Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi On PM Modi Post: ‘मध्यरात्रीचा Video… अन् 70 मिनिटांत राहुल गांधींचा पलटवार; नेमकं काय घडलं?’

Rahul Gandhi On PM Modi Post: देशभरात पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप असून दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्री सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत पेपरफुटीच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 24, 2026 | 11:21 AM
Rahul Gandhi On PM Modi Post

Rahul Gandhi On PM Modi Post

Follow Us
Follow Us:
  • रात्री उशिरा पंतप्रधान मोदींनी सोशलमीडियावर व्हिडिओ प्रदर्शित
  • पेपरफुटी प्रकरणांवर कठोर कारवाईचा इशारा
  • राहूल गांधीच्या प्रमुख मागण्या
 

Rahul Gandhi Reaction On PM Modi Post: देशात सध्या एकच आंदोलन चर्चेत आहे. पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांनामध्ये मोठा असंतोष पसरला आहे. गेले अनेक दिवस दिल्लीच्या जंतरमंतरला विद्यार्थी ठिय्या आंदोलन करत आहेत. अनेक राजकीय पक्षानी देखील या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप आहेत.

पंतप्रधान मोदी पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाले…

काल रात्री देशाचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सोशलमीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्धा केला. यामध्ये विद्यार्थी आणि पालाकांना मोदींनी महत्त्वाचे आश्वासन दिले की, पेपरफुटीच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई केली जाईल.विशेष कायदेशीर व्यवस्था उभारण्याचा सरकारचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची तरतूद असलेले विधेयक लवकरच संसदेत आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

CJP Protest News: सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये आज निर्णायक बैठक; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम

मोदींचा गंभीर दावा

मोदी यांनी आपल्या संदेशात पेपरफुटी ही केवळ परीक्षा बिघडवणारी घटना नसून लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडलेला गंभीर विषय असल्याचे नमूद केले. मागील काही आठवड्यांत अनेक संशयितांना अटक करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर फेरपरीक्षेचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यांच्या मते, परीक्षा प्रक्रिया पूर्ण करून निकालही जाहीर करण्यात आला आहे. मात्र, एवढ्यावर सरकार थांबणार नसून दोषींना जलद शिक्षा मिळावी यासाठी कायद्यात बदल करण्याची तयारी सुरू आहे. याच प्रस्तावावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असून त्यानंतर संसदेत विधेयक सादर करण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Rahul Gandhi On PM Modi Post:)

More strict actions against paper leaks to come in tomorrow’s Cabinet! pic.twitter.com/NRysBukk5U — Narendra Modi (@narendramodi) July 23, 2026

दरम्यान, पंतप्रधानांच्या या भूमिकेनंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही तातडीने प्रतिक्रिया दिली. त्यांनी सोशल मीडियावर मोदींच्या पोस्टला उत्तर देत थेट मोदींवर निशाणा साधला. विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेण्याऐवजी सरकार केवळ आश्वासन गेत आहे.

राहुल गांधी यांनी या प्रकरणात तीन स्पष्ट मागण्या मांडल्या. पाहुया पुढीलप्रमाणे…

  • केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
  • आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर कारवाई किंवा मारहाण करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर पावले उचलावीत.
  • सरकारने विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, अशी भूमिका मांडली.
पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आता केवळ शिक्षणापुरता मर्यादित राहिलेला नाही. याला राजकीय रंगही चढू लागला आहे. एका बाजूला सरकार कठोर कायद्याचे आश्वासन देत आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधक जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत आहेत.
More strict actions against paper leaks to come in tomorrow’s Cabinet! pic.twitter.com/NRysBukk5U — Narendra Modi (@narendramodi) July 23, 2026

आता सर्वांचे लक्ष केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांकडे लागले आहे. सरकारने ज्या कायद्याचा उल्लेख केला आहे, त्यावर प्रत्यक्षात किती वेगाने काम होते आणि संसदेत त्याला मंजुरी मिळते का, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.

विद्यार्थी आंदोलनादरम्याच केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; ‘या’ बड्या व्यक्तीला थेट पदावरूनच हटवले

मात्र, या सर्व घडामोडींमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा एकच आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा कसा जिंकायचा? कारण परीक्षेतील पारदर्शकता आणि न्याय्य व्यवस्था हीच लाखो तरुणांच्या भविष्याची खरी हमी आहे. त्यामुळे सरकारची पुढील पावले आणि विरोधकांची भूमिका या दोन्हींकडे देशभरातील विद्यार्थी आणि पालकांचे बारकाईने लक्ष लागले आहे.

Web Title: Strict to come against paper leaks pm modi announces new bill push in video message rahul gandhi reply at 1 am with 3 demands of students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • PM Modi
  • Rahul Gandhi
  • Student Protest

संबंधित बातम्या

राहुल गांधींच्या घराबाहेर वातावरण पुन्हा तापलं; पोलिसांनी रोखली खासदारांची बस अन्… पहा व्हिडियो
1

राहुल गांधींच्या घराबाहेर वातावरण पुन्हा तापलं; पोलिसांनी रोखली खासदारांची बस अन्… पहा व्हिडियो

पीएम हाऊसनंतर राहुल गांधींचा नवा डाव! १२० खासदारांसह उतरले रस्त्यावर; म्हणाले, ‘मोदी सरकार लोकशाहीची हत्या करतंय’
2

पीएम हाऊसनंतर राहुल गांधींचा नवा डाव! १२० खासदारांसह उतरले रस्त्यावर; म्हणाले, ‘मोदी सरकार लोकशाहीची हत्या करतंय’

‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर राजकीय पोळी भाजणं बंद करा, हिंमत असेल तर…’, देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधीवर जोरदार घणाघात
3

‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर राजकीय पोळी भाजणं बंद करा, हिंमत असेल तर…’, देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधीवर जोरदार घणाघात

Satara Protest: भर पावसात विद्यार्थ्यांचा एल्गार! ‘नीट’ पेपरफुटीविरोधात मोर्चा; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
4

Satara Protest: भर पावसात विद्यार्थ्यांचा एल्गार! ‘नीट’ पेपरफुटीविरोधात मोर्चा; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.