Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shashi Tharoor : काँग्रेसमधील अंतर्गत कलह उघड, शशी थरुर म्हणाले, “माझ्याच पक्षातले लोक मला…”

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरुर सध्या चर्चेत आहेत ते पक्षविरोधी भूमिकेमुळे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एलडीएच्या केरळमधील सरकारचं त्यांनी जाहीर कौतुक केलं होतं.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 26, 2025 | 03:22 PM
काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उघड, शशी थरुर म्हणाले, “माझ्याच पक्षातले लोक मला…”

काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उघड, शशी थरुर म्हणाले, “माझ्याच पक्षातले लोक मला…”

Follow Us
Close
Follow Us:

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरुर सध्या चर्चेत आहेत ते पक्षविरोधी भूमिकेमुळे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एलडीएच्या केरळमधील सरकारचं त्यांनी जाहीर कौतुक केलं होतं. राहुल गांधींनी त्यांना तातडीने दिल्लीलाही बोलावून घेतलं होतं. शशी थरुर काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊ शकतात अशी चर्चाही सध्या रंगली आहे. पक्षांतर्गत राजकीय मतभेद आणि कलह सुरू असल्याने शशी थरुर काँग्रेसमधून बाहेर पडतील अशी चिन्हं आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी एका राष्ट्रीय वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केलं आहे.

Shashi Tharoor : मोठी बातमी! नाराज शशी थरूर यांनी पियुष गोयल यांच्यासोबत शेअर केली सेल्फी, तोंडभरून केलं कौतुक

“मी एक उदारमतवादी माणूस आहे. मी जातीयतेचा विरोध दर्शवणारा माणूस आहे. आर्थिक विकास झाला पाहिजे आणि समाजातल्या तळागाळातील माणसाला न्याय मिळाला पाहिजे अशी माझी भूमिका कायमच राहिली आहे. भारतात लोकशाही पद्धत आहे आणि मी त्या लोकशाहीचा सन्मान करतो.” असं शशी थरुर यांनी म्हटलं आहे.

शशी थरुर म्हणाले, “माझ्याच पक्षातील काही लोक माझ्या विरोधात आहेत. मात्र मला भारत आणि केरळ यांच्या भविष्याबाबत बोलायला आवडतं. माझ्याच पक्षातले लोक माझ्यावर टीका करत आहेत. मात्र मी काँग्रेस पक्ष सोडलेला नाही. काँग्रेसबाबत असलेली माझी निष्ठा कायम आहे. जर पक्षाने मला मोठी जबाबदारी दिली तर ती स्वीकारण्यासही मी तयार आहे. माझ्या राजकीय भविष्याविषयी म्हणत असाल तर मी तसा फारसा विचार केलेला नाही. पण सार्वजनिक जीवनात मी समाजसेवा करण्यावर भर देईन.” असं थरुर यांनी म्हटलं आहे.

मी कायमच एक क्लासिक उदारमतवादी माणूस म्हणून काम करत आलो आहे. सध्या माझं आयुष्य सुरळीत सुरु आहे. माझ्या पत्नीच्या निधनानंतर माझ्या आईने मला लग्न कर असंही सांगितलं. मात्र मी समाधानी आहे जे काही चाललं आहे ते व्यवस्थित चाललं आहे, असंही थररुर यांनी म्हटलं आहे.

Shashi Tharoor : ‘पक्षाला माझी गरज नसेल, तर माझ्याकडे पर्याय…’, शशी थरूर यांच्या वक्तव्यांने कॉंग्रेसमध्ये खळबळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पिनराई विजयन यांच्या लेफ्ट ड्रेमोक्रॅटिक फ्रंट सरकारचं थरूर यांनी कौतुक केलं होतं. त्यावर बोलताना ते म्हणाले की, मी माझी मते रोखठोकपणे मांडत आलो आहे. मग ते देशाच्या किंवा केरळच्या विकासासाठी असो. माझ्यासारख्या राजकारण्याने राजकीय विचारांच्या बाबीत लहान विचार करून चालणार नाही. त्यामुळेच मला जे चांगले वाटते, त्याबद्दल मी मोकळ्या मनाने बोलतो, मग काँग्रेस पक्ष त्या गोष्टीच्या विरोधात का असेना, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.

Web Title: Shashi tharoor clarify about dispute in congress party and rumors on joining bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2025 | 03:15 PM

Topics:  

  • Congress
  • indian politics
  • Kerala

संबंधित बातम्या

Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण
1

Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण

निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना, सर्वच पक्षांनी…; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन
2

निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना, सर्वच पक्षांनी…; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात
3

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Palghar Mob Lynching Case:पालघर साधु हत्याकांड प्रकरणातील आरोपीचा भाजप प्रवेश; विरोधकांच्या आरोपानंतर प्रक्षप्रवेशाला स्थगिती
4

Palghar Mob Lynching Case:पालघर साधु हत्याकांड प्रकरणातील आरोपीचा भाजप प्रवेश; विरोधकांच्या आरोपानंतर प्रक्षप्रवेशाला स्थगिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.