Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi Protest : सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये राडा; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधीसह INDIA आघाडी आक्रमक

Rahul Gandhi Protest : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे. सलग दोन दिवस राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता राजघाटावर आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 08, 2026 | 04:42 PM
Rahul Gandhi Protest

Rahul Gandhi Protest

Follow Us
Follow Us:
  • ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीचं आंदोलन सलग तिसऱ्या दिवशी सुरू.
  • राहुल गांधींसह अनेक खासदारांना मागील दोन दिवसांत दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं.
  • आज राजघाटावर जवळपास 300 खासदार शांततेत आंदोलन करणार असल्याचा राहुल गांधींचा दावा.
 

Rahul Gandhi Protest : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत पुन्हा राडा सुरु झाला आहे. आधी ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’ कडून जोरदार आंदोलन करण्यात आले. आता काँग्रेसनेही जोरदार आंदोलनाला सुरुवात केली असून आज (8 ऑकटोबर) सलग तिसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते राहुल गांधी इंडिया आघाडीच्या खासदारांसह आणि कार्यकर्त्यांसह मैदानात उतरले आहेत.

राहुल गांधींना सलग दोन दिवस पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आज तिसऱ्या दिवशीही राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राजघाट या ठिकाणी इंडिया आघाडीचे खासदार आंदोलनाला उतरणार आहेत.

सलग दोन दिवस राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

इंडिया आघाडीचं आंदोलन गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये सुरू आहे. मंगळवारी राहुल गांधींसह अनेक खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या दिशेने निघाले होते. मात्र पोलिसांनी त्यांना अडवल्यानंतर राहुल गांधी यांनी आकाशवाणी भवन परिसरात ठिय्या आंदोलन केलं. तब्बल आठ तासांनंतर पोलिसांनी राहुल गांधींसह आंदोलनकर्त्या खासदारांना ताब्यात घेतलं.

CJP Protest 10 October: १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी अभिजीत, सौरव आणि आशुतोषच्या अडचणी वाढणार? दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय

दुसऱ्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीच्या खासदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. त्यानंतर खासदार जंतर-मंतरच्या दिशेने निघाले. मात्र पोलिसांनी त्यांना पुन्हा अडवलं. यावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेण्यात आलं.

आज राजघाटावर जवळपास 300 खासदारांचं आंदोलन

सलग दोन दिवस पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही इंडिया आघाडीचा आक्रमक पवित्रा कायम आहे. आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार राजघाटाच्या दिशेने रवाना झाले. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जवळपास 300 खासदार शांततेत आंदोलन करणार असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं.

‘व्होट चोरी करून लोकशाही संपवली’

गेल्या दोन दिवसांपासून सरकार आपल्याला आंदोलन करू देत नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार यांनी ‘व्होट चोरी’ करून देशातील लोकशाही संपवली, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

या प्रकरणात संबंधितांना शिक्षा मिळणारच, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दिल्लीतील आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत.

CJP Protest : 10 ऑक्टोबरला दिल्ली दणाणणार? CJPच्या आंदोलनाला आता शेतकऱ्यांचा पाठिंबा; ‘बॅरिकेड्स तोडण्यासाठी ट्रॅक्टर तयार’

Web Title: Rahul gandhi protest gyanesh kumar resignationi india alliance rajghat protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Gyanesh Kumar
  • INDIA Alliance
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rajghat Protest Day 3 Delhi News: मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधकांचे रान पेटले! राहुल गांधीसह विरोधी पक्षनेते आज राजघाटवर
1

Rajghat Protest Day 3 Delhi News: मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधकांचे रान पेटले! राहुल गांधीसह विरोधी पक्षनेते आज राजघाटवर

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
2

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

ध्रुव राठी आणि अभिजीत दीपके एकत्र! बंगळुरू-दिल्ली आंदोलनाने राजकीय वातावरण तापणार!
3

ध्रुव राठी आणि अभिजीत दीपके एकत्र! बंगळुरू-दिल्ली आंदोलनाने राजकीय वातावरण तापणार!

CJP Protest : 10 ऑक्टोबरला दिल्ली दणाणणार? CJPच्या आंदोलनाला आता शेतकऱ्यांचा पाठिंबा; ‘बॅरिकेड्स तोडण्यासाठी ट्रॅक्टर तयार’
4

CJP Protest : 10 ऑक्टोबरला दिल्ली दणाणणार? CJPच्या आंदोलनाला आता शेतकऱ्यांचा पाठिंबा; ‘बॅरिकेड्स तोडण्यासाठी ट्रॅक्टर तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.