Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुप्रीम कोर्टाकडून SBI ला नोटीस; निवडणूक रोख्यांसंदर्भातील सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर

  • By युवराज भगत
Updated On: Mar 21, 2024 | 07:48 PM
SBI on reprimand after SC reprimands! Submit all information regarding election bonds to the Election Commission

SBI on reprimand after SC reprimands! Submit all information regarding election bonds to the Election Commission

Follow Us
Follow Us:

Supreme Court Reprimands SBI : निवडणूक रोख्यांचा सगळा तपशील सार्वजनिक करावा, त्यात कुठलीही लपवाछपवी नको असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला मागच्या सुनावणीत झापले होते. आता स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक आयोगाला विशिष्ट क्रमाकांसह निवडणूक रोख्यांचे सर्व तपशील सादर केले आहेत, असे पत्रच एसबीआयने सर्वोच्च न्यायालयात आज सादर केले आहे.

प्रतिज्ञापत्रात सर्वोच्च न्यायालयाला सांगितले

स्टेट बँकेचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांनी प्रतिज्ञापत्रात सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, “२१ मार्च २०२४ रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ताब्यातील निवडणूक रोख्यांचे सर्व तपशील भारतीय निवडणूक आयोगाला सादर केले आहेत.”

रोख्यांच्या तपशीलात नेमकं काय काय?
बाँड खरेदी करणाऱ्याचे नाव, त्याचे मूल्य आणि विशिष्ट क्रमांक, ज्या पक्षाने तो वटवला त्या पक्षाचे नाव, बाँडची पूर्तता करणाऱ्या राजकीय पक्षांच्या बँक खाते क्रमांकाचे शेवटचे चार अंक आणि रोख रकमेचा क्रमांक, ही माहिती या तपशीलातून देण्यात आली आहे. तसंच, खातेधारकांच्या सुरक्षेचा हवाला देत बँकेने राजकीय पक्ष आणि खरेदीदार या दोन्हींचे संपूर्ण बँक खाते क्रमांक आणि KYC तपशील उघड करणे टाळले आहे.

KYC देणे टाळलं
“राजकीय पक्षांचे संपूर्ण बँक खाते क्रमांक आणि KYC तपशील सार्वजनिक केले जात नाहीत, कारण यामुळे खात्याच्या सुरक्षिततेशी (सायबर सुरक्षा) तडजोड होऊ शकते”, खारा यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. “तसेच, खरेदीदारांचे KYC तपशील सुरक्षेच्या कारणास्तव देखील सार्वजनिक केले जात नाहीत. अशी माहिती प्रणालीमध्ये भरलेली नाही”, असे त्यात नमूद केले आहे.

SBI कडून आता सर्व तपशील उघड

“SBI ने आता सर्व तपशील उघड केले आहेत. १५ फेब्रुवारी २०२४ च्या आदेशानुसार कोणतेही तपशील जाहीर करण्यापासून रोखले गेले नाही”, असंही प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. SBI ने आज शेअर केलेले तपशील निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने काय सुनावलं
निवडणूक रोख्यांचा सगळा तपशील सार्वजनिक करावा त्यात कुठलीही लपवाछपवी नको असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला सुनावलं होतं तसंच ठराविक किंवा निवडक अशी माहिती नको तर सगळे तपशील उघड करा असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. एसबीआय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं पालन करण्यास बांधील आहे. तुम्ही आत्तापर्यंत माहिती का उघड केली नाही? असाही सवाल सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी एसबीआयला केला आहे.

Web Title: Sbi on reprimand after sc reprimands submit all information regarding election bonds to election commission 2024 nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2024 | 07:48 PM

Topics:  

  • Election Commission
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Mamata Banerjee on Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार चोर, त्यांनी मते चोरली अन् EVM जाळली!; ममता बॅनर्जींचा ज्ञानेश कुमारांवर थेट हल्ला
1

Mamata Banerjee on Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार चोर, त्यांनी मते चोरली अन् EVM जाळली!; ममता बॅनर्जींचा ज्ञानेश कुमारांवर थेट हल्ला

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
2

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
3

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका; सुप्रीम कोर्ट पुढील आठवड्यात सुनावणी करणार
4

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका; सुप्रीम कोर्ट पुढील आठवड्यात सुनावणी करणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.