
Mamata Banerjee, CEC Gyanesh Kumar, INDIA Bloc Delhi Meeting, EVM Rigging Allegations
विरोधी पक्षांची संघटना असलेल्या इंडिया आघाडीने आज (30 सप्टेंबर) नवी दिल्लीत एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान, विरोधी पक्षांनी एकेक करून आपली भूमिका मांडली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवर जोरदार टीका केली. आम्ही बऱ्याच काळापासून निवडणुकीतील गैरप्रकारांविरोधात आंदोलन करत होतो, पण आता त्यांच्या कारभाराचा पर्दाफाश झाला आहे, अशी टिकाही त्यांनी केली.
Anti-Narcotics Cell : अंमली पदार्थ विरोधी कक्षाची धडक कारवाई, 1.38 कोटींच्या हेरॉईनसह एकाला अटक
टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी म्हणाल्या की, राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी बिहारमधील मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला होता. मतांची चोरी करून भाजपने २०२६ मध्ये मध्य प्रदेश, हरियाणा, बिहारमध्ये विजय मिळवला आणि बंगाल लुटले. “तुम्हाला माहीत आहे, आम्ही लोकांना इथे आणले. आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो. आम्ही सर्वोच्च न्यायालयातही गेलो. आम्ही प्रत्येक घराचा दरवाजा ठोठावला. पण आता हे उघड झाले आहे की ज्ञानेश कुमार एक चोर आहे. त्याने मते चोरली, ईव्हीएम मशीन जाळली, ईव्हीएम मशीन हायजॅक केली आणि मतमोजणीत हेराफेरी केली,” असा हल्लाबोल त्यांनी केला. त्यामुळे, त्याने तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. आपण लोकशाहीचे रक्षण केले पाहिजे. आपण आपल्या लोकांच्या सुरक्षेची खात्री केली पाहिजे.
ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, आपण लोकांच्या मतदानाच्या हक्कांचे संरक्षण केले पाहिजे. हा आपला घटनात्मक हक्क आहे. ही समाजाप्रती आपली जबाबदारी आहे. जर लोक मतदान करत नसतील किंवा त्यांची मते चोरली जात असतील, तर देशाचे काय होईल? त्यामुळे, आमची मागणी आहे की जर ज्ञानेश कुमारने राजीनामा दिला नाही, तर हे आंदोलन खूप पुढे जाऊ शकते. हे आंदोलन पृथ्वीपासून आकाशापर्यंत आणि सूर्यापासून चंद्रापर्यंत पोहोचेल. आपल्याला फक्त एकत्र लढायचे आहे.
जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत विरोधी पक्षांचे आंदोलन सुरूच राहील. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. तसेच, लोकशाही वाचवण्यासाठी विरोधी पक्षांचे आंदोलन दीर्घकाळ सुरू राहील, असे म्हटले. त्यांनी विद्यार्थी, तरुण आणि पत्रकारांनाही पाठिंब्याचे आवाहन केले.