्स) स्थापना करण्यात आली असून, त्याचे नेतृत्व नंदन निलेकणी करतील.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 26, 2026 | 08:01 PM
पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचे मोठे विधान! (Photo Credit- X)

पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचे मोठे विधान! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचे मोठे विधान!
  • संसदेत कायदा आणण्यापूर्वी जारी केला नवीन Video
  • म्हणाले…
PM Narendra Modi: पेपरफुटीच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आणखी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, पेपरफुटीच्या समस्येवर उपाययोजना करणारा कठोर कायदा उद्या (सोमवारी) आणला जाईल. परीक्षांमधील सुधारणांसाठी नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली एक उच्च-स्तरीय कार्यगट (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आला आहे. हा व्हिडिओ संदेश पंतप्रधान मोदींच्या इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ‘एक्स’ (X) यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जारी करण्यात आला. पंतप्रधानांनी स्वतःच्या मोबाईलमधील सेल्फी कॅमेरा वापरून हा व्हिडिओ रेकॉर्ड केला.

भारत सरकारकडून सातत्याने पावले उचलली जात आहेत

पेपरफुटीच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान म्हणाले, “मित्रांनो, भारत सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सातत्याने अनेक पावले उचलत आहे. ज्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला आहे, ते तुरुंगात खितपत पडले आहेत.”

‘Mann Ki Baat’मध्ये पंतप्रधान मोदींचा कारगिल वीरांना सलाम; अजून कोणते 5 मुद्दे मांडले जाणून घ्या…

आपल्याला भविष्याचा विचार करावा लागेल – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान म्हणाले, “आम्ही फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन केली आहेत. उद्या आम्ही संसदेत एक नवीन कायदा करण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहोत, ज्यामध्ये कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असेल. मात्र, आपल्याला भविष्याचाही विचार करावा लागेल. आपली परीक्षा प्रणाली विश्वासार्ह आणि पारदर्शक असायला हवी आणि त्यात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे.”

नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली टीमची स्थापना

पंतप्रधान मोदींनी पुढे सांगितले की, “या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, आम्ही जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली एक उच्च-स्तरीय कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कार्यगट परीक्षांमधील सुधारणांवर लक्ष केंद्रित करेल. या कार्यगटाच्या अहवालाच्या आधारे आगामी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल.”

नंदन नीलेकणी कोण आहेत?

नंदन नीलेकणी यांचे पूर्ण नाव नंदन मोहनराव नीलेकणी आहे. ते एक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आहेत. ते इन्फोसिसचे सह-संस्थापक देखील होते आणि आधार कार्डचे निर्माते म्हणून ओळखले जातात. नीलेकणी यांचा जन्म २ जून १९५५ रोजी बंगळूरु येथे झाला. नंतर त्यांनी आयआयटी मुंबईमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली. १९८१ मध्ये, नीलेकणी यांनी एन. आर. नारायण मूर्ती आणि सहा सहकाऱ्यांसोबत इन्फोसिसची स्थापना केली. आज, ही भारतातील अग्रगण्य आयटी कंपन्यांपैकी एक आहे. नीलेकणी यांनी २००२ ते २००७ पर्यंत इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी म्हणून काम केले. २०१७ मध्ये, त्यांनी कंपनीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.

Gen Z साठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; 21 व्या वर्षी आमदार-खासदार होण्याची संधी? 

Web Title: Pm modi makes a major statement on the paper leak controversy releases a new video ahead of introducing legislation in parliament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 07:58 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Gen Z
  • Nation News
  • neet paper leak
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

BRICS Summit 2026: ब्रिक्स शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत महासत्तांचा मेळावा; भारताच्या रणनीतीवर जगाचे अन् US mediaचे लक्ष
1

BRICS Summit 2026: ब्रिक्स शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत महासत्तांचा मेळावा; भारताच्या रणनीतीवर जगाचे अन् US mediaचे लक्ष

BRICS 2026: 7 वर्षांनंतर चिनी राष्ट्राध्यक्ष येणार भारतात; पंतप्रधान मोदींसोबत होणार ऐतिहासिक भेट, महासत्तांची दिल्लीत महापरिषद
2

BRICS 2026: 7 वर्षांनंतर चिनी राष्ट्राध्यक्ष येणार भारतात; पंतप्रधान मोदींसोबत होणार ऐतिहासिक भेट, महासत्तांची दिल्लीत महापरिषद

Rahul Gandhi : राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मोदींवरील वक्तव्याच्या मानहानी खटल्याची कार्यवाही सुरूच राहणार
3

Rahul Gandhi : राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मोदींवरील वक्तव्याच्या मानहानी खटल्याची कार्यवाही सुरूच राहणार

PM Modi Security Breach : मोदींच्या कार्यक्रमात मोठी खळबळ; बनावट PMO ID, बंदुकधारी बॉडीगार्डसह दोघे ताब्यात
4

PM Modi Security Breach : मोदींच्या कार्यक्रमात मोठी खळबळ; बनावट PMO ID, बंदुकधारी बॉडीगार्डसह दोघे ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.