गोरखपूरमध्ये अवघ्या 2,000 रुपयांपासून सुरू झालं होतं सुब्रत रॉय यांचं सहाराचं साम्राज्य!

एक काळ असा होता जेव्हा सुब्रत रॉय गोरखपूरमध्ये वकिलाच्या घरात भाड्याने राहत होते. त्यांची मुले तिथेच जन्माला आली. त्यानंतर अवघ्या 2000 रुपयांपासून सुरू झालेल्या फायनान्स कंपनीचा व्यवसाय काही वेळातच 2 लाख कोटींवर नेला गेला.

  सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत रॅाय (Subrata Roy Passes Away) यांच काल उशीरा निधना झालं. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात ते त्याचं मोठं सामाज्र सोडून गेले आहे. मात्र, हे अवाढव्य सामाज्र उभं करणं काही सोपं काम नव्हतं. एक काळ असा होता जेव्हा सुब्रत रॉय गोरखपूरमध्ये वकिलाच्या घरात भाड्याने राहत होते. त्यांनी अवघ्या 2000 रुपयांपासून त्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली. बघता बघता त्यांनी सुरू झालेल्या फायनान्स कंपनीचा व्यवसाय काही वेळातच 2 लाख कोटींवर गेला.

  गोरखपूरमधून व्यवसायाला सुरुवात

  1948 मध्ये बिहारच्या अररिया जिल्ह्यात जन्मलेल्या सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांचे उत्तर प्रदेशातील गोरखपूरशी घट्ट नाते आहे. त्यांनी शिक्षण आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टी येथूनच सुरू केल्या. त्यानंतर अवघ्या 2000 रुपयांपासून सुरू झालेल्या फायनान्स कंपनीचा व्यवसाय काही वेळातच 2 लाख कोटींवर नेला गेला. एक काळ असा होता जेव्हा सुब्रत रॉय गोरखपूरच्या बेट्टीहाटा येथे वकिलाच्या घरात भाड्याने राहत होते. त्यांची मुले तिथेच जन्माला आली.

  ‘सहारा श्री’ सुब्रत रॉय यांनी वित्त, रिअल इस्टेट, मीडिया आणि हॉस्पिटॅलिटी, इतर क्षेत्रांसह एक विशाल साम्राज्य स्थापन केले. 1978 मध्ये त्यांनी ‘सहारा इंडिया परिवार’ ग्रुपची स्थापना केली. रॉय यांना गोरखपूरबद्दल खूप आपुलकी होती. या कारणास्तव, मीडिया क्षेत्र असो किंवा रिअल इस्टेट, त्यांच्या कंपनीने गोरखपूरमध्ये मोठी गुंतवणूक केली. 2000 मध्ये रॉय यांच्या निमंत्रणावरून अमिताभ बच्चन सारखे दिग्गज सिनेतारक गोरखपूरला पोहोचले होते.

  खोली भाड्याने देणे आणि स्कूटर चालवणे

  सुब्रत रॉय यांनी 1978 मध्ये त्यांचे मित्र एसके नाथ यांच्यासोबत गोरखपूरमध्ये फायनान्स कंपनी सुरू केली. ज्याचं ऑफिस सिनेमा रोडवर होतं. सुरुवातीला हे भाड्याचे कार्यालय एका खोलीचे होते, त्यात दोन खुर्च्या होत्या. जिथे रॉय त्याच्या स्कूटरवर यायचे.

  या फायनान्स कंपनीच्या माध्यमातून सुब्रत रॉय छोट्या दुकानदारांकडून बचतीची व्यवस्था करत. काही काळानंतर भांडवल थोडे वाढल्यावर त्यांनी कपड्यांचा आणि पंख्यांचा छोटा कारखानाही सुरू केला. स्थानिक लोक सांगतात की, या काळात तो त्यांच्या स्कूटरवरून पंखे आणि इतर वस्तू विकायचा. ते स्वतः दुकानातून दुकानात जाऊन पंखे वितरीत करायचे आणि दुकानदारांना अल्पबचतीबाबत जागरूक करायचे.

  हळुहळु त्यांच्या बोलण्याचा प्रभाव पडत होता. लोकं त्यांच्याशी जोडले जात होते. विशेषतः मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय लोक. बँकिंग गरजा आणि रोजगाराच्या संधींमध्ये सुब्रत रॉय यांची योजना यशस्वी होऊ लागली. मात्र, याच दरम्यान 1983-84 मध्ये रॉय यांचे व्यावसायिक मित्र एसके नाथ यांनी वेगळे होऊन दुसरी कंपनी स्थापन केली. त्यानंतर रॉय यांनी लखनऊमध्ये त्यांच्या कंपनीचे मुख्यालय उघडले.

  अनेक व्यवसाय सुरू केले

  गोरखपूरमधून सुरुवात केलेल्या सुब्रत रॉय यांनी मोठी उंची गाठली हे विशेष. रॉय यांनी 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात चिट फंड व्यवसाय सुरू केला आणि त्वरीत एक साम्राज्य निर्माण केले ज्यामध्ये एअरलाइन्स, टेलिव्हिजन चॅनेल आणि रिअल इस्टेटचा समावेश होता.

  रॉय यांच्या सहारा इंडिया कुटुंबाला ‘टाइम मॅगझिन’ने रेल्वेनंतर भारतातील दुसरे सर्वात मोठे नियोक्ता म्हणून ओळखले होते, ज्यामध्ये सुमारे 12 लाख कर्मचारी आहेत.

  रिअल इस्टेटबद्दल बोलायचे तर, त्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अॅम्बी व्हॅली सिटी हा देखील होता, जो महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळ आहे. याशिवाय रॉय यांनी 1993 मध्ये एअर सहारा सुरू केली होती, जी त्यांनी नंतर जेट एअरवेजला विकली. सहारा ग्रुप 2001 ते 2013 पर्यंत टीम इंडियाचा प्रायोजकही होता. त्याचवेळी सहाराची टीम ‘पुणे वॉरियर्स’ने 2011 मध्ये आयपीएलमध्ये प्रवेश केला होता.