Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाबा रामदेव यांच्या अडचणी काही संपेना, आता योग शिबिरांवरील सेवा कर भरण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश!

सर्वोच्च न्यायालयाकडून बाबा रामदेव यांना पुन्हा एकदा दणका बसला आहे. पतंजली योग पीठ ट्रस्टला आता सेवा कर भरावा लागणार आहे. पतंजली ट्रस्टच्या वतीने दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली असून ट्रस्टला लवकरच सेवा कर भरण्याचे आदेशही दिले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 21, 2024 | 02:35 PM
रामदेवांना हायकोर्टाचा दणका; औषधावरील दावा मागे घ्यावा लागणार

रामदेवांना हायकोर्टाचा दणका; औषधावरील दावा मागे घ्यावा लागणार

Follow Us
Follow Us:

योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या मागच्या अडचणी काही संपताना दिसत नाही आहे. आधीच पंतजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणात ते अडकले आहेत. या प्रकरणाी अजूनही त्यांना दिलासा मिळाला नाही आहे. आता न्यायालयाने रामदेव यांना आणखी एक झटका दिला असून, सर्वोच्च न्यायालयाने आता पतंजली योगपीठ ट्रस्टला (patanjali yog peeth trust) सेवा कर (service tax) भरण्याचे आदेश दिले आहेत.

[read_also content=”सलमान खानच्या सिकंदर चित्रपटासाठी मिळाली हिरोईन, ‘ही’ बॉलिवूड सौंदर्यवती भाईजानसोबत पहिल्यांदाच स्क्रिन करणार शेअर! https://www.navarashtra.com/movies/salman-khan-sikandar-movie-lead-actress-may-be-kiara-advani-as-per-report-nrps-525847.html”]

नेमका प्रकार काय?

योगगुरू बाबा रामदेव यांचे देशभरात अनेक फॅालोवर आहेत. ते योगसना द्वारे निरोगी कस राहायचं हे शिकवतात. त्यांच्या पतंजली योगपीठातर्फे देशभरात योग शिबिरे आयोजित केली जातात. आता याच  योग शिबिरांसाठी सेवा कर भरण्याचे सेवा कर अपील न्यायाधिकरणाने पतंजली पीठला आदेश दिले होते. या आदेशाला रामदेव यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, इथंही त्यांचा हाती निराशाच आली.

सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलं

आज या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने योग शिबिरांसाठी सेवा कर भरावा लागेल, असा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय एम ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने सेवा कर अपीलीय न्यायाधिकरणाचा आदेश कायम ठेवला आहे. जर तुम्ही योग शिबिरासाठी प्रवेश शुल्क आकारले तर तुम्हाला सेवा कर देखील भरावा लागेल. या प्रकरणात हस्तक्षेप करण्यात अर्थ नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने रामदेव यांचे अपील फेटाळले.

योग शिबिर हे आरोग्य आणि फिटनेस सेवेच्या श्रेणीत आहे.
योग शिबिराला आरोग्य आणि फिटनेस सेवा या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. न्यायालयाने स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, तुम्ही जेथे शिबिर लावले, तेथे लोकांकडून प्रवेश शुल्कही आकारले जात असेल, तर सेवाकर भरावा लागेल. समोर आलेल्या माहितीनुसार, बाबा रामदेव यांना 2006 ते 2011 या कालावधीत आयोजित केलेल्या योग शिबिरांसाठी सीमाशुल्क आणि वस्तू आणि विक्रीकर विभागाच्या वतीने एकूण 4.5 कोटी रुपयांचा सेवा कर भरावा लागणार आहे.

Web Title: Supreme court order to patanjali yoga peetha trust to pay sercvice tax on yoga camp nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2024 | 02:26 PM

Topics:  

  • Baba Ramdev
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Tarun Tejpal: 2013 च्या लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालांच्या अडचणी वाढल्या; सुप्रीम कोर्टाचे सरेंडरचे आदेश
1

Tarun Tejpal: 2013 च्या लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालांच्या अडचणी वाढल्या; सुप्रीम कोर्टाचे सरेंडरचे आदेश

‘लिव्ह इन’ हे विवाहाच्या समकक्ष, पालकसुद्धा त्यात हस्तक्षेप करू शकत नाहीत; दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय
2

‘लिव्ह इन’ हे विवाहाच्या समकक्ष, पालकसुद्धा त्यात हस्तक्षेप करू शकत नाहीत; दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.