Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यायमूर्ती संजीव खन्ना आज घेणार भारताच्या सरन्यायाधीशपदाची शपथ; राष्ट्रपती भवनात होणार कार्यक्रम

2005 साली दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची जबाबदारी सांभाळली होती. 2019 मध्ये न्यायमूर्ती खन्ना यांची सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून बढती झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 11, 2024 | 07:15 AM
न्यायमूर्ती संजीव खन्ना आज घेणार भारताच्या सरन्यायाधीशपदाची शपथ; राष्ट्रपती भवनात होणार कार्यक्रम

न्यायमूर्ती संजीव खन्ना आज घेणार भारताच्या सरन्यायाधीशपदाची शपथ; राष्ट्रपती भवनात होणार कार्यक्रम

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे आता भारताचे 51 वे सरन्यायाधीश बनणार आहेत. राष्ट्रपती भवन येथे आयोजित एका समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना सरन्यायाधीश म्हणून शपथ देतील. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली जात आहे.

हेदेखील वाचा : ‘मी म्हातारा झालेलो नाही’; ‘सरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’ – शरद पवार

न्या. संजीव खन्ना यांनी त्यांच्या सेवेच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणांचा निवाडा दिला. त्यांनी 2005 साली दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची जबाबदारी सांभाळली होती. 2019 मध्ये न्यायमूर्ती खन्ना यांची सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून बढती झाली. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होण्यासाठी त्यांची पदोन्नती वादग्रस्त ठरली होती. 2019 मध्ये, जेव्हा तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली तेव्हा खन्ना न्यायाधीशांच्या वरिष्ठता क्रमवारीत 33 व्या स्थानावर होते. गोगोई यांनी त्यांना सुप्रीम कोर्टासाठी अधिक सक्षम म्हणून पदोन्नती दिली.

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कैलाश गंभीर यांनीही त्यांच्या नियुक्तीविरोधात तत्कालीन राष्ट्रपतींना पत्र लिहिले होते. या विरोधाला न जुमानता राष्ट्रपतींनी खन्ना यांची नियुक्ती केली.

न्यायमूर्ती खन्ना हे सहा महिने सांभाळतील सरन्यायाधीशपदाची धुरा

न्यायमूर्ती संजीव खन्ना, जे दिल्लीतील प्रतिष्ठित घराण्यातील आहेत, ते तिसऱ्या पिढीतील वकील आहेत. न्यायाधीश होण्यापूर्वी त्यांनी 1983 मध्ये तीस हजारी न्यायालयात वकिली सुरू केली. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात कायद्याची प्रॅक्टिसही केली असून, आता पुढील सहा महिने ते देशाच्या मुख्य न्यायाधीशपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात बढती

कॉलेजियमच्या शिफारशीनुसार, 18 जानेवारी 2019 रोजी न्यायमूर्ती खन्ना यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात आल्यानंतर ते 17 जून 2023 ते 25 डिसेंबर 2023 पर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे अध्यक्ष होते. सध्या ते राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष आणि राष्ट्रीय न्यायिक अकादमी, भोपाळचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य आहेत. पुढील वर्षी 13 मे रोजी ते निवृत्त होणार आहेत.

अनेक महत्त्वाच्या प्रकरणांत निर्णय

ईव्हीएमवरून केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांच्याकडून देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश या नात्याने ते अनेक ऐतिहासिक निर्णयांचा एक भाग होते. 26 एप्रिल रोजी न्यायमूर्ती खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा संशय निराधार ठरवला आणि जुन्या कागदी मतपत्रिका प्रणालीकडे परत जाण्याची मागणी नाकारली.

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : ऐन निवडणुकीत ठाकरे सेनेचा भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा; महाविकास आघाडीत खळबळ

Web Title: Sanjiv khanna will take oth of the chief justice of india nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 07:15 AM

Topics:  

  • Chief Justice of India
  • Supreme Court

संबंधित बातम्या

CJP Protest : दिल्ली सरकारवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा उल्लंघनाचा ठपका? ‘या’ प्रकरणी दोन दिवसांत मागितले स्पष्टीकरण
1

CJP Protest : दिल्ली सरकारवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा उल्लंघनाचा ठपका? ‘या’ प्रकरणी दोन दिवसांत मागितले स्पष्टीकरण

New Delhi : दिल्लीत इंटरनेट गुल्लं, मेट्रो सेवा मात्र कायम, गृहमंत्रायलयाने घेतला सीजेपीचा धसका
2

New Delhi : दिल्लीत इंटरनेट गुल्लं, मेट्रो सेवा मात्र कायम, गृहमंत्रायलयाने घेतला सीजेपीचा धसका

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? सर्वोच्च न्यायालयात ३० ऑक्टोबरपर्यंत अंतिम सुनावणीचे उद्दिष्ट
3

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? सर्वोच्च न्यायालयात ३० ऑक्टोबरपर्यंत अंतिम सुनावणीचे उद्दिष्ट

दर्शनच्या अडचणी वाढल्या? Ranukaswami Murder Case प्रकरणी साक्षीदारबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
4

दर्शनच्या अडचणी वाढल्या? Ranukaswami Murder Case प्रकरणी साक्षीदारबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.