Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रामटेक राम मंदिराचे ‘श्री राम मंदिर देवस्थान’ म्हणून पुनर्गठन; विधानसभा मंजूर विधेयकामुळे बदलणार व्यवस्थापन

नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिराच्या व्यवस्थापनात मोठा बदल होणार आहे. मंदिराच्या प्रशासनात अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्याच्या उद्देशाने 'श्री राम मंदिर देवस्थान' पुनर्गठन विधेयकाला विधानसभेची मंजुरी मिळाली आ

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 11, 2026 | 10:35 AM
रामटेक राम मंदिराचे 'श्री राम मंदिर देवस्थान' म्हणून पुनर्गठन; विधानसभा मंजूर विधेयकामुळे बदलणार व्यवस्थापन

रामटेक राम मंदिराचे 'श्री राम मंदिर देवस्थान' म्हणून पुनर्गठन; विधानसभा मंजूर विधेयकामुळे बदलणार व्यवस्थापन

Follow Us
Follow Us:
  • रामटेकच्या श्रीराम मंदिरासाठी नवीन विश्वस्त व्यवस्थेच्या विधेयकाला विधानसभेची मंजुरी.
  • मंदिराचे प्रशासन आता ‘श्री राम मंदिर देवस्थान’ नावाने नव्या व्यवस्थेत चालवले जाणार.
  • विधेयकावर विरोधकांनी आक्षेप घेत संयुक्त समितीकडे पाठवण्याची मागणी केली होती.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील ऐतिहासिक आणि प्राचीन भोसला देवस्थान चे प्रशासन अधिक सुयोग्य, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठीचे विशेष विधेयक आज विधानसभेत विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जैसवाल यांनी मांडले. या विधेयकावर सभागृहात प्रदीर्घ आगि सविस्तर चर्चा झाल्यानंतर अखेर या महत्त्वपूर्ण विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. न्यायालयाच्या देखरेखीकडून शासकीय नियंत्रणाकडे रामटेक येथील हे मंदिर श्री रामांचे एक प्राचीन व ऐतिहासिक मंदिर असून, त्याला खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे. दरवर्षी रामनवमी व कार्तिक पौणिमिच्या उत्सवाप्रसंगी देश-विदेशातून लाखो भक्तगण या देवस्थानला भेट देतात. सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार, न्यायालय धारक म्हणून उप-विभागीय अधिकारी, रामटेक यांच्या देखरेखीखाली या देवस्थानचे प्रशासन व व्यवस्थापन पाहिले जात आहे. यापुढे ही व्यवस्था ‘श्री राम मंदिर देवस्थान’ च्या नावाने कार्यरत होईल.

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचे थैमान; भूस्खलन, पूरामुळे जनजीवन विस्कळीत, IMD कडून अलर्ट जारी

विधेयकाची उद्दिष्टे व कारणे

  • वाढती व्याप्ती आणि आर्थिक व्यवहार देवस्थानची वाढती कार्य, वाढणारा विस्तार, मीठे आर्थिक व्यवहार आणि प्रलंबित कायदेशीर प्रकरणे विचारात घेता सध्याच्या व्यवस्थापन संरचनेत मर्यादा येत होत्या. त्यामुळे एका स्वतंत्र वैधानिक यंत्रणेची आवश्यकता निर्माण झाली होती.
  • नवीन व्यवस्थापन समिती व पुनर्गठन या विधेयकानुसार आता या देवस्थानचे ‘श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्तव्यवस्था (रामटेक) या नावाने पुनर्गठन करण्यात येणार आहे.
  • पारदर्शकता आणि भाविकांना सुविधा राज्य शासनाव्या इंट नियंत्रणाखाली व देखरेखीखाली देवस्थानसाठी एक विशेष वावस्थापन समिती गठीत केली जाईल आणि कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल.
रामटेक ट्रस्ट विधेयकावर विरोधकांनी सरकारला घेरले

विधानसभेत मांडण्यात आलेल्या ‘श्री रामा मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था, रामटेक विधेयका’ वर अयोध्येतील राम मंदिराचा संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मंदिर ट्रस्टमध्ये राजकीय व्यक्तींना स्थान देण्यास विरोध करत हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याची मागणी दोन्ही नेत्यांनी केली.
जयंत पाटील यांनी अयोध्येच्या राम मंदिर ट्रस्टवर लोकप्रतिनिधी नसल्याचे उदाहरण देत, रामटेक मंदिर ट्रस्टवरही राजकीय व्यक्तींना स्थान देऊ नये, असे सांगितले. राजकारणामुळे मंदिर व्यवस्थापनात भ्रष्टाचार वाढण्याची भीती व्यक्त केली.

Supreme Court News: कागदपत्रे उधळली, सरन्यायाधीशांविरोधात अपशब्द…! सुप्रीम कोर्टात वकीलाचा पुन्हा हायव्होल्टेज ड्रामा

पारदर्शकता आवश्यक

विजय वडेट्टीवार यांनी अयोध्येतील राम मंदिरातील कवित आर्थिक गैरव्यवहारांचा संदर्भ देत श्रद्धास्थानांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आवश्यक असल्याचे म्हटले. मंदिर ट्रस्टमध्ये लोकप्रतिनिधी किया राजकीय व्यक्तीऐवजी सेवाभावी, निष्कलंक आणि श्रद्धेने काम करणाऱ्या व्यक्तीना संधी द्यावी, अशी त्यांची भूमिका होती. विद्यमान समितीवर कोणतेही आरोप नसताना नवीन ट्रस्टची आवश्यकता काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. रामटेक मंदिराची पवित्रता, भाविकांचा विश्वास आणि पारदर्शक कारभार सुनिश्चित करण्यासाठी हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवून सखोल विचारांतीच मंजूर करावे, अशी मागणी दोन्ही नेत्यांनी केली.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Ramtek shri ram mandir devsthan bill passed in maharashtra assembly new trust management

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • Nagpur
  • NAVARASHTRA
  • ram mandir

संबंधित बातम्या

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती
1

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज
2

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज

MPSC Students: ठोस निर्णय घ्या, अन्यथा विद्यार्थी तीव्र पावले उचलतील! रोहित पवारांचा सरकारला इशारा
3

MPSC Students: ठोस निर्णय घ्या, अन्यथा विद्यार्थी तीव्र पावले उचलतील! रोहित पवारांचा सरकारला इशारा

समस्या सुटली नाही तर वाहनांची तोडफोड… कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवरून मनसे आक्रमक
4

समस्या सुटली नाही तर वाहनांची तोडफोड… कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवरून मनसे आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.