(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, इराणचे सर्वोच्च नेत्याच्या पदी खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेई याने तात्पुरती देशाची सुत्रे हाती घेतल्याचे सांगितले जात आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. सध्या इराणमध्ये कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून देशात ४० दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच सरकारी इमारतींना लष्करी छावणीचे रुप आले असून अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले जात आहेत.
मोजतबा खामेनेई हा अली अयातुल्ला खामेनेई यांचा धाकटा मुलगा आहे. मोजतबाचा जन्म १९६९ मध्ये इराणच्या मशहद येथे झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून मोजतबा यांनी पडद्यामागून इराणची सुत्रे संभाळली आहेत. त्यांनी सरकारचे अनेक महत्त्वाचे कुटनीतिक निर्णय घेतले आहे. मोजतबा यांनी इराण-इराक युद्धात सैन्यात सेवा बजावली होती. त्यांचे इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्ससोबत अत्यंत जवळचे संबंध मानले जातात. तसेच खामेनेई यांचा देखील त्यांचा मुलगा मोजताबावर विश्वास होता. यामुळे मोजतबा खामेनेई यांनी देशाची सुत्रे तात्पुरती हाती घेतली आहे. परंतु त्यांच्या इराणच्या सुप्रीम लीडर बनण्याची शक्यता अधिक आहे.
अमेरिका-इस्रायलने (Israel) इराणवर संयुक्तपण लष्करी कारवाई केली होती. दरम्यान या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय त्यांचे संपूर्ण कुटुंबही या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले असल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या भयावह हल्ल्यात खामेनेई यांची मुलगी, जावई, सून आणि निरापराध नातवाचा मृत्यू झाला आहे. इराणी सरकार आणि माध्यमांनी याची पुष्टी केली आहे.
सध्या इराणमध्ये प्रचंड अस्थिरता पसरली आहे. इराणने इस्रायली हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले आहे. नव्या सुप्रीम लीडरच्या नेतृत्वाखाली देशात शांतता प्रस्थापित होणार का असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
Ans: खामेनेईंच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा मुलगा मोजतबा खामेनेईने इराणची सुत्रे तात्पुरती हाती घेतली आहेत.
Ans: इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर देशभरात ४० दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.






