Foreign Minister S Jaishankar
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar ) यांनी मंगळवारी त्यांच्या वडिलांशी संबंधित एक आठवण शेअर केली. ते म्हणाले की माझे वडील प्रशासकीय अधिकारी होते, ते नंतर सचिव झाले. पण आधी इंदिरा गांधी (India Gandhi) आणि नंतर राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांनी त्यांच्यावर खूप अन्याय केला. ते एक उत्तम सचिव होते पण नतंर त्यांना पदावरुन हटवण्यात आलं. अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
[read_also content=”पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना भारत मदत करणार नाही; असं का म्हणाले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर? जाणून घ्या! https://www.navarashtra.com/world/what-jaishankar-said-about-india-help-pakistan-in-economic-crisis-n-rps-371461.html”]
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वडील डॉ. के. सुब्रमण्यम हे एक उत्तम रणनीतिक तज्ज्ञ मानले जातात. यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या कुटुंबाविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या. जयशंकर यांनी सांगितले की ते नोकरशहांच्या कुटुंबातून आले आहेत. जयशंकर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना एक उत्कृष्ट परराष्ट्र सेवेतील अधिकारी बनायचे होते आणि असा विचार करत असताना त्यांच्यासमोर त्यांच्या वडिलांची प्रतिमा तयार झाली. जयशंकर यांनी सांगितले की त्यांचे वडील डॉ. के सुब्रमण्यम हे उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी होते. १९७९ मध्ये जनता सरकारमध्ये त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली आणि ते बहुधा देशातील सर्वात तरुण प्रशासकीय अधिकारी बनले. जयशंकर यांच्या वडिलांचे 2011 मध्ये निधन झाले होते आणि ते आपल्या मुलाला सचिव होताना पाहू शकले नाहीत.
जयशंकर पुढे म्हणाले की, वडिलांसोबत खूप चुकीचं झालं. जयशंकर यांच्या मते, त्यांचे वडील आधी प्रशासकीय अधिकारी होते आणि नंतर ते सचिव झाले. 1980 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या आणि त्यांना पदावरून हटवले तेव्हा ते संरक्षण उत्पादन सचिव होते. जयशंकर म्हणतात, एवढेच नाही तर पुढे राजीव गांधी सरकारमध्येही वडिलांचा मार्ग अडवण्याचे प्रयत्न थांबले नाहीत. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला कॅबिनेट सचिव बनवण्यासाठी त्यांना हटवण्यात आले. जयशंकर यांनी सांगितले की, त्यानंतर त्यांचे वडील कधीच सचिव झाले नाहीत. त्याबद्दल त्याला खेद वाटला, पण ते कधीच त्याबद्दल बोलले नाही. जयशंकर यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांचा मोठा भाऊ पहिल्यांदा सचिव झाला तेव्हा वडिलांना खूप अभिमान वाटला.