एसबीआयकडून ग्राहकांसाठी मोठी सुविधा; आता घर बसल्या पैसे काढता येणार, काय करावं लागणार, जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांसाठी एक सुविधा आणली आहे. आता तुम्हाला पैसै काढायला किंवा पैसै भरायल बँकेत जाण्याची गरज नाही आहे.

    स्टेट बँक ऑफ इंडियाने (state bank of India) त्यांच्या ग्राहकांसाठी नवी सुविधा आणली आहे. जर तुमचे  एसबीआयमध्ये खाते आहे तर तुम्हाला आता बँकेशी संबधित कुठलही छोटं मोटं काम असेल तरही बँकेत जावं लागणार नाही. मग तुमची काम कशी होणार असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर म्हणजे आता स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी कियोस्क बँकिंग सुरू करण्याची योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राचे एजंट वैयक्तिकरित्या तुमच्या घरी येतील आणि तुमच्या समस्या सोडवतील.

    कुणाला होणार फायदा?

    स्टेट बँकेची ही कियोस्क बँकिंग सुविधा सुरू झाल्यानंतर ग्राहकांची अनेक कामं सोप्य पद्धीने पार पडणार आहेत. याता सगळ्यात जास्त फायदा वृद्ध आणि दिव्यांगांना होणार आहे. कारण दिव्यांगांना आता तासनतास रांगेत उभे राहावं लागणार नाही.  एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमाचा उद्देश आर्थिक समावेश अधिक मजबूत आणि सुलभ करणे हा आहे. जेणेकरून बँकिंग सेवा सामान्य लोकांच्या घरापर्यंत पोहोचवता येतील. दिनेश खारा यांच्या मते, स्टेट बँकेच्या या नवीन उपक्रमामुळे आता ग्राहक सेवा केंद्राच्या एजंटना त्यांच्या ग्राहकांना घरपोच बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात मदत होणार आहे. तसेच दिव्यांग, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना बँकेत यावे लागणार नाही.

    स्टेट बँकेने सुरु केल्या ;या’ पाच बँकिंग सेवा

    या नवीन उपक्रमांतर्गत सुरुवातीला स्टेट बँकेने पाच बँकिंग सेवा सुरू केल्या आहेत. म्हणजेच ग्राहकांना आता घरबसल्या पैसे काढणे, पैसे जमा करणे, मनी ट्रान्सफर, बॅलन्स चेकिंग आणि मिनी स्टेटमेंट या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. विशेष बाब म्हणजे बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रांवर होणाऱ्या एकूण व्यवहारांपैकी या सेवांचा वाटा 75 टक्क्यांहून अधिक आहे. चेअरमन दिनेश खारा यांच्या म्हणण्यानुसार, बँक आपल्या सेवांचा अधिक विस्तार करेल. ग्राहकांना सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत नावनोंदणी, खाते उघडणे आणि कार्ड आधारित सेवा देखील मिळतील.