Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि ‘आप’चा पराभव; ‘ही’ मोठी कारणे आली समोर

दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने लोकसभा निवडणूक एकत्र निवडणूक लढले होते. लोकसभा निवडणुकीत इंडिया अलायन्स (काँग्रेस-आप) दिल्लीत एकही जागा जिंकू शकली नाही. पराभवाचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसने काही दिवसांपूर्वी दिल्लीत बैठक बोलावली होती. यात दिल्लीतील लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधण्यात आली.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 16, 2024 | 08:24 AM
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि ‘आप’चा पराभव; ‘ही’ मोठी कारणे आली समोर
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली:  दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने लोकसभा निवडणूक एकत्र निवडणूक लढले होते. लोकसभा निवडणुकीत इंडिया अलायन्स (काँग्रेस-आप) दिल्लीत एकही जागा जिंकू शकली नाही. पराभवाचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसने काही दिवसांपूर्वी दिल्लीत बैठक बोलावली होती. यात दिल्लीतील लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधण्यात आली. यानुसार  काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने या पराभवामागचे कारण सांगितले जात आहे.

दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव

राष्ट्रीय पातळीवर आप आणि काँग्रेसमध्ये युती होती, पण दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ही युती तळागाळात मजबूत करता आली नाही. दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव देखील होता, ज्यामुळे राजधानीतील सातही जागांवर इंडिया आघाडीचा पराभव झाला. मात्र या निवडणुकीत आम आदमी पक्षासोबतच्या युतीचा दिल्लीत काँग्रेसला फारसा फायदा झाला नाही.

आम आदमी पक्षाची मतांची टक्केवारी जास्त होती

आम आदमी पार्टीने 2024 ची लोकसभा निवडणूक काँग्रेससोबत आघाडी करून लढवली होती. या निवडणुकीत आम आदमी पक्षाची मतांची टक्केवारी 24.17 टक्के होती, तर काँग्रेसला 18.91 टक्के मते मिळाली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 22.51% मते मिळाली, तर आम आदमी पार्टीला 18.11% मते मिळाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सातही जागा जिंकल्या होत्या. पाच जागांवर काँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या, तर आम आदमी पक्षाचे उमेदवार दोन जागांवर दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

निवडणुकीत ‘आप’ने जास्तीची एक जागा  लढवली

2024 मध्ये आम आदमी पार्टीने काँग्रेसपेक्षा एक जागा जास्त लढवली होती. काँग्रेसने तीन जागांवर तर आम आदमी पार्टीने चार जागांवर निवडणूक लढवली. या कारणास्तव 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये आम आदमी पक्षाच्या मतांची टक्केवारी वाढली. तसेच, आम आदमी पक्षाने ज्या जागा लढवल्या त्या लोकसंख्येच्या आधारावरही मोठ्या आहेत, त्यामुळे 2024 मध्ये पक्षाची मतांची टक्केवारी मागील निवडणुकीपेक्षा वाढली आहे.

भाजपकडून ‘आप’च्या मतदारांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न

या निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी 56.86% वरून 54.35% घसरली असली तरी, त्यांनी दिल्लीच्या सर्व सात जागा जिंकल्या. विशेष बाब म्हणजे जेजे क्लस्टर या  झोपडपट्टी भागातही भाजपने आम आदमी पक्षाचा पराभव करत त्यांच्या बाल्लेकिल्ल्याला सुरुंग लावला.

त्यामुळे काँग्रेसचेही नुकसान

२०२४ च्या लोकसभा निकाल पाहता विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने विचार केला तर करावल नगर, घोंडा, रोहतास नगर, बुरारी या जागांवर काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब आहे. महाबल मिश्रा, अरविंदर सिंग लवली, प्रल्हाद सिंग साहनी, नीरज बसोया, राजकुमार चौहान यांसारख्या लोकांनी वेगवेगळ्या कारणांमुळे काँग्रेस सोडली. अशा स्थितीत राजधानीत पक्षाची संघटना गेल्या काही वर्षांत खूपच कमकुवत झाली आहे. आता अशा स्थितीत दिल्लीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा काँग्रेस संघटन बांधण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर असेल.

Web Title: Reasons for defeat of congress and aap in lok sabha elections these big reasons came to the fore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2024 | 08:24 AM

Topics:  

  • aam adami party
  • BJP
  • Congress
  • loksabha election 2024
  • New Delhi

संबंधित बातम्या

Amit Shah : ‘2014 आधी देश भ्रष्टाचार-जातीवाद-परिवारवादाने ग्रासला होता’; शाहांचा मोदींच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीवर मोठा दावा
1

Amit Shah : ‘2014 आधी देश भ्रष्टाचार-जातीवाद-परिवारवादाने ग्रासला होता’; शाहांचा मोदींच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीवर मोठा दावा

Amit Shah Maharashtra Visit : अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
2

Amit Shah Maharashtra Visit : अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

NDAमध्ये सर्व काही आलबेल? JDUच्या ‘सत्ता रहे या ना रहे’ वक्तव्यानंतर CM सम्राट चौधरींनी बोलावली भाजप मंत्र्यांची बैठक
3

NDAमध्ये सर्व काही आलबेल? JDUच्या ‘सत्ता रहे या ना रहे’ वक्तव्यानंतर CM सम्राट चौधरींनी बोलावली भाजप मंत्र्यांची बैठक

Bihar Politics: NDA ची सत्ता जाणार? बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट; नितीश कुमारांच्या निकटवर्तीयाचा मोठा दावा
4

Bihar Politics: NDA ची सत्ता जाणार? बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट; नितीश कुमारांच्या निकटवर्तीयाचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.