Major Relief for Those MPs Who Joined the BJP (फोटो - सोशल मीडिया)
Raghav Chadha News : नवी दिल्ली : आम आदमी पक्षामध्ये वाद निर्माण झाला आहे. राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्याविरोधात वातावरण निर्माण झाले असून त्यांच्याविरोधात आप नेते आक्रमक भूमिका घेत आहे. राघव चढ्डांविरोधात आपमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यांना राज्यसभेच्या उपनेते पदावरुन देखील हटवण्यात आले. यानंतर आता चड्ढा आणि आपमध्ये (AAP) राजकीय वाद निर्माण झाला आहे. आरोप प्रत्यारोप जोरदार सुरु आहे. दरम्यान, खासदार राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत पिक्चर अभी बाकी है असे म्हटले आहे. यामुळे त्यांचे पक्षामधील वादामध्ये आणखी ठिणगी पडली आहे.
राघव चड्ढा यांनी एक व्हिडिओ केला शेअर
संसदेत पंजाबशी संबंधित आर्थिक आणि विकासाचे मुद्दे न मांडल्याबद्दल पक्षाने चड्ढा यांच्यावर टीका केली. पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा, प्रदेशाध्यक्ष अमन अरोरा आणि पक्षाचे नेते कुलदीप सिंग धालीवाल यांनी आरोप केला की, चड्ढा यांचे मौन निराशाजनक आहे. यावर राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी भावूक व्हिडिओ शेअर करुन सांगितले की, पंजाब हा त्यांच्यासाठी केवळ एक राजकीय विषय नाही, तर ती त्यांची भूमी, त्यांचे कर्तव्य, त्यांची माती आणि त्यांचा आत्मा आहे. त्यांनी पंजाबचे हित साधण्यासाठी संसदेत केलेल्या आपल्या पूर्वीच्या प्रयत्नांचा एक संकलन व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला आहे.
हे देखील वाचा : राघव चड्ढांनी मोदींविरोधी सर्व पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांनी स्क्रीनशॉटसह केली पोलखोल
पंजाबचे प्रश्न न मांडल्याचा आरोप
आप नेत्यांनी पक्षाची भूमिका आणि सरकारी विरोधी आक्रमक भूमिका न घेतल्याचा आरोप खासदार राघव चड्ढा यांच्यावर केला आहे. आप पक्षाच्या नेत्यांच्या मते, सुमारे ८,५०० कोटी रुपयांचा ग्रामीण विकास निधी आणि सुमारे ६०,००० कोटी रुपयांचे जीएसटी संबंधित मुद्दे संसदेत मांडले गेले नाहीत. इतकेच नव्हे तर, गेल्या वर्षी पंजाबमध्ये आलेल्या पुरानंतर पंतप्रधानांनी जाहीर केलेली १,६०० कोटी रुपयांची आर्थिक मदतही संसदेत चर्चेचा विषय बनली नाही.
हरपाल सिंग चीमा म्हणाले की, ही “निष्क्रियता” आम आदमी पक्षाच्या मूळ तत्त्वांच्या विरोधात आहे, कारण पक्षाला निर्भयपणे सार्वजनिक प्रश्न मांडण्याची परंपरा आहे. अमन अरोरा यांनीही म्हटले की, पंजाबच्या प्रलंबित आर्थिक आणि मदत कार्यांवर सतत राष्ट्रीय लक्ष देण्याची गरज आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर, राघव चड्ढाच्या ‘द पिक्चर इज स्टिल लेफ्ट’ या व्हिडिओमधून काय खुलासे होतात आणि पक्षातील अंतर्गत संघर्षावर काय तोडगा निघतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा : Raghav Chadha: “मी संसदेत ओरडण्यासाठी आणि शिवीगाळ…,” राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार






