Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panjab Congress Split: पंजाबमध्ये राजकीय भुकंप? काँग्रेस खासदाराच्या अमित शाहांच्या भेटीने खळबळ

Panjab Congress: पंजाब काँग्रेसचे प्रभारी भूपेश बघेल यांनीही हालचाली सुरू केल्या आहेत. विद्यमान प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वडिंग आणि माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांची भेट घेण्यासाठी ते आज किंवा पुढील काही दिवसांत चंदीगडला पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 04, 2026 | 03:26 PM
Punjab Congress, Sukhjinder Randhawa, Amit Shah, Charanjit Channi,

Punjab Congress, Sukhjinder Randhawa, Amit Shah, Charanjit Channi,

Follow Us
Follow Us:
  • पंजाब काँग्रेसमध्येही फूट पडण्याची शक्यता
  • चरणजीत सिंग चन्नी आक्रमक
  • पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेत येऊ शकणार नाही
Panjab Congress split:  बंगालमधील तृणमूल काँग्रेसपाठोपाठ आता पंजाब काँग्रेसमध्येही फूट पडण्याची शक्यता आहे. गुरदासपूरचे खासदार सुखजिंदर सिंग रंधावा गुपचूप दिल्लीला पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. सुखजिंदर सिंग यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहा यांची भेट घेतल्याचेही बोलले जात आहे. यावेळी ते भाजपचे राज्यसभा खासदार तरुण चुघ यांच्यासोबत दिसले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीनंतर रंधावा म्हणाले की, “पंजाबबाबत चरणजीत सिंग चन्नी आणि राजा वडिंग यांनाच विचारा. मी कालही के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली. अशी वेळ यायला नको होती. इतक्या बैठका घेतल्यानंतरही ही परिस्थिती उद्भवली, हे दुर्दैवी आहे.”

दुसरीकडे, पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद न मिळाल्याने माजी मुख्यमंत्री आणि जालंधरचे खासदार चरणजीत सिंग चन्नी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आपल्या मोरिंडा येथील निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला तीन विद्यमान आमदारांसह २६ नेते उपस्थित होते. नेत्यांच्या येण्याचा ओघ अजूनही सुरू आहे.

Ram Mandir Scam: दान चोरी प्रकरणात संघ नेत्यावर खळबळजनक आरोप; कंत्राटदारांकडून ५-५ लाखांची कथित वसुली?

काँग्रेस हायकमांडने लुधियानाचे खासदार अमरिंदर सिंग राजा वडिंग यांनाच पंजाब काँग्रेच्या प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पक्षातील अनेक नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. फेब्रुवारी २०२७ मध्ये पंजाब विधानसभा निवडणुका होणार आहेत.

चन्नी समर्थक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

चरणजीत सिंग चन्नी आपल्या समर्थक नेत्यांशी चर्चा करून मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बैठकीला उपस्थित असलेले माजी आमदार दर्शन बराड म्हणाले की, “जर चन्नी यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले नाही, तर पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेत येऊ शकणार नाही.”

निवडणुकीपूर्वी चरणजीत सिंग चन्नी यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र, ऐनवेळी निर्णय बदलून अमरिंदर सिंग राजा वडिंग यांनाच या पदावर कायम ठेवण्यात आले, तर चन्नी यांच्याकडे प्रचार समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ; ममता बॅनर्जी यांच्या विश्वासू चंद्रिमा भट्टाचार्य यांनी तृणमूल पक्ष प्रमुख पदाचा दिला राजीनामा

या निर्णयामुळे चन्नी नाराज झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी काँग्रेस हायकमांडचे आभारही मानले नाहीत. चन्नी यांच्या निकटवर्तीयांपैकी एका व्यक्तीने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, प्रदेशाध्यक्षपद न मिळाल्याने ते अत्यंत नाराज असून आता त्यांनी आरपारच्या लढाईची भूमिका घेतली आहे. शक्तिप्रदर्शन करून हायकमांडला आपल्या ताकदीची जाणीव करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

दुसरीकडे, पंजाब काँग्रेसचे प्रभारी भूपेश बघेल यांनीही हालचाली सुरू केल्या आहेत. विद्यमान प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वडिंग आणि माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांची भेट घेण्यासाठी ते आज किंवा पुढील काही दिवसांत चंदीगडला पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Punjab congress split mp sukhjinder singh randhawa meets amit shah delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Congress

संबंधित बातम्या

Congress on Caste Census : जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा तापला, ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार
1

Congress on Caste Census : जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा तापला, ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच
2

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच

तरुणाईंच्या मुळ प्रश्नांना भाजपने उत्तर द्यावे, कितीही गुन्हे दाखल केले तरीही…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
3

तरुणाईंच्या मुळ प्रश्नांना भाजपने उत्तर द्यावे, कितीही गुन्हे दाखल केले तरीही…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा प्रवेश
4

काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.