Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘इंडिया’त सहभागी करा, यात्रेत सहभागी होऊ; काँग्रेसच्या निमंत्रणानंतर आंबेडकरांची भूमिका

देशपातळीवर इंडिया आघाडी आणि राज्यात महविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश केल्यास राहुल गांधी यांच्या यात्रेत सामील होऊ, असे पत्र वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला पाठवले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 18, 2024 | 10:32 AM
जरांगे अन् फडणवीस यांच्यातले भांडण नकली

जरांगे अन् फडणवीस यांच्यातले भांडण नकली

Follow Us
Follow Us:

मुंबई : देशपातळीवर इंडिया आघाडी आणि राज्यात महविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश केल्यास राहुल गांधी यांच्या यात्रेत सामील होऊ, असे पत्र वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला पाठवले आहे. काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’चा दुसरा टप्पा सध्या सुरू आहे. या भारत जोडो न्याय यात्रेत सामील व्हावे, असे आमंत्रण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना दिले आहे. हे आमंत्रण प्रकाश आंबेडकर यांनी स्वीकारले असून, आंबेडकरांनी काँग्रेससमोर एक अट ठेवली आहे.

देशातील विरोधकांच्या इंडिया आघडीत आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत सहभागी करून घेतले, तरच भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी देशातील विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. देशभरातील विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत ‘वंचित’ सहभागी होणार का? असा प्रश्न आहे. मागच्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीतील नेत्यांचा संपर्क सुरू आहे. मात्र जागा वाटपाच्या मुद्यावर अद्याप एकमत झालेले नाही. त्यामुळे वंचित मविआमध्ये सामील होणार की नाही, याची स्पष्टता नाही.

खर्गेंशी संपर्क साधूनही समाविष्ट करून घेतलं नाही

प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही वंचित बहुजन आघाडीला अद्याप इंडिया आघाडी अथवा मविआमध्ये समाविष्ट करून घेतलेले नाही. यात विडंबन म्हणजे आपण पाठवलेल्या निमंत्रणात आपण इंडिया आघाडीचे महत्त्वाचे घटक आहात, असे म्हटले आहे.

सध्याच्या धर्मांध, जातीय, विभाजनकारी वातावरणात मोदींच्या सरकारविरोधात असणाऱ्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे, जे की संघटित शक्ती व कार्यक्रम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजप आरएसएसच्या दुष्ट करावयांविरोधात लढ्याला टिकवून ठेवण्यासाठी गरजेचे आहे.

– ऍड. प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी.

Web Title: Prakash ambedkar talked about participating in india alliance nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2024 | 10:32 AM

Topics:  

  • india
  • INDIA Alliance
  • political news

संबंधित बातम्या

Asian Games 2026: टीम इंडियाने रचला इतिहास! मलेशियावर मात करत हॉकीत सुवर्णपदक; थेट 2028 ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री
1

Asian Games 2026: टीम इंडियाने रचला इतिहास! मलेशियावर मात करत हॉकीत सुवर्णपदक; थेट 2028 ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी
2

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी

Pilot Career: आकाशात संकट आलं तर पायलट काय करतो? कॉकपिट ट्रेनिंगपासून लाखोंच्या पगारापर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती
3

Pilot Career: आकाशात संकट आलं तर पायलट काय करतो? कॉकपिट ट्रेनिंगपासून लाखोंच्या पगारापर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…
4

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.