Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अयोध्येमध्ये चहा घेतला त्या घरी पंतप्रधानांनी पाठवल्या भेटवस्तू आणि पत्र; गृहिणीने केली ‘ही’ मागणी, वाचा सविस्तर

पंतप्रधान मोदी यांनी उज्ज्वला योजनेच्या 10 कोटी व्या लाभार्थी मीरा मांझी यांच्या घरी अचानक भेट दिली. तसेच त्यांचा घरी चहापाणी घेतला. यानंतर आता पंतप्रधान मोदी यांनी मीरा मांझी यांच्या कुटुंबाला पत्र लिहित त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच काही भेटवस्तू देखील पाठवल्या आहेत. मोदी यांनी पत्रामध्ये नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 04, 2024 | 06:28 PM
अयोध्येमध्ये चहा घेतला त्या घरी पंतप्रधानांनी पाठवल्या भेटवस्तू आणि पत्र; गृहिणीने केली ‘ही’ मागणी, वाचा सविस्तर
Follow Us
Follow Us:

अयोध्या | अयोध्येमध्ये (Ayodhya) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 30 डिसेंबर रोजी विविध विकासकामांचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी रोड शो करत शक्तीप्रदर्शन देखील केले. याच दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala Yojana) 10 कोटी व्या लाभार्थी मीरा मांझी यांच्या घरी अचानक भेट दिली. तसेच त्यांचा घरी चहापाणी घेतला. यानंतर आता पंतप्रधान मोदी यांनी मीरा मांझी यांच्या कुटुंबाला पत्र लिहित त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच काही भेटवस्तू देखील पाठवल्या आहेत. मोदी यांनी पत्रामध्ये नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अयोध्येमध्ये पंतप्रधान मोदी यांचे पत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

अयोध्या धाम रेल्वे जंक्शन (Ayodhya Dham Railway Junction) तसेच विमानतळाचे उद्घाटन करायला आलेल्या पंतप्रधान मोदींनी मीरा मांझी यांच्या घरी भेट दिली. पंतप्रधानांनी अचानक भेट दिल्यानंतरही मीरा यांनी मोदींना चहा दिला. या प्रसंगानंतर पंतप्रधान मोदी यांनी देखील मीरा मांझी यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य व काही खेळणी भेटवस्तू म्हणून दिल्या आहेत. याबाबत मीरा मांझी यांनी माहिती देत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पतीला नोकरी देण्याची मीरा मांझी यांची विनंती

माध्यमांना प्रतिक्रिया देताना मीरा मांझी म्हणाल्या, “मला खूप छान वाटलं. त्यांनी पत्राद्वारे नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आमच्या मुलांचा हा सन्मान आहे. त्यांनी एक पत्र पाठवलं आहे. यावेळी आम्ही फार आनंदात असून खूप छान वाटत आहे. मलाच नव्हे तर मांझी नगरसाठी त्यांनी हे पत्र लिहिलं आहे. लहान मुलांना बॅग, पेन्सिल, टिफीन असं शैक्षणिक साहित्य त्यांनी पाठवलं आहे. आता त्यांनी माझ्या पतीला लहान-मोठी नोकरी द्यावी. त्यामुळे माझ्या मुलांचं भविष्य सुरक्षित होईल” अशा भावना मीरा मांझी यांनी माध्यमांसमोर व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधानांनी पत्रामध्ये व्यक्त केल्या भावना

‘तुम्हाला आणि तुमच्या परिवारातील सर्व सदस्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रभू श्रीरामाच्या पावन नगरीत अयोध्येत तुम्हाला आणि तुमच्या परिवाला भेटून आणि तुमच्या हाताचा चहा पिऊन फार प्रसन्न वाटलं.

अयोध्येतून आल्यानंतर मी अनेक टीव्ही चॅनेलवर तुमच्या मुलाखती पाहिल्या. यामध्ये तुम्ही आणि तुमचा परिवारातील सदस्यांनी आत्मविश्वास आणि जितक्या सहजतेने तुम्हाला आलेला अनुभव शेअर केला हे पाहून छान वाटलं. तुमच्यासारख्या कोट्यवधी कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर असंच हासू ठेवणं ही माझी संपत्ती आहे. तुमच्यामुळेच मला देशासाठी मनापासून काम करण्याची ऊर्जा मिळते.

उज्ज्वला योजनेचे १० कोटी वा लाभार्थी बनणं हा फक्त एक आकडा नाही, तर देशातील मोठ्या मोठ्या स्वप्नांना आणि संकल्पांना पूर्ण होण्याच्या उद्देशाने हे पाहतो.

मला पूर्ण विश्वास आहे की अमृत कालमध्ये तुमच्या सारख्या आकांक्षांनी परिपूर्ण कोट्यवधी देशवासियांचा उत्साह विकसित भारत निर्माणासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. मुलांच्या चांगल्या स्वास्थ्या आणि उज्ज्वल भविष्याची मी प्रार्थना करतो’

Web Title: Pm modi written letter to ayodhya lady meera manjhis family and send gift nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2024 | 06:28 PM

Topics:  

  • ayodhya
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
1

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
2

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने होणार दौऱ्याची सांगता
3

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने होणार दौऱ्याची सांगता

वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ अमरावतीत; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमीत यात्रेचे स्वागत
4

वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ अमरावतीत; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमीत यात्रेचे स्वागत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.