Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : SIR आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलन काँग्रेसने आणखी तीव्र केले आहे. राहुल गांधींनी आंदोलनाला गैरहजर राहणाऱ्या खासदारांची यादी तयार करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. INDIA आघाडीतील मित्रपक्षांच्या नेत्यांनाही दिल्लीत येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 09, 2026 | 01:21 AM
INDIA Bloc Protest

INDIA Bloc Protest

Follow Us
Follow Us:
  • राहुल गांधींनी आंदोलनात गैरहजर राहणाऱ्या काँग्रेस खासदारांची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्याची माहिती.
  • योग्य कारण नसलेल्या गैरहजर खासदारांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे निर्देश.
  • ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्यासह INDIA आघाडीतील नेत्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
 

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : SIR अर्थात मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि INDIA आघाडीचा निवडणूक आयोगाविरोधातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दिल्लीतील आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून विरोधी पक्षांच्या खासदारांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याची भूमिका घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी काँग्रेस खासदारांच्या उपस्थितीबाबतही कडक भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे.

गैरहजर खासदारांची यादी तयार करण्याचे आदेश

काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांना राहुल गांधी यांनी गेल्या दोन दिवसांपासून आंदोलनात उपस्थित नसलेल्या खासदारांची यादी तयार करण्यास सांगितल्याचे वृत्त आहे.

आंदोलनात उपस्थित राहणे अपेक्षित असताना जे खासदार गैरहजर होते, त्यांच्याकडून अनुपस्थितीचे कारण मागवण्यात येणार असल्याची माहिती आहे. योग्य किंवा समाधानकारक कारण नसलेल्या खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना राहुल गांधी यांनी दिल्याचे वृत्त आहे.

CJP Bengaluru Protest : SIR विरोधात हजारो आंदोलक रस्त्यावर? फ्रीडम पार्कवर ध्रुव राठी, प्रकाश राजही सहभागी

काँग्रेस आणि INDIA आघाडीतील खासदारांना दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आता पक्षांतर्गत उपस्थितीवरही नेतृत्वाकडून लक्ष ठेवले जात असल्याचे चित्र आहे.

मित्रपक्षांच्या नेत्यांनाही दिल्लीत येण्याचे आवाहन

राहुल गांधी यांनी INDIA आघाडीतील मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांशी संपर्क साधून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केल्याची माहिती आहे.

यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि RJD नेते तेजस्वी यादव यांच्या नावांचा समावेश आहे. आंदोलनाची व्याप्ती वाढवून निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील विरोधकांची भूमिका अधिक ठळक करण्याची रणनीती आखली जात असल्याचे वृत्त आहे.

ममता बॅनर्जी दिल्लीला दाखल; राष्ट्रपतींच्या भेटीची शक्यता

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी दिल्लीला येणार असल्याचे सांगितले होते आणि त्या गुरुवारी राजधानीत दाखल झाल्याचे वृत्त आहे. INDIA आघाडीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला असून 8 किंवा 9 ऑक्टोबरला भेट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी बोलताना आंदोलनाची पुढील रणनीती आत्ताच जाहीर करता येणार नसल्याचे सांगितले. तसेच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत आंदोलनादरम्यान झालेल्या घटनांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

दिल्लीतील आंदोलन आणखी तीव्र होणार?

INDIA आघाडीच्या आंदोलनाचा तिसरा दिवस असून गुरुवारी विरोधी खासदारांनी गांधी स्मारकाकडे जाण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनादरम्यान सुमारे 300 खासदार शांततापूर्ण आंदोलन करू इच्छित असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी राजघाट परिसरात जमावबंदीचे आदेश लागू केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे विरोधकांच्या आंदोलनाला प्रशासनाकडून कशा प्रकारे प्रतिसाद दिला जातो, तसेच राष्ट्रपतींसोबतची संभाव्य भेट कधी होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

SIR वरून देशात राजकीय रणकंदन; मात्र 42 निवृत्त न्यायमूर्ती-अधिकाऱ्यांचा ज्ञानेश कुमारांना खुलं समर्थन, विरोधी पक्षांना सुनावलं

Web Title: Rahul gandhi india bloc protest sir protest rahul gandhi absent mps show cause notice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 01:21 AM

Topics:  

  • Congress
  • Gyanesh Kumar
  • INDIA Alliance
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rohit Pawar : रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा मोठा दावा, डीके शिवकुमार यांच्यासोबत झाली बैठक?
1

Rohit Pawar : रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा मोठा दावा, डीके शिवकुमार यांच्यासोबत झाली बैठक?

Mumbai News : ‘META भाजपाचा बेटा’ म्हणत मुंबईत युवक काँग्रेस आक्रमक, BKC कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी
2

Mumbai News : ‘META भाजपाचा बेटा’ म्हणत मुंबईत युवक काँग्रेस आक्रमक, BKC कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी

Ravindra Chavan : राहुल गांधींवर रविंद्र चव्हाण संतापले! 2014 पूर्वीचा आणि नंतरचा भारत दाखवत दिलं प्रत्युत्तर
3

Ravindra Chavan : राहुल गांधींवर रविंद्र चव्हाण संतापले! 2014 पूर्वीचा आणि नंतरचा भारत दाखवत दिलं प्रत्युत्तर

Rajasthan Panchayat Election 2026: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय; भाजपला मोठा धक्का
4

Rajasthan Panchayat Election 2026: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय; भाजपला मोठा धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.