
दिल्लीतील लाल किल्ला स्फोट 'आतंकी हल्ला'च (Photo Credit - X)
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी (१० नोव्हेंबर २०२५) झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटाच्या (Delhi Red Fort Blast) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी नवी दिल्लीत सीसीएस (Cabinet Committee on Security) ची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधानांनी स्फोटामागील दोषी दहशतवादी सिंडिकेट पूर्णपणे नष्ट करण्याची शपथ घेतली.
हल्ल्याचा तीव्र निषेध
सीसीएसच्या बैठकीनंतर तातडीने केंद्रीय मंत्रिमंडळाची (Cabinet) बैठक झाली. या बैठकीत एक प्रस्ताव संमत करण्यात आला, ज्यात दिल्ली स्फोटाला ‘घृणास्पद दहशतवादी घटना’ म्हणून जाहीर करण्यात आले आणि या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. या हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाने दोन मिनिटांचे मौन पाळले.
दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांना तातडीने ओळखण्याचे निर्देश
पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या या कॅबिनेट बैठकीत लाल किल्ला स्फोट आणि दहशतवाद्यांना पकडण्यावर सविस्तर चर्चा झाली. हा दहशतवादी मॉड्यूल आंतरराज्यीय असल्यामुळे, कडक सुरक्षा व्यवस्था आणि या नेटवर्कशी संबंधित लोकांच्या अटकेवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
#WATCH | केंद्रीय मंत्रिमंडल ने 10 नवंबर की दिल्ली आतंकवादी घटना की निंदा करते हुए एक प्रस्ताव पारित किया और पीड़ितों के प्रति अपनी श्रद्धांजलि अर्पित की।#DelhiBlast #RedFortBlast | @MIB_India @AshwiniVaishnaw @PIB_India pic.twitter.com/sL4BNflmwt — डीडी न्यूज़ (@DDNewsHindi) November 12, 2025
Delhi Bomb Blast होणार याची आधीच झाली होती भविष्यवाणी? Viral पोस्टने उडाली एकच खळबळ
सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय आणि भूमिका
या हल्ल्यामागील दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांची लवकर ओळख करून त्यांना तात्काळ न्यायव्यवस्थेच्या कठघऱ्यात उभे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मोदी सरकारने या स्फोटाला ‘जघन्य दहशतवादी घटना’ ठरवून दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण कायम ठेवण्याची अटल बांधिलकी व्यक्त केली. सरकारने दिल्लीतील या हल्ल्याला ‘युद्ध कृत्य’ मानले आहे.
कॅबिनेट बैठकीनंतरचा महत्त्वपूर्ण ठराव
मंत्रिमंडळाने आपल्या ठरावात, १० नोव्हेंबर २०२५ च्या संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटात राष्ट्रविरोधी शक्तींनी केलेल्या घृणास्पद दहशतवादी घटनेचा तीव्र निषेध केला. स्फोटात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त करत शोकाकुल कुटुंबांबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यात आली आणि जखमी लोक लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी, विपरीत परिस्थितीतही साहस दाखवणाऱ्या अधिकारी, सुरक्षा एजन्सी आणि नागरिकांच्या वेळेवर आणि समन्वित प्रतिसादाची प्रशंसा करण्यात आली.
तपास आणि अंमलबजावणी
घटनेचा तपास अत्यंत तत्परता आणि व्यावसायिकतेने पुढे नेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून गुन्हेगार आणि त्यांच्या म्होरक्यांना कोणताही विलंब न करता न्याय मिळेल. मंत्रिमंडळाने राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेप्रती असलेली सरकारची बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली.
दिल्लीत हा शक्तिशाली स्फोट कसा झाला
सोमवारी संध्याकाळी ६:५२ वाजता, देशाची राजधानी दिल्ली नेहमीप्रमाणे गजबजली होती. त्याच क्षणी, लाल किल्ल्याजवळ एका हुंडई आय२० कारमध्ये एक शक्तिशाली स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचा आवाज दूरवर ऐकू आला. या प्राणघातक स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला आणि २० हून अधिक जण जखमी झाले ज्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. आता, या स्फोटातील गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे जेणेकरून त्यांना त्यांच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा व्हावी.