Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonam Wangchuk Health Update: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

Sonam Wangchuk Health Update: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आणि नीट परीक्षेतील कथित अनियमिततेच्या चौकशीच्या मागणीसाठी जंतर मंतर येथे अनिश्चित काळासाठी उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत चालली आहे. गुरुवारी त्यांच्या उपोषणाचा १९वा दिवस होता.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 16, 2026 | 12:56 PM
Sonam Wangchuk Delhi High Court, Sonam Wangchuk Health Update Court,

Sonam Wangchuk Delhi High Court, Sonam Wangchuk Health Update Court,

Follow Us
Follow Us:
  • सोनम वांगचुक यांच्या ढासळत्या प्रकृतीसंदर्भातील याचिकेवर सुनावणी
  • सरकारी रुग्णालयात डॉक्टरांकडून नियमित तपासणी करण्याचे निर्देश
  • शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आणि नीट परीक्षेतील कथित अनियमिततेसाठी जंतर-मंतर वर उपोषण
 

Sonam Wangchuk Health Update: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या ढासळत्या प्रकृतीसंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना, दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठाने सोनम वांगचुक यांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर (PIL) सुनावणी घेतली.

यावेळी न्यायालयाने “सोनम वांगचुक यांचे जीवन अनमोल आहे. त्यांची सरकारी रुग्णालयात डॉक्टरांकडून नियमित तपासणी केली जावी. त्यांच्या आरोग्यावर दररोज लक्ष ठेवले जावे आणि प्रकृती खालावल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तात्काळ योग्य वैद्यकीय उपाययोजना केल्या जाव्यात”असे निर्देश दिले आहेत.

‘मी मरणार नाही..’; व्हिडीओ जारी करत Sonam Wangchuk यांचे देशाला आवाहन

सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने, “सोनम वांगचुक यांची नियमित आरोग्य तपासणी होत आहे का,’ असा प्रश्न केंद्र सरकारला विचारला. सॉलिसिटर जनरल (SG) यांनी न्यायालयाला माहिती दिली की, वांगचुक यांनी संमती दिल्यापासून त्यांची नियमित आरोग्य तपासणी होत असल्याचे सांगितले. सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली. ही जनहित याचिका वकील राकेश कुमार सैनी यांनी दाखल केली होती.

या याचिकेची मागणी काय होती?

बुधवारी, याचिकाकर्ते आणि वकील राकेश कुमार सैनी यांनी न्यायालयाला सांगितले की, आपल्या मूलभूत हक्कांचा वापर करून शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या एका मानवाधिकार कार्यकर्त्याला अशा वागणुकीला सामोरे जावे लागत आहे, ही एक अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी परिस्थिती आहे. ते संपूर्ण राष्ट्रासमोर आपल्या प्राणांचे बलिदान देण्याच्या तयारीत आहेत, असेच दिसत आहे.” याचिकाकर्त्यांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, दिल्ली उच्च न्यायालयाने खटला ऐकण्यास सहमती दर्शवली आणि केंद्र सरकार तसेच दिल्ली सरकारकडून प्रतिसाद मागवला.

आज वांगचुक यांच्या उपोषणाचा १९वा दिवस

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आणि नीट परीक्षेतील कथित अनियमिततेच्या चौकशीच्या मागणीसाठी जंतर मंतर येथे अनिश्चित काळासाठी उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत चालली आहे. गुरुवारी त्यांच्या उपोषणाचा १९वा दिवस होता.

Sonam Wangchuk Hunger Strike:सोनम वांगचूक यांचे उपोषण जबरदस्तीने तोडले जाऊ शकते का, काय आहे नियम?

काल रात्री उशिरा प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओ संदेशात, ५९ वर्षीय वांगचुक म्हणाले, “नमस्कार मित्रांनो, खूप मुश्लिकीलीने माझ्या उपोषणाच्या १८ व्या दिवशी मी तुमच्याशी जेमतेम संपर्क साधू शकत आहे. मला तुमच्याकडून हजारो संदेश येत आहेत, ज्यात तुम्ही मला उपोषण सोडून काहीतरी खाण्यास सांगत आहात. ज्येष्ठ आणि नेते आपले मत मांडत आहेत. काही जण प्रेमाने बोलत आहेत, काही जण रागाने, आणि काहींनी तर सरकारला मला खाण्यास भाग पाडण्यासाठी न्यायालयात अपील केले आहे.”

उपोषण न सोडण्याची मुख्य कारणे

त्यांनी उपोषण न सोडण्यामागे दोन मुख्य कारणे सांगितली. तो म्हणाला, “दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, मी खाल्लं तरी त्यातून काय संदेश जाईल? सरकारला हा संदेश जाईल की, उत्तरदायित्वाची काही गरज राहिली नाही. ते फक्त येतात, बसतात आणि निघून जातात. दुसरी गोष्ट म्हणजे, माझी प्रकृती अशी नाही की मी दोन-चार दिवसांत मरेन. माझ्या अनेक वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. १८ दिवसांच्या उपवासानंतर माझी प्रकृती सामान्य आहे. आज माझा ईसीजीसुद्धा झाला. वैद्यकीय अहवाल फारसा वाईट नाही, त्यामुळे मी काही दिवस चालू शकेन. मी अशक्त आहे, माझे स्नायू साथ देत नाहीत, पण माझे हृदय अजूनही काम करत आहे.

 

Web Title: Sonam wangchuk health delhi high court verdict sonam wangchuk health care instructions pil disposed advocate rakesh saini

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • delhi high court
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

‘सीता के पति…’; जंतर-मंतरवरील कुणाल कामराच्या वक्तव्यावरून नवा वाद, अभिजित दीपकेवरही नेटकऱ्यांचा निशाणा
1

‘सीता के पति…’; जंतर-मंतरवरील कुणाल कामराच्या वक्तव्यावरून नवा वाद, अभिजित दीपकेवरही नेटकऱ्यांचा निशाणा

Sonam Wangchuk Protest: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक मैदानात; वाचा त्यांचा शैक्षणिक प्रवास एका क्लिकवर…
2

Sonam Wangchuk Protest: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक मैदानात; वाचा त्यांचा शैक्षणिक प्रवास एका क्लिकवर…

‘मी मरणार नाही..’; व्हिडीओ जारी करत Sonam Wangchuk यांचे देशाला आवाहन
3

‘मी मरणार नाही..’; व्हिडीओ जारी करत Sonam Wangchuk यांचे देशाला आवाहन

Atul Kulkarni : सोनम वांगचुक यांच्यासाठी अतुल कुलकर्णींचं मोठं पाऊल! करणार एकदिवसीय उपोषण; सरकारला चर्चेसाठी केलं आवाहन
4

Atul Kulkarni : सोनम वांगचुक यांच्यासाठी अतुल कुलकर्णींचं मोठं पाऊल! करणार एकदिवसीय उपोषण; सरकारला चर्चेसाठी केलं आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.