Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नरेंद्र मोदींनी 12 वर्षात देश चुकीच्या दिशेला नेला, मोदी सरकारमध्ये ‘राम’ नाही अन्…; हर्षवर्धन सपकाळांची टीका

१२ वर्षांच्या मोदी सरकारच्या कामाचे मुल्यमापन करायचे झाले तर मोदी सरकारमध्ये ‘राम’ही नाही व दाखवावे असे एकही ‘काम’ नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 11, 2026 | 11:54 AM
नरेंद्र मोदींनी 12 वर्षात देश चुकीच्या दिशेला नेला, मोदी सरकारमध्ये ‘राम’ नाही अन्...; हर्षवर्धन सपकाळांची टीका

नरेंद्र मोदींनी 12 वर्षात देश चुकीच्या दिशेला नेला, मोदी सरकारमध्ये ‘राम’ नाही अन्...; हर्षवर्धन सपकाळांची टीका

Follow Us
Follow Us:

मुंबई : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदावर राहण्याचा विक्रम करून पंडित जवाहलाल नेहरुंच्या पंतप्रधानपदापेक्षा जास्त काळ ते पदावर आहेत असा ढोल पिटला जात आहे परंतु नरेंद्र मोदी यांचे १२ वर्षातील कर्तृत्व व देशासाठी योगदान काय हे शोधावे लागेल. गेल्या १२ वर्षात नरेंद्र मोदी देशाला चुकीच्या दिशेने घेऊन गेले, त्याची मोठी किंमत पुढील अनेक वर्ष देशाला मोजावी लागणार आहे. १२ वर्षांच्या मोदी सरकारच्या कामाचे मुल्यमापन करायचे झाले तर मोदी सरकारमध्ये ‘राम’ही नाही व दाखवावे असे एकही ‘काम’ नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

 

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, सत्तेत येण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला हमीभाव देणार, १०० स्मार्ट सिटी निर्माण करणार, दहशतवादाचा बिमोड करणार, पेट्रोल डिझेल ३५ रुपये लिटर तर गॅस सिलेंडर १०० रुपयाला देणार आणि ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’, अशा राणा भिमदेवी थाटात घोषणा केल्या पण यातील एकही काम झालेले नाही. रुपया घसरत १०० च्या जवळ पोहचला, जीडीपी घसरला, ‘मेक इन इंडिया’ फेल गेला, ‘स्टार्टअप’ फेल गेला आणि अमेरिकेसमोर मोदी सरंडर झाले हे त्यांचे कर्तृत्व आहे. मोदींच्या काळात भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात वाढला असून ‘हम दो, हमारे दो, अशी या सरकारची ओळख झाली असून मुठभर उद्योगपतींसाठी हे सरकार काम करत आहे, असा हल्लाबोल सपकाळ यांनी केला.

पंडित जवाहरलाल नेहरुंनी स्वातंत्र्यानंतर भारताला जगात एक महत्वाचे राष्ट्र अशी ओळख निर्माण करुन दिली. मोठी धरणे बांधली, इस्त्रो, भाभा अणुशक्ती केंद्र, IIT, IIM, सारख्या संस्था उभ्या केल्या. विविध क्षेत्रात मोठ्या संस्था उभ्या केल्या, पायाभूत सुविधा निर्माण केल्या. नेहरुंचे नेतृत्व जगाने मान्य केले. पंडित नेहरु स्वातंत्र्य चळवळीत ११ वर्षे जेलमध्ये होते. पंडित नेहरु, लालबहाद्दुर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही नरसिंहराव, डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वात देशाने विकास व प्रगतीचा मोठा टप्पा गाठला. राजीव गांधी यांनी संगणक क्रांती आणली, २१ शतकात देशाला घेऊन गेले, सत्तेचे विकेंद्रीकरण केले. तर शिक्षण हक्क कायदा, माहिती अधिकार कायदा, अन्नसुरक्षा कायदा, मनरेगा, अशा योजना काँग्रेस सरकारने आणल्या. काँग्रेसच्या सरकारने नवी आर्थिक क्रांती आणली, कृषी क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली पण मोदींनी काय केले, हा मोठा संशोधनाचा विषय आहे, असेही सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : ‘दोषींना कोणतीही माफी नाही…’, मीरा-भाईंदर अत्याचार प्रकरणावर प्रताप सरनाईक यांची कठोर भूमिका

मंत्री गिरिश महाजनांचे विधान राष्ट्रद्रोही

फडणवीस सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी पंजाबमधील एका कार्यक्रमात मुक्ताफळे उधळली व खलिस्तानचे समर्थन करत ऑपरेशन ब्ल्यू स्टार हा काळा दिवस होता असे विधान करून देशाच्या अखंडतेसाठी केलेल्या मोहिमेचा, भारताच्या लष्कराचा व पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या बलिदानाचा घोर अपमान केला आहे. सर्वात गंभीर म्हणजे महाजन यांचे विधान खलिस्तानचे समर्थन करणारे आहे, दहशतवादाचे समर्थन करणारे आहे. या देशाने दहशतवादीची मोठी किंमत मोजली आहे. महात्मा गांधी, इंदिराजी गांधी राजीवजी गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले, याचा महाजन यांनी अपमान केला आहे. देशात स्वातंत्र्याची चळवळ सुरु असताना महाजन व त्यांच्या पक्ष हा इंग्रजांच्या बाजूने होता आणि दुर्दैवाने ते आज सत्तेत आहे. मंत्री गिरीश महाजन यांचे वक्तव्य देशाच्या एकता व अखंडतेला सुरुंग लावणारे असून या राष्ट्रद्रोही विधानाबद्दल त्यांची मंत्रिमंडळ व भाजपा पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे, पण तसे होत नसून महाजन यांचे समर्थन केले जात आहे, हे त्यातून दुर्दैवी आहे असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has criticized the modi government 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट, तातडीने दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार रुपये द्या- हर्षवर्धन सपकाळ
1

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट, तातडीने दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार रुपये द्या- हर्षवर्धन सपकाळ

BRICS 2026: 7 वर्षांनंतर चिनी राष्ट्राध्यक्ष येणार भारतात; पंतप्रधान मोदींसोबत होणार ऐतिहासिक भेट, महासत्तांची दिल्लीत महापरिषद
2

BRICS 2026: 7 वर्षांनंतर चिनी राष्ट्राध्यक्ष येणार भारतात; पंतप्रधान मोदींसोबत होणार ऐतिहासिक भेट, महासत्तांची दिल्लीत महापरिषद

Youth Congress Protest: नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक; मनुस्मृतीविरोधात ‘सन्मान मोर्चा’, MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी
3

Youth Congress Protest: नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक; मनुस्मृतीविरोधात ‘सन्मान मोर्चा’, MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी

Rahul Gandhi : राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मोदींवरील वक्तव्याच्या मानहानी खटल्याची कार्यवाही सुरूच राहणार
4

Rahul Gandhi : राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मोदींवरील वक्तव्याच्या मानहानी खटल्याची कार्यवाही सुरूच राहणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.