दिल्ली बॉम्ब स्फोटात समोर आली नवीन माहिती (फोटो- सोशल मीडिया)
दिल्लीतील स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचा संशय
या हल्ल्याबाबत आधीच करण्यात आली होती भविष्यवाणी
या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू तर ३० पेक्षा जास्त जखमी
सोमवारी संध्याकाळच्या सुमारास राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या सुमारास मेट्रो स्टेशन परिसरात भीषण स्फोटझाला. धावत्या कारमध्ये हा स्फोट करण्यात आला. या स्फोटात १० जणांचा मृत्यू तर ३० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. दरम्यान हा स्फोट झाल्यानंतर ज्योतिषी प्रशांत किणी यांची एक पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.
ज्योतिषी प्रशांत किणी यांची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. काही महीने आधी त्यांनी ‘पहलगाम २’ होण्याबाबत भविष्यवाणी केली होती. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात घटना घडण्याची शक्यता देण्यात आली होती. राजधानी दिल्लीत हा स्फोट झाल्यानंतर लगेचच ही पोस्ट व्हायरल झाली आहे. लोकांनी त्यांची भविष्यवाणी लाल किल्ला स्फोट प्रकरणाशी जोडण्यास सुरुवात केली आहे.
पोस्टमध्ये काय?
ज्योतिषी प्रशांत किणी यांनी दिल्लीतील स्फोटानंतर एक पोस्ट केली आहे. यामध्ये रेड फोर्टवर झालेला स्फोट हा एक दहशतवादी हल्ला आहे. घटनास्थळापासून ३०० मीटर अंतरावर मानवी शरीराचे अवयव विखुरलेले आहेत…!”
Red Fort car blast is a Terrorist Attack…💯✅️
For Pahalgam-2 like Terrorist Attack they activated .5 front…
CNG blast can't kill 11+…
Almost 30+ people got injured..
Human body parts scattered up to 300 meters away from the blast sight…!!
People who use to say Red fort… https://t.co/ubgk8DjZrR — Prashanth Kini (@AstroPrashanth9) November 11, 2025
त्यांनी या घटनेचे वर्णन एक दहशतवादी हल्ला म्हणून केले आहे.
Delhi Blast मध्ये दहशतवाद्यांचे मोठे प्लॅनिंग
राजधानी दिल्लीत सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ एक भीषण स्फोट झाला. त्यात १० जणांचा मृत्यू झाला तर ३० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेचा तपास एनआयएकडे देण्यात आला आहे. या घटनेचा तपास जस जसा पुढे जात आहे, यामध्ये नवनवीन खुलासे समोर येत आहेत. तपास यंत्रणांना एक डिजिटल चॅटबॉक्स मिळाला आहे. यातून अनेक खुलासे समोर आले आहेत.
चॅटबॉक्समध्ये आरोपींचे महत्वाचे चॅट समोर आले आहेत. यामध्ये अनेक कोडवर्डसचा वापर करण्यात आला आहे. याचा वापर करून हा स्फोट घडवण्यात आल्याचे समोर आले आहे. स्फोटाच्या घटनेत ‘दावत’ (मेजवानी) या शब्दाचा वापर करण्यात आला. स्फोटक पदार्थांचे वर्णन बिर्याणी म्हणून करण्यात आले.
‘दावत के लिए बिरयानी…’; Delhi Blast मध्ये दहशतवाद्यांचे मोठे प्लॅनिंग; चॅटबॉक्स पाहून…
सुरक्षा यंत्रणांना सापडलेल्या डिजिटल चॅटबॉक्समध्ये मेजवानीसाठी बिर्यानी तयार आहे असा शेवटचा मेसेज होता. डॉ. शाहीन यांनी हा संदेश पाठवला होता. त्यानंतर हा चॅटबॉक्स वापरण्यात आला नाही. जैश-ए-मोहम्मदचा धोकादायक प्लॅन, शोबा-ए-दावतचा उलगडा झाला आहे. शाहीन हा भारतातील जमात-उल-मोमिनतचा कमांडर इन चीफ होता. ही संघटना मसुद अजहरची बहीण चालवते.






