Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Pune Politics: दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयानेही मुख्याधिकाऱ्यांना सर्व २९ लोकप्रतिनीधींच्या कागदपत्रांची कायदेशी आणि तांत्रिक पुर्नपडताळणी करुन तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 30, 2026 | 11:52 AM
Fursungi Uruli Devachi, Santosh Sarode, Fursungi Municipal Council,

Fursungi Uruli Devachi, Santosh Sarode, Fursungi Municipal Council,

Follow Us
Follow Us:
  • फुरसुंगी-उरुळी देवाची नगराध्यक्ष संतोष सरोदे व २८ नगरसेवकांवर बनावट कागदपत्रांचा आरोप
  • राज्य निवडणूक आयोग आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली तक्रार
  • जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना ७ दिवसांत चौकशी अहवालाचे आदेश
Pune Politics:  निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात बनावट सादर केल्याप्रकरणी पुण्यातील फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष सरोदे यांच्यासह तब्बल २८ नगरसेवक अडचणीत आले आहेत. सरोदे यांच्यासह इतर सर्व नगरसेवकांवर गंभीर आरोप करत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका प्रशासनानेही या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. तसेच नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करून सात दिवसात या प्रकरणाचे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

सामाजिक कार्यकर्ते नितेश गायकवाड यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारनुसार, नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करताना संतोष सरोदे आणि नगरसेवकांनी जोडलेली प्रतिज्ञापत्रे आणि इतर कागदपत्रे बनावट आहेत. या सर्व नगरसेवकांनी निवडणुकीच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याने या सर्व दोषी लोकप्रतिनीधींची पदे तात्काळ रद्द करून नगरपरिषदेवर प्रशासक नियुक्त करण्याची मागणी केली आहे.

Asian Games 2026: याला म्हणतात धुमधडाका! सोन्याचा पाऊस, भारताने मिळवले 8 सुवर्णपदक, LA 2028

दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयानेही मुख्याधिकाऱ्यांना सर्व २९ लोकप्रतिनीधींच्या कागदपत्रांची कायदेशी आणि तांत्रिक पुर्नपडताळणी करुन तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

नितेश गायकवाड यांच्या तक्रारीनुसार, निवडणुकीचा अर्ज दाखल करताना नगरसेवकांकडे थकबाकी असतानाही त्यांनी थकबाकी नसल्याचे दाखले सादर केले. काही नगरसेवकांनी स्वत:चे घर असतानाही शपथपत्रात घर नसल्याचे दाखवले आहे. तसेच काही नरसवेकांनी थकबाकी असतानाही, त्यांनी थकबाकी नसल्याचे दाखले दिले आहेत. काही नगरसेवकांबाबत अतिक्रमणाच्या आणि अनधिकृत बांधकामाबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत. एकाच नगरसेवकाचे नाव दोन विधानसभा मतदारसंघाच्या यादीत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, असी मागणी या करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाकडून यासंदर्भातील तक्रार दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने या तक्रारीची दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नगरपालिका प्रशासन शाखेने फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिगटे यांना पत्र पाठवण्यात आले आहे. तक्रारीसोबत तक्रारदाराने यापूर्वीही या प्रकरणी वारंवार अर्ज केल्याचे या पत्रात म्हटले आहे. या तक्रारीतील सर्व मुद्द्यांची चौकशी करून संबंधित नगरसेवकांकडून खुलासे घेण्याचे आणि चौकशीचा अहवाल तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून मोठा दिलासा; दहावी-बारावी परीक्षा शुल्क केले माफ

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना नगराध्यक्ष संतोष सरोदे म्हणाले की, राजकीय कुरघोडी करण्याच्या उद्देशाने काही जणांकडून अशा खोट्या तक्रारी केल्या जात आहेत. पण संबंधित तक्रारींमध्ये कोणतेही तथ्य नसल्याने त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. यासंदर्भातील आपले खुलासे मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्याचेही सरोदे यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्याधिकारी प्रसाद शिगटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या पत्राची दखल घेण्यात आल्याचे सांगितले. संबंधित नगरसेवकांकडून याप्रकरणी खुलासे मागविण्यात आले असून, सर्वांचे खुलासे प्राप्त झाल्यानंतर त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

Web Title: Fursungi uruli devachi municipal council president santosh sarode fake documents probe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • Election Commission
  • Maharashtra Politics
  • Municipal Council
  • pune news
  • Pune Politics

संबंधित बातम्या

राज्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून मोठा दिलासा; दहावी-बारावी परीक्षा शुल्क केले माफ
1

राज्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून मोठा दिलासा; दहावी-बारावी परीक्षा शुल्क केले माफ

महाराष्ट्रातील बालकांच्या आरोग्याचा ‘रिअ‍ॅलिटी चेक’! ९४ लाखांची तपासणी, ६.५८ लाख मुलांमध्ये आरोग्य समस्या
2

महाराष्ट्रातील बालकांच्या आरोग्याचा ‘रिअ‍ॅलिटी चेक’! ९४ लाखांची तपासणी, ६.५८ लाख मुलांमध्ये आरोग्य समस्या

Table Tennis: पुण्यातील टेनिस स्पर्धेत युवा खेळाडूंचा जलवा! ‘या’ चार खेळाडूंची थेट…
3

Table Tennis: पुण्यातील टेनिस स्पर्धेत युवा खेळाडूंचा जलवा! ‘या’ चार खेळाडूंची थेट…

सावधान, सतर्क! ‘प्राध्यापकांनी ‘या’ कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यास…’; Pune विद्यापीठाचा इशारा
4

सावधान, सतर्क! ‘प्राध्यापकांनी ‘या’ कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यास…’; Pune विद्यापीठाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.