Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Waqf Amendment Bill: वक्फ सुधारणा विधेयकावर SC मध्ये ‘या’ दिवशी सुनावणी; याचिकेतून मागणी काय?

हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाले आहे. वक्फ सुधारणा विधेयकाला सत्ताधारी पक्षाने ऐतिहासिक विधेयक म्हटले तर विरोधकांनी विरोध केला आणि हा संविधानावरील हल्ला असल्याचे म्हटले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 10, 2025 | 02:37 PM
Waqf Amendment Bill: वक्फ सुधारणा विधेयकावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; नेमकी याचिका आहे तरी काय?

Waqf Amendment Bill: वक्फ सुधारणा विधेयकावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; नेमकी याचिका आहे तरी काय?

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: नुकतेच संदेचे अधिवेशन पार पडले. हे अधिवेशन वादळी ठरले. कारण या अधिवेशनात वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आले. हे विधेयक लोकसभेत आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले.देशभरात अनेक ठिकाणी या विधेयकांचे स्वागत करण्यात आले. तर काही ठिकाणी विधेयकाविरुद्ध आंदोलने केली जात आहे.  या कायद्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान आता या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

वक्फ संशोधन विधेयकाल राष्ट्रपतींनी देखील मंजूरी दिली आहे. या विधेयकांचे रूपांतर आता कायद्यात झाले आहे. अनेक ठिकाणी या कायद्याचे स्वागत तर काही ठिकाणी विरोध केला जात आहे. पश्चिम बंगालमध्ये या कायद्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. त्याला हिंसक वळण देखील लागले. दरम्यान या कायद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जवळपास 15 ते 16 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

सुप्रीम कोर्ट आता 16 एप्रिल रोजी यावर सुनावणी घेणार आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ याचिकेवर सुनावणी घेणार आहे. दरम्यान केंद्र सरकारने देखील सुप्रीम कोर्टात एक कॅव्हेट दाखल केले आहे. आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय देऊ नये अशी मागणी यामधून करण्यात आली आहे.

Waqf Amendment Bill: वक्फ सुधारणा विधेयक कायद्याच्या कचाट्यात? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाले आहे. वक्फ सुधारणा विधेयकाला सत्ताधारी पक्षाने ऐतिहासिक विधेयक म्हटले तर विरोधकांनी विरोध केला आणि हा संविधानावरील हल्ला असल्याचे म्हटले आहे. गुरुवारी (दि.3) राज्यसभेत हे विधेयक चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. हे विधेयक येथूनही मंजूर झाले. दुरुस्ती विधेयकातील व्याख्येनुसार, किमान पाच वर्षे इस्लामचे पालन करणाऱ्या आणि अशा मालमत्तेची मालकी असलेल्या कोणत्याही व्यक्तीने दिलेली देणगी म्हणजे वक्फ होय.

वक्फच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांकडून काढून ते जिल्हाधिकारी किंवा उपायुक्तांना असतील. तसेच केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्यस्तरीय वक्फ बोर्डातले दोन प्रतिनिधी बिगरमुस्लिम असावेत. बोहरा मुस्लिम आणि आगाखानी मुस्लिम समुदायाला स्वतंत्र वक्फ बोर्ड स्थापन करण्याची परवानगी असेल. केंद्रीय पोर्टल आणि डेटाबेसमध्ये वक्फची नोंदणी केली जाईल.

आणखी काय होतील बदल?

एखादी मालमत्ता ही वक्फअंतर्गत येते की नाही, हे ठरवण्याचा अधिकार वक्फ बोर्डाला नसेल. अस्तित्वात असणाऱ्या त्रिसदस्यीय वक्फ लवादाची सदस्यसंख्या आता दोन असेल. या लवादाचा निर्णय अंतिम असणार नाही. लवादाने दिलेल्या निर्णयाविरोधात 90 दिवसांच्या आत उच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे. 12 वर्षांहून अधिक काळ एखाद्या व्यक्तीकडे वक्फच्या जमिनींचा ताबा असेल किंवा त्याने त्यावर अतिक्रमण केलं असेल तर ती व्यक्ती या नव्या विधेयकाच्या आधारे त्या जमिनींचे मालक होऊ शकते.

Web Title: Supreme court take hearing at 16 april under cji bench against waqf amendment bill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 02:21 PM

Topics:  

  • Central government
  • Supreme Court
  • Waqf Amendment Bill

संबंधित बातम्या

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका; सुप्रीम कोर्ट पुढील आठवड्यात सुनावणी करणार
1

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका; सुप्रीम कोर्ट पुढील आठवड्यात सुनावणी करणार

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर
2

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

UPI Payment करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! Supreme Court चा निकाल; ग्राहक की व्यापारी कोणावर पडणार 0.4% चार्जचा भार?
3

UPI Payment करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! Supreme Court चा निकाल; ग्राहक की व्यापारी कोणावर पडणार 0.4% चार्जचा भार?

एका IAS Officer ला किती प्रमोशननंतर Election Commissioner पदाची जबाबदारी मिळते? जाणून घ्या
4

एका IAS Officer ला किती प्रमोशननंतर Election Commissioner पदाची जबाबदारी मिळते? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.