मोठी बातमी! नाराज शशी थरूर यांनी पियुष गोयल यांच्यासोबत शेअर केली सेल्फी, तोंडभरून केलं कौतुक
काँग्रेससोबत वाढत्या तणावाच्या बातम्यांदरम्यान केरळ तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारचे कौतुक केले आहे. दरम्यान, त्यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबतचा एक सेल्फीही शेअर केला आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या कॉंग्रेसला केरळमध्येही धक्का बसणार की काय अशा चर्चांना उधाण आलं आहे.
Good to exchange words with Jonathan Reynolds, Britain’s Secretary of State for Business and Trade, in the company of his Indian counterpart, Commerce & Industry Minister @PiyushGoyal. The long-stalled FTA negotiations have been revived, which is most welcome pic.twitter.com/VmCxEOkzc2
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) February 25, 2025
शशी थरूर यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबतचा एक सेल्फी शेअर केला आहे आणि या पोस्टमध्ये, ब्रिटनचे वाणिज्य मंत्री जोनाथन रेनॉल्ड्स आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याशी उत्तम चर्चा झाली. दोन्ही देशांमधील दीर्घकाळापासून थांबलेल्या एफटीए चर्चेचा पुनरारंभ स्वागतार्ह आहे, असं शशी थरूर यांनी म्हटलं होतं.
शशी थरूर यांनी यापूर्वी केरळच्या पिनारायी विजयन सरकारचे कौतुक केले होते. यानंतर थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका भेटीचंही कौतुक केलं. केरळ सरकारचं कौतुक केल्यानंतर, वरिष्ठ सीपीआय (एम) नेते थॉमस आयझॅक म्हणाले होते की जर थरूर काँग्रेस सोडतील तर ते केरळच्या राजकारणात एकटे राहणार नाहीत. त्यांना त्यांची भूमिका स्पष्ट करू द्या, पण थरूर यांना स्वीकारण्यास माकपला कोणतीही अडचण नाही. आमच्या पक्षाने यापूर्वीही अनेक काँग्रेस नेत्यांचं स्वागत केलं आहे. थरूर इतके दिवस काँग्रेसमध्ये राहिले हा एक चमत्कारच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
शशी थरूर यांनी अलिकडच्या एका लेखात केरळच्या पिनारायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या आर्थिक धोरणांचे आणि स्टार्टअप उपक्रमांचे कौतुक केले होते. यांचं मुलाखतीत थरूर यांनी ते काँग्रेसवर अवलंबून नाहीत, असंही म्हटलं होतं.
जर माझी इच्छा असेल तर मी पक्षात राहीन, असे त्यांनी म्हटले होते. जर नसेल तर मला अनेक पर्याय आहेत. असं त्यांनी म्हटलं होतं. तुम्ही असा विचार करू नका की माझ्याकडे वेळ घालवण्याचा पर्याय नाही. माझ्याकडे पर्याय आहेत. माझ्याकडे जगभरातून पुस्तके, भाषणे, भाषण देण्यासाठी आमंत्रणे आहेत, असं स्पष्ट वक्तव्य केल्यानंतर राहुल गांधींनी त्यांना दिल्लीत बोलावून घेतलं होतं.
राहुल गांधींना भेटल्यानंतर त्यांनी सांगितले की, काँग्रेस खासदाराशी त्यांची खूप चांगली चर्चा झाली. बंद दाराआड झालेल्या या बैठकीबद्दल ते अधिक माहिती देऊ शकत नाहीत असेही त्यांनी सांगितलं होतं.