
Raghav Chadha left from aam-aadmi-party-announced Ashok Mittal and Sandeep Pathak left AAP
Raghav Chadha left AAP : नवी दिल्ली : मागील अनेक दिवसांपासून पक्षांतर्गत संघर्षानंतर अखेर खासदार राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला आहे. अनेक दिवसांपासून आप आणि राघव चढ्डा यांच्यामध्ये वाद-विवाद सुरु होते. आप (AAP) पक्षाने राघव चड्ढा यांना राज्यसभेच्या उपनेते पदावरुन देखील काढून टाकले होते. मात्र आता राघव चड्ढांनी पक्षाची साथ सोडली असल्याचे कबुल केले आहे.
आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. हे टोकाचे पाऊल उचलणारे राघव चड्ढा एकटे नाहीत. त्यांच्यासोबत इतर तीन खासदारांनीही राजीनामा जाहीर केला आहे. यामध्ये राघव चड्ढा, अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांचा समावेश आहे.
हे देखील वाचा : तेलंगणा सरकारचा ऐतिहासिक निर्णय: मंत्री आणि आमदारांच्या पगारात ५० टक्के होणार कपात
संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासोबत पत्रकार परिषदेला संबोधित करताना ‘आप’चे खासदार राघव चड्ढा म्हणाले, “आम्ही, म्हणजेच राज्यसभेतील ‘आप’चे दोन-तृतीयांश सदस्य, भारतीय संविधानातील तरतुदींचा वापर करून भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे.” असे राघव चड्ढा यांनी सांगितले आहे.
#WATCH | Delhi: Addressing a press conference with Sandeep Pathak and Ashok Mittal, AAP MP Raghav Chadha says, “The AAP, which I nurtured with my blood and sweat, and gave 15 years of my youth to, has deviated from its principles, values and core morals. Now this party does not… pic.twitter.com/fo301O1mkj — ANI (@ANI) April 24, 2026
आप आपल्या तत्त्वांपासून भरकटले
आपचे खासदार राघव चड्ढा म्हणाले, “ज्या आप पक्षाला मी माझ्या रक्ता-घामाने वाढवले आणि माझ्या तारुण्याची १५ वर्षे समर्पित केली, तो पक्ष आता आपली तत्त्वे, मूल्ये आणि मूळ नैतिकतेपासून भरकटला आहे. हा पक्ष आता देशाच्या हितासाठी नव्हे, तर वैयक्तिक स्वार्थासाठी काम करतो. गेल्या काही वर्षांपासून मला जाणवत आहे की, मी योग्य व्यक्ती असूनही चुकीच्या पक्षात आहे. त्यामुळे, आज मी जाहीर करतो की, मी आपपासून फारकत घेऊन जनतेच्या अधिक जवळ जात आहे.”
हे देखील वाचा : मुख्य निवडणूक आयुक्तांना ‘भारतरत्न’ द्या! हिमंता बिस्वा सरमा यांची केंद्राकडे मोठी मागणी