MI vs DC Live Streaming (फोटो- ट्विटर)
दिल्ली कॅपिटल्सचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय
अरुण जेटली स्टेडियमवर सुरू आहे सामना
मुंबई इंडियन्सने दिल्लीला दिले 163 रन्सचे टार्गेट
Tata IPL 2026 MI vs DC Live Updates: आज दुपारी 3.30 वाजता दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये यंदाच्या हंगामातील डबल हेडर सामना सुरू झाला आहे. दरम्यान आजचा सामना हा दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरू आहे. टॉस जिंकून दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान मुंबई इंडियन्सने (IPL) प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सला 163 धावांचे लक्ष्य दिले आहे.
दरम्यान मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि रीकल्टनने केली. रीकल्टनने डावाची सुरुवात पहिल्या चेंडूवर चौकार मारून केली. रीकल्टन 9 धावा करून बाद झाला. तिसऱ्या नंबरवर खेळण्यासाठी तिलक वर्मा आला. मात्र तो 0 धावा करून बाद झाला. रोहित शर्माच्या रोपपट मुंबईला तिसरा धक्का बसला. रोहित शर्माने 35 धावा केल्या. शरफेन रदरफोर्ड केवळ 5 धावा करून आउट झाला. मुंबईचा डाव अखेर कर्णधार सूर्यकुमार यादवने सांभाळला. सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी केली. सूर्यकुमार यादवने 51 धावा केल्या. नमन धीर 28 वर आउट झाला. तर सँटनरने १८ धावा केल्या.
Match 8. 19.6: Mukesh Kumar to Corbin Bosch 4 runs, Mumbai Indians 162/6 https://t.co/lufWYIGWql #TATAIPL | #DCvMI — IndianPremierLeague (@IPL) April 4, 2026
दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी
अक्षर पटेलने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सकडून पहिली ओव्हर मुकेश कुमारने टाकली. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 8 धावा दिल्या. मुकेश कुमारने आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये रीकल्टनला बाद केले. अक्षर पटेलने रीकल्टनचा कॅच पकडला. मुकेश कुमारने आपल्या त्याच ओव्हरमध्ये तिलक वर्मा एकही धाव न करू देता आउट केले. अक्षर पटेलने आपल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये रोहित शर्माला बाद केले. रोहितचा कॅच नितीश राणाने पकडला. वीप्रज निगमने शरफेन रदरफोर्डला बाद केले. लुंगी निगडीने 1 विकेट घेतली. टी. नटराजने 1 विकेट घेतली.
MI vs DC Live: दिल्लीने घेतला मोठा निर्णय; टॉस जिंकत पहिल्यांदा…; मुंबईचा संघ तयार
मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, रायन रिकेल्टन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, शरफेन रदरफोर्ड , रॉमॅरियो शेफर्ड, मिचेल सँटनर , अल्ला गझनफर,शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडे, क्विंटन डी कॉक, रॉबिन मिन्झ, क्रॉबिन बॉश
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: केएल राहुल, पाथुम निसांका, नितीश राणा, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुकेश कुमार, टी. नटराजन , समीर रिझवी , आशुतोष शर्मा, पृथ्वी शॉ, विप्रज निगम,मिचेल स्टार्क , दुष्मंथा चमीरा






