Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षपदाच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने पक्षात खळबळ उडाली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 30, 2026 | 03:46 PM
Sunil Tatkare NCP, Bombay High Court Aurangabad Bench,

Sunil Tatkare NCP, Bombay High Court Aurangabad Bench,

Follow Us
Follow Us:
  • सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्ष नियुक्तीविरोधातील तक्रारीवर ४ महिन्यांत निर्णयाचे हायकोर्टाचे आदेश.
  • न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी व न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठाकडून निर्णय.
  • परतूर-मंथा मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांच्याकडून उच्च न्यायालयात याचिका
NCP President Appointment:  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नियुक्तीसंदर्भात दाखल झालेल्या तक्रारीवर निवडणूक आयोगाने चार महिन्यांत निर्णय घ्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत हा आदेश देण्यात आलाय

सुनील तटकरे नियुक्ती प्रकरण ?

जालना जिल्ह्यातील परतूर-मंथा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांनी वकील राजेंद्र दासाळकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनील तटकरे यांच्या नियुक्तीसंदर्भात याचिका दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेत नमूद केलेल्या निवडणूक प्रक्रियेचे पालन न करता सुनील तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.

Iran Trolls UN: इराण गॉट नो चिल! ‘या’ भन्नाट ‘शोले’मधील ‘ठाकूर’ च्या मीमने संयुक्त राष्ट्रांना सोशल

८ ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाकडे तक्रार

याचिकाकर्त्याने या प्रकरणी ८ ऑगस्ट, २०२६ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक सविस्तर तक्रार दाखल केली. खंडपीठाने या तक्रारीवर आतापर्यंत केलेल्या कारवाईबाबत निवडणूक आयोगाकडून अहवाल मागवला होता..

 

सुनील तटकरे यांच्या नियुक्तीवर चार महिन्यांत निर्णय होणार

निवडणूक आयोगाचे प्रतिनिधित्व करणारे वकील आलोक शर्मा यांनी न्यायालयाला माहिती दिली की, आयोगाच्या निर्देशानुसार याचिकाकर्त्याच्या तक्रारीवर चार महिन्यांत निर्णय घेतला जाईल. या आश्वासनानंतर, खंडपीठाने संबंधित निर्देश जारी केले आणि याचिका निकाली काढली. आता निवडणूक आयोगाला याचिकाकर्त्याच्या तक्रारीवर निर्धारित वेळेत निर्णय घ्यावा लागेल. नियुक्ती प्रक्रियेबाबत केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोग अंतिम निर्णय घेईल.

INDIA Alliance Meeting In Delhi: देशात लवकरच मोठे बदल…! इंडिया आघाडी मोठा डाव टाकण्याच्या तयारीत, सहा मोठे कार्यक्रम

तटकरे यांची नियुक्ती कोणत्याही निवडणुकीशिवाय एकतर्फी होती

भाऊसाहेब गोरे यांनी आरोप केला आहे की, ३ जुलै २०२३ रोजी सुनील तटकरे यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून झालेली घोषणा पूर्णपणे एकतर्फी होती. त्यांनी दावा केला की, पक्षाच्या घटनेनुसार, राज्य समिती सदस्यांनी पारदर्शक आणि लोकशाही संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेद्वारे अध्यक्षांची निवड करणे बंधनकारक आहे.

 

Web Title: Bombay high court directs election commission to decide on sunil tatkare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • Aurangabad Bench
  • Election Commission
  • High court
  • Maharashtra Politics
  • Nationalist Congress Party
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश
1

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
3

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘;  राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार
4

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘; राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.