Supreme Court on delhi Street dog shelter home decision Sterilization
Supreme Court on Delhi Street dogs : नवी दिल्ली : दिल्लीमधील भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय घेण्यात आला होता. दिल्लीमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांबद्दल मोठा निर्णय दिला होता. न्यायालयाने आपल्या निर्णयात ११ ऑगस्टच्या आदेशात सुधारणा केली आहे, ज्यामध्ये भटक्या कुत्र्यांना पकडण्याचे आणि त्यांना शेल्टर होममध्ये ठेवण्याचा आदेश दिला होता. मात्र आता या निर्णयामध्ये बदल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आजच्या आपल्या निर्णयात म्हटले आहे की, शेल्टर होममध्ये फक्त आजारी आणि आक्रमक कुत्र्यांनाच ठेवले जाईल. त्याव्यतिरिक्त कुत्र्यांची नसबंदी केली जाणार आहे.
दिल्लीमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत होता. लोकांना रस्त्यांवरील कुत्र्यांच्या चावण्याचे प्रमाण देखील वाढले होते. त्याचबरोबर भटके कुत्रे चावल्यामुळे रेबिज आजार होण्याचे प्रमाण देखील वाढले. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला होता. प्रीम कोर्टाने दिल्ली-एनसीआर भागातील भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील ८ आठवड्यात या सर्व भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवावे. या कारवाईमध्ये कोणी अडथळा आणल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल असे देखील सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. यावरुन जोरदार वाद निर्माण झाला होता.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भटक्या कुत्र्यांबाबत पुन्हा एकदा सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशामध्ये थोडा बदल केला आहे.न्यायालयाने म्हटले आहे की, भटक्या कुत्र्यांना आश्रयगृहात ठेवले जाणार नाही, ज्या कुत्र्यांना आश्रयगृहात पाठवले आहे त्यांनाही ताबडतोब सोडले जाईल. नसबंदी आणि लसीकरणानंतर कुत्र्यांना सोडले जाईल. आश्रयगृहात पाठवलेले कुत्रे सोडले जातील. फक्त आजारी आणि आक्रमक कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवले जाईल.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
न्यायाधीश विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. यासोबतच न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटीसही बजावली आहे. प्रत्येक सांप्रदायिक ब्लॉकमध्ये भटक्या कुत्र्यांना खायला देण्यासाठी स्वतंत्र जागा उघडल्या जातील असे न्यायालयाने म्हटले आहे. कुत्र्यांना फक्त नियुक्त केलेल्या ठिकाणीच खायला दिले जाईल, सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला दिले जाणार नाही. असे न केल्यास कारवाई केली जाईल, असे आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले आहे.
राहुल गांधींनी केला होता विरोध
भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर प्राणी प्रेमींनी आक्षेप घेतला होता. हा निर्णय प्राण्यांसाठी जाचक असल्याचे या प्राणी प्रेमी संस्थांचे म्हणणे होते. त्याचबरोबर या निर्णयावरुन राजकीय वर्तुळातून देखील आक्रमक प्रतिक्रिया आल्या होत्या. कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी हा निर्णय अमानवी असल्याचे म्हटले होते. राहुल गांधी म्हणाले की, “हा निर्णय दशकांपासून चालत आलेल्या मानवी आणि वैज्ञानिक धोरणापासून एक पाऊल मागे आहे. हे आवाजहीन आत्मे ही ‘समस्या’ नाही जी दूर करता येईल. निवारा, नसबंदी, लसीकरण आणि सामुदायिक काळजीद्वारे कोणत्याही क्रूरतेशिवाय रस्ते सुरक्षित ठेवता येतात. यावर पूर्ण बंदी घालणे क्रूर, अदूरदर्शी आहे आणि आपली करुणा नष्ट करते. सार्वजनिक सुरक्षा आणि प्राणी कल्याण कसे एकत्र चालतात याची आपण खात्री करू शकतो, अशी भूमिका राहुल गांधींनी घेतली होती. त्यांनी भटक्या कुत्र्यांसोबत फोटो देखील शेअर केला होता.