राम मंदिर दान चोरी प्रकरणात संघ नेत्यावर खळबळजनक आरोप; कंत्राटदारांकडून ५-५ लाखांची कथित वसुली?
Ram Mandir Scam: राममंदिर दान चोरी प्रकरणात रा. स्व. संघाशी संबंधित आणि मंदिर ट्रस्टचे निमंत्रित सदस्य गोपाळ राव यांच्यावर कर्नाटकच्या बीदर जिल्ह्यातील औराद तालुक्यामधील चौंडोरी गावचे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष दीपक पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी एसआयटीप्रमुख विजय विश्वास पंत यांना ईमेल आणि स्पीड पोस्टद्वारे तक्रार पाठवली.
या तक्रारीत त्यांनी म्हटले की, गोपाळ राव यांनी संघाच्या नावावर सरकारी कंत्राटदारांकडून राम मंदिरासाठी प्रत्येकी ५-५ लाख रुपयांची वसुली केली. या देणगीची कोणतीही पावती देण्यात आली नाही आणि त्याचा कोणताही हिशोबही देण्यात आला नाही. पाटील यांच्या मते, अशी कथित वसुली देशभरात करण्यात आली आणि कर्नाटकात गोपाळ राव यांनी ती केली, ज्यामध्ये भाजप आमदार प्रभू चव्हाण यांचाही सहभाग होता.
कंत्राटदारांकडून वसूल केलेले कोट्यवधी रुपये राम मंदिर ट्रस्टमध्ये जमा करण्यात आले नाहीत, असा आरोप त्यांनी केला. या वसुलीच्या काळात कर्नाटकात गोपाळ राव यांनी संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांचीही भेट घेतली होती. मात्र, या तक्रारीनंतर पाटील यांना एसआयटीकडून उत्तर मिळालेले नाही.
राम मंदिर बांधकामाशी संबंधित अभियंता (इंजिनिअर) दीनानाथ वर्मा यांनीही गोपाळ राव आणि अनिल मिश्रा यांच्यावर कंत्राटदारांकडून प्रत्येक कामाच्या पेमेंटमध्ये ४०% कमिशन घेतल्याचा आरोप केला होता. त्याच्याकडेही याचे सर्व पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला होता. बांधकामादरम्यान यावर आक्षेप घेतला असता वर्मा यांना धमक्या मिळाल्या, ज्यामुळे ते अयोध्या सोडून प्रयागराजला परत गेले.
दरम्यान राम मंदिरातील दान चोरीचे गूढ अजूनही उलगडलेले नसून कोणी किती पैशांचा अपहार केला याचाही तपशील अद्याप अस्पष्ट आहे. राम मंदिरातील या अपहारामागील सूत्रधारदेखील गूढच आहे. तथापि, विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाचा तपास करत आहे. अनेक दान चोरांना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. चंपत राय यांच्यावरही संशय आहे. राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी एसआयटीने अयोध्येत सुमारे आठ तास सखोल तपास केला. या काळात ट्रस्टचे अधिकारी मसाल गोपाल राव, चंपत राय आणि डॉ. अनिल मिश्रा यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, राम मंदिराचे विश्वस्त दिनेंद्र दास महाराज यांनी पहिल्यांदाच ट्रस्टविरोधात एक मोठे निवेदन जारी केले असून, या संपूर्ण घटनेसाठी गोपाल राव यांना जबाबदार धरले आहे.
हराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टशी संबंधित एका वरिष्ठ पुजाऱ्याची छुपी-कॅमेरा मुलाखत घेतली. त्यांचे नाव दिनेंद्र दास महाराज आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य महंत दिनेंद्र दास महाराज म्हणाले की, गोपाळ राव यांचा राम मंदिराच्या परंपरांवर विश्वास नाही. संपूर्ण चूक गोपाळ राव यांचीच आहे; ते सर्वांची दिशाभूल करत आहेत.






