NCP and Election Commission gave the symbol to Ajit Pawar group
Supriya Sule on Election Commission : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड आज घडल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिले असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता शरद पवार यांच्यापुढे दोनच पर्याय असणार आहेत. एक तर या निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयावर शरद पवार सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात किंवा आता शरद पवारांना पक्षासाठी नवं नाव आणि चिन्ह शोधावं लागणार आहे. या निर्णयावर सुप्रिया सुळे यांनी या निर्णयाचे श्रेय अदृश्य शक्तींना दिले आहे.
आम्हाला निर्णयाचे आश्चर्य वाटत नाही
मला या निर्णयाचे आश्चर्य वाटत नाही. आम्ही पुरावे दिले युक्तीवाद केला पण आमच्याकडे अदृश्य शक्ती नाही. या देशामध्ये ज्या संस्थेत हा निर्णय झाला ती संस्था खराब नसतात. त्यांच्यावर अदृश्य शक्तींचा मोठा हात असल्यामुळे या संस्था अधिकारी असा निर्णय असतात.
शरद पवारांनी कायम शून्यातून स्वराज्य निर्मिले
शरद पवारांनी कायमच शून्यातून स्वराज्य निर्माण केला आहे. या निर्णयाबद्दल आम्हाला अजिबात आश्चर्य वाटत नाही. या निर्णयानंतर शरद पवार त्यांची भूमिका स्पष्ट करतील. ते लढवय्ये आहेत, त्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले आहे. काटेवाडीपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास स्वतःच्या हिमतीने उभा केला आहे. त्यांच्यापूर्वी आमच्या कुटुंबातील राजकारणात कोणीही नव्हते. त्यांनी स्वत: हे सर्व साम्राज्य उभे केले. त्यामुळे अशा निर्णयामुळे ते घाबरू शकत नाही. ते पुन्हा नव्याने उभे राहतील आम्ही जनेतेमध्ये जाऊ.






