Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय हत्या; RJD नेत्यावर थेट झाडल्या सहा गोळ्या, परिसरात एकच खळबळ

RJD Rajkumar Rai murder : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय हत्या झाली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरजेडी नेते राजकुमार राय यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 11, 2025 | 03:22 PM
RJD leader Rajkumar Rai shot dead before Bihar elections Crime News

RJD leader Rajkumar Rai shot dead before Bihar elections Crime News

Follow Us
Close
Follow Us:

RJD Rajkumar Rai murder : पटना : बिहारमध्ये निवडणुकीपूर्वी जोरदार राजकारण रंगले आहे. नेत्यांच्या सभा, रॅली आणि आरोप प्रत्यारोप सुरु असताना दुसरीकडे धक्कादायक प्रकार घडला आहे. मंगळवारी संध्याकाळी पाटनामधील चित्रगुप्त नगर येथे एका राजकीय हत्येने शहर हादरून गेले. राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते आणि प्रॉपर्टी डीलर राजकुमार राय उर्फ ​​आला राय यांची अज्ञात गुन्हेगारांनी गोळ्या घालून हत्या केली.

बिहारमध्ये हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते राजकुमार राय उर्फ ​​आला राय यांच्यी हत्या झाली तेव्हा ते त्यांच्या कारमधून घराजवळ पोहोचले होते. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. जीव वाचवण्यासाठी जखमी राजकुमार राय जवळच्या हॉटेलमध्ये घुसले, परंतु हल्लेखोर त्यांचा पाठलाग करून हॉटेलच्या आत पोहोचले. तिथेही त्यांच्यावर गोळीबार सुरूच होता. या घटनेमुळे आसपासच्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

राजकुमार राय यांच्यावर गोळीबार करण्याता आला असून यामधील एक गोळी हॉटेलच्या फ्रिजलाही लागली आणि त्याची काच फुटली. घटनास्थळावरून पोलिसांना एकूण सहा गोळ्या सापडल्या आहेत. ही घटना अतिशय क्रूरपणे घडवण्यात आली आहे.

रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले

राजकुमार राय यांच्यावर गोळीबाराची घटना झाल्यानंतर लगेचच पोलिस घटनास्थळी पोहोचले. जखमीला पीएमसीएच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी राजकुमार राय यांना मृत घोषित केले. पटना पूर्व एसपी परिचय कुमार यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली आणि सांगितले की मृत व्यक्ती आरजेडीशी संबंधित होते आणि ते प्रॉपर्टी डीलिंग देखील करत असे.

कुटुंबातील सदस्यांचे गंभीर आरोप

(आरजेडी) नेते राजकुमार राय यांच्या हत्येमागे कट असल्याचा आरोप कुटुंबातील लोकांनी केला आहे. मृताची बहीण शिला देवी म्हणाल्या की तिच्या भावाच्या राजकीय कारवाया तीव्र होत्या आणि यावेळी तो राघोपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत होते. गुन्हेगारांनी ८ ते १० राउंड गोळीबार केल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच जर लवकर अटक झाली नाही तर मृतदेह रस्त्यावर ठेवून निषेध केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. तथापि, कुटुंबातील सदस्यांनी अद्याप कोणत्याही आरोपीचे नाव सार्वजनिक केलेले नाही.

क्राईम न्यूज वाचण्यासाठी क्लिक करा 

सीसीटीव्हीमुळे कट उघड होऊ शकतो

या बिहारमधील राजकीय हत्येचे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळाभोवती बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर जप्त करण्यात आला आहे. तसेच तांत्रिक तपासणीद्वारे गुन्हेगारांपर्यंत पोहोचता यावे यासाठी फॉरेन्सिक टीमलाही बोलावण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत माहिती देताना एसपी म्हणाले की, हत्येमागे राजकीय शत्रुत्व किंवा मालमत्तेचा वाद असू शकतो, परंतु खरे कारण तपासानंतरच उघड होईल. बिहारमधील निवडणुकीच्या वातावरणात अशा घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या घटनेमुळे बिहारमध्ये केवळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले नाही तर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

Web Title: Rjd leader rajkumar rai murder shot dead before bihar elections crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 03:22 PM

Topics:  

  • Bihar Election 2025
  • crime news
  • patna news

संबंधित बातम्या

Andekar Gang : आंदेकर टोळीला पुणे पोलिसांचा मोठा दणका; आयुक्तांच्या ‘त्या’ आदेशाने धाबे दणाणले
1

Andekar Gang : आंदेकर टोळीला पुणे पोलिसांचा मोठा दणका; आयुक्तांच्या ‘त्या’ आदेशाने धाबे दणाणले

माढा हादरलं! जय मल्हार कला केंद्राबाहेर गोळीबार; अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ
2

माढा हादरलं! जय मल्हार कला केंद्राबाहेर गोळीबार; अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ

मुलगी झाली म्हणून पत्नीचा गळा दाबून खून; न्यायालयाने पतीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

मुलगी झाली म्हणून पत्नीचा गळा दाबून खून; न्यायालयाने पतीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

स्वत:च्या लग्न खर्चासाठी भरदिवसा चोरी, बंटी- बबली पोलीसांच्या जाळ्यात
4

स्वत:च्या लग्न खर्चासाठी भरदिवसा चोरी, बंटी- बबली पोलीसांच्या जाळ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.