Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? सर्वोच्च न्यायालयात ३० ऑक्टोबरपर्यंत अंतिम सुनावणीचे उद्दिष्ट

Shiv Sena Symbol Case: महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाच्या शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाच्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या कायदेशीर संघर्षाची अंतिम सुनावणी ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 09, 2026 | 05:01 PM
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? सर्वोच्च न्यायालयात ३० ऑक्टोबरपर्यंत अंतिम सुनावणीचे उद्दिष्ट

शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? सर्वोच्च न्यायालयात ३० ऑक्टोबरपर्यंत अंतिम सुनावणीचे उद्दिष्ट

Follow Us
Follow Us:
  • शिवसेना कुणाची?
  • धनुष्यबाण कुणाचा?
  • सर्वोच्च न्यायालयात ३० ऑक्टोबरपर्यंत अंतिम सुनावणीचे उद्दिष्ट
Shiv Sena Symbol Case: शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात सुरू असलेल्या वादाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्षांतराचे ‘घटनात्मक पाप’ केल्याचा आरोप असलेल्या लोकांनाही पक्षाच्या निवडणूक चिन्हाशी संबंधित भावना आणि अधिकार लागू व्हावेत का, असा सवाल न्यायालयाने तोंडी निरीक्षणादरम्यान उपस्थित केला.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ३० ऑक्टोबरपर्यंत अंतिम युक्तिवाद पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे तोंडी निरीक्षण नोंदवण्यात आली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर पक्षाचे अधिकृत नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू झालेला वाद न्यायालयात पोहोचला होता. या प्रकरणातील अंतिम निर्णयाला महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष महत्त्व आहे.

Shiv Sena Symbol Case : शिवसेनेच्या पक्षघटनेवर गंभीर सवाल

सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. या खंडपीठात न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांचाही समावेश होता. शिवसेनेतील फुटीनंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता देत धनुष्यबाण चिन्ह बहाल केले होते. या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

मात्र, ३० ऑक्टोबर ही अंतिम सुनावणी पूर्ण करण्यासाठी नमूद केलेली उद्दिष्ट तारीख असून, निकाल जाहीर करण्याची निश्चित तारीख नाही.
पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाचा युक्तिवाद सुनावणीच्या प्रस्तावित वेळापत्रकानुसार, पुढील आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद करण्यात येणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांच्या वतीने निवडणूक आयोगाच्या युक्तिवादावर प्रत्युत्तर सादर केले जाण्याची अपेक्षा आहे. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालय पुढील प्रक्रिया निश्चित करणार आहे.

शिवसेनेच्या २०१८ मधील पक्षघटनेवर प्रश्न

नुकत्याच झालेल्या सुनावणीत निवडणूक आयोगाचे वकील नीरज किशन कौल यांनी शिवसेनेच्या पक्षांतर्गत लोकशाहीच्या मुद्द्यावर युक्तिवाद केल्याची माहिती आहे. त्यांच्या युक्तिवादानुसार, शिवसेनेच्या २०१८ मधील पक्षघटनेत पक्षप्रमुखांना व्यापक आणि अमर्याद अधिकार देण्यात आले होते. त्यामुळे पक्षप्रमुखपद आणि पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व यांच्यातील फरक जवळपास नाहीसा झाला होता, असा मुद्दा त्यांनी न्यायालयासमोर मांडला. पक्षांतर्गत लोकशाही, पक्षघटनेतील तरतुदी आणि संघटनात्मक अधिकार या मुद्द्यांवरून या प्रकरणात कायदेशीर युक्तिवाद सुरू आहेत.

ठाकरे आणि शिंदे गटांसाठी महत्त्वाचा वाद

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटांमध्ये पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हावरून संघर्ष सुरू झाला. निवडणूक आयोगाने यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले होते. या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाच्या निर्णयाची कायदेशीर वैधता तपासत आहे.

दिवाळीपूर्वी निकाल लागणार का?

अंतिम सुनावणी ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट व्यक्त झाल्यामुळे दिवाळीपूर्वी निकाल येण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सुनावणी पूर्ण होणे आणि अंतिम निकाल जाहीर होणे या दोन स्वतंत्र प्रक्रिया आहेत.
न्यायालयाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर झालेली नसल्याने दिवाळीपूर्वीच निर्णय येईल, असे निश्चितपणे सांगता येणार नाही.
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार, याकडे दोन्ही गटांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Shivsena Symbol Case : धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टातील …

Web Title: Shiv sena party name bow arrow symbol dispute supreme court final hearing october 30 2026 sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • Shiv Sena
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Gajanan Kirtikar: शिंदेंच्या शिवसेनेत मोठी नाराजी! गजानन कीर्तिकर ठाकरे गटात परतणार? घरवापसीच्या चर्चांवर स्पष्टच बोलले
1

Gajanan Kirtikar: शिंदेंच्या शिवसेनेत मोठी नाराजी! गजानन कीर्तिकर ठाकरे गटात परतणार? घरवापसीच्या चर्चांवर स्पष्टच बोलले

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट
2

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

दर्शनच्या अडचणी वाढल्या? Ranukaswami Murder Case प्रकरणी साक्षीदारबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
3

दर्शनच्या अडचणी वाढल्या? Ranukaswami Murder Case प्रकरणी साक्षीदारबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम

Satara DCC Bank Election: रामराजे–शेखर गोरे भेटीने राजकीय समीकरणांना धक्का!; हॉटेलमध्ये ‘वन-टू-वन’ खलबते
4

Satara DCC Bank Election: रामराजे–शेखर गोरे भेटीने राजकीय समीकरणांना धक्का!; हॉटेलमध्ये ‘वन-टू-वन’ खलबते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.