Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court On Delhi Stampede: ‘… मृत्यू झाल्याचा काही पुरावा आहे का?’ सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत गर्दी नियंत्रणाच्या मुद्द्यावर न्यायालयाने अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, अशी मागणी करण्यात आली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 28, 2025 | 04:21 PM
Supreme Court On Delhi Stampede: '... मृत्यू झाल्याचा काही पुरावा आहे का?' सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

Supreme Court On Delhi Stampede: '... मृत्यू झाल्याचा काही पुरावा आहे का?' सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला आणि 12 हून अधिक जण जखमी झाले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली.  दरम्यान चेंगराचेंगरीशी संबंधित याचिकेवर विचार करण्यास ससुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. दिल्लीत स्टेशनवरील चेंगराचेंगरी प्रकरणात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत 200 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यावर आज कोर्टात सुनावणी पार पडली.

सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत गर्दी नियंत्रणाच्या मुद्द्यावर न्यायालयाने अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, अशी मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती पी. के. मिश्रा यांच्या खंडपीठसमोर याचिकेवर सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती पी.के. मिश्रा यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलाला विचारले, “२०० लोकांचा मृत्यू झाल्याचा काही पुरावा आहे का?”

सुप्रीम कोर्टाने विचारलेल्या प्रश्नावर याचिकाकर्ते वकील म्हणाले, रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीचे अनेक व्हिडिओ ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आले होते आणि रेल्वेने तेथे उपस्थित असलेल्या साक्षीदारांना नोटीस बजावल्या आहेत.

चेंगराचेंगरी कशी झाली?

शनिवारी नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत भाविकांची मोठी गर्दी उभी होती आणि इतर प्रवासीही तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, रेल्वेने अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वरून एक विशेष ट्रेन येण्याची घोषणा केली. यानंतर, घोषणेनंतर आधीच प्लॅटफॉर्म १४ वर जाण्याचा प्रयत्न करणारे प्रवासी देखील प्लॅटफॉर्म १६ च्या दिशेने धावले, ज्यामुळे गोंधळ उडाला आणि गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. आणि लोक एकमेकांवर तुटू लागले. यामुळे चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये ९ महिला, ४ पुरुष आणि ५ मुले यांचा समावेश आहे जे बिहार, दिल्ली आणि हरियाणाचे रहिवासी होते. या घटनेनंतर रेल्वेने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

Delhi Railway Station : “प्लॅटफॉर्म बदलल्याने चेंगराचेंगरी…”, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल समोर

मृतांमध्ये बहुतेक महिला आणि मुलांचा समावेश

ही दुर्घटना नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १६ वर घडली. मृतांमध्ये बहुतेक लोक बिहार आणि दिल्लीचे होते. बिहारमधील ९, दिल्लीतील ८ आणि हरियाणामधील १ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी बहुतेक महिला आणि मुलांचा समावेश आहे. दरम्यान, उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशू उपाध्याय यांनी अपघाताचे प्राथमिक कारण सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर ही दुःखद घटना घडली तेव्हा पाटण्याकडे जाणारी मगध एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर उभी होती आणि जम्मूकडे जाणारी उत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १५ वर उभी होती. दरम्यान, प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ मधील पायऱ्यांवर एक प्रवासी घसरला आणि पडला. त्याच्या मागे असलेल्या अनेक प्रवाशांना त्याची धडक बसली आणि ही दुःखद घटना घडली.

Web Title: Supreme court denied petition of new delhi railway station stampede marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2025 | 04:18 PM

Topics:  

  • New Delhi
  • Stampede Alert
  • Supreme Court

संबंधित बातम्या

‘लिव्ह इन’ हे विवाहाच्या समकक्ष, पालकसुद्धा त्यात हस्तक्षेप करू शकत नाहीत; दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय
1

‘लिव्ह इन’ हे विवाहाच्या समकक्ष, पालकसुद्धा त्यात हस्तक्षेप करू शकत नाहीत; दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय

Shiv Sena Symbol Case : ‘शिवसेना ठाकरेंची, शिंदेंची होऊ शकत नाही’; धनुष्यबाण गोठवण्याची कपिल सिब्बलांची सुप्रीम कोर्टात मागणी
2

Shiv Sena Symbol Case : ‘शिवसेना ठाकरेंची, शिंदेंची होऊ शकत नाही’; धनुष्यबाण गोठवण्याची कपिल सिब्बलांची सुप्रीम कोर्टात मागणी

Supreme Court on CJP Protest:जंतरमंतरवरील आंदोलन, महिला, मुलींचे लैंगिक छळ…; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
3

Supreme Court on CJP Protest:जंतरमंतरवरील आंदोलन, महिला, मुलींचे लैंगिक छळ…; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Delhi Police on CJP Protest:  संसद मोर्चा बेकायदेशीर; जंतरमंतर लाठीचार्जबाबत दिल्ली पोलिसांचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
4

Delhi Police on CJP Protest: संसद मोर्चा बेकायदेशीर; जंतरमंतर लाठीचार्जबाबत दिल्ली पोलिसांचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.