Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Railways News: रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठा झटका! निवृत्तीच्या वेळी मिळणारी २० वर्षांची ‘ही’ खास परंपरा बंद; काय आहे कारण?

Railway Retirement Medal Canceled: रेल्वे मंत्रालयाने निवृत्त कर्मचाऱ्यांना सोन्याचा मुलामा दिलेली रौप्य पदके देण्याची २० वर्षांची जुनी परंपरा बंद केली आहे. भोपाळमधील पदक घोटाळ्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 29, 2026 | 08:16 PM
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठा झटका! निवृत्तीच्या वेळी मिळणारी २० वर्षांची 'ही' खास परंपरा बंद (Photo Credit- X)

रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठा झटका! निवृत्तीच्या वेळी मिळणारी २० वर्षांची 'ही' खास परंपरा बंद (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठा झटका!
  • निवृत्तीच्या वेळी मिळणारी २० वर्षांची ‘ही’ खास परंपरा बंद
  • काय आहे कारण?
Railway Retirement Medal Canceled: भारतीय रेल्वेमधील लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. रेल्वे मंत्रालयाने निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना ‘सोन्याचा मुलामा दिलेली रौप्य पदके’ (Gold-Plated Silver Medals) देण्याची २० वर्षांची जुनी परंपरा कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाच्या या नवीन आदेशामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

काय आहे रेल्वेचा नवीन आदेश?

रेल्वे बोर्डाच्या प्रधान कार्यकारी संचालक रेणू शर्मा यांनी यासंदर्भात एक औपचारिक पत्र प्रसिद्ध केले आहे. या आदेशानुसार, यापुढे निवृत्त रेल्वे अधिकाऱ्यांना निरोप समारंभात सोन्याचा मुलामा दिलेली रौप्य पदके दिली जाणार नाहीत. मार्च २००६ पासून रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ २० ग्रॅम वजनाचे हे खास पदक देण्याची प्रथा सुरू केली होती, जी आता संपुष्टात आली आहे.

#BREAKING Indian Railways has discontinued its nearly 20-year-old practice of presenting gold-plated silver medals to retiring officials, following the fake silver coin scam. The Railway Board issued an official order halting the tradition with immediate effect. The decision… pic.twitter.com/pzdkLdnq2g — IANS (@ians_india) January 29, 2026

देवदूत ठरले RPF जवान! ऑपरेशन जीवन रक्षा आणि मातृशक्ती अंतर्गत वाचवला प्रवाशाचा जीव, धावत्या ट्रेनमध्ये केली सुरक्षित प्रसूती

भोपाळमधील ‘पदक घोटाळा’ ठरला मुख्य कारण?

रेल्वेने अचानक हा निर्णय का घेतला, यामागे भोपाळ विभागात उघडकीस आलेला एक मोठा घोटाळा असल्याचे मानले जात आहे. एका अंतर्गत चौकशीत असे आढळले की, कर्मचाऱ्यांना दिलेली अनेक पदके बनावट होती. ज्या पदकांमध्ये चांदी असल्याचा दावा केला होता, त्यात चांदीचे प्रमाण केवळ ०.२३ टक्के इतके अत्यल्प निघाले. या फसवणुकीनंतर रेल्वेने संबंधित पुरवठादारावर एफआयआर (FIR) दाखल करून त्याला ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठीच ही पद्धत बंद करण्याचा टोकाचा निर्णय घेण्यात आला आहे.

जुन्या साठ्याचे काय होणार?

रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे की, रेल्वेकडे सध्या असलेला पदकांचा साठा आता निवृत्ती भेट म्हणून वापरला जाणार नाही. हा साठा इतर प्रशासकीय कामांसाठी किंवा पर्यायी कारणांसाठी वापरण्यात येईल.

हा नियम कधीपासून लागू होणार?

रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार, हा नवीन नियम ३१ जानेवारी २०२६ रोजी किंवा त्यानंतर निवृत्त होणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू होईल. म्हणजेच, फेब्रुवारी २०२६ पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हाती आता हे मानाचे पदक पडणार नाही.

मराठवाड्यातून पुण्याला जाणाऱ्या अनेक रेल्वे हडपसरपर्यंतच धावणार; प्रवाशी संघटना आक्रमक

Web Title: Railway cancels gold plated silver medals retirement gift tradition new rule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 08:16 PM

Topics:  

  • Indian Railway
  • Medal
  • Nation News
  • railway

संबंधित बातम्या

Punjab Train Blast: प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी मोठा झटका,RDX ने थेट रेल्वे रुळच उडवले, हायअलर्ट जारी
1

Punjab Train Blast: प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी मोठा झटका,RDX ने थेट रेल्वे रुळच उडवले, हायअलर्ट जारी

जेजुरी स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्या; प्रवासी संघटना अन् लोकप्रतिनिधी आक्रमक
2

जेजुरी स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्या; प्रवासी संघटना अन् लोकप्रतिनिधी आक्रमक

Railway News: जेजूरीला जाताय? मग आधी बातमी वाचाच; लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांबाबत केली ‘ही’ मागणी
3

Railway News: जेजूरीला जाताय? मग आधी बातमी वाचाच; लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांबाबत केली ‘ही’ मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.