फोटो सौजन्य: Pinterest
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे आणि अनेक नवीन-पुराण्या कंपन्या बाजारात आपली मॉडेल्स सादर करत आहेत. त्यामुळे ग्राहकांसाठी आता विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. रोजच्या वापरासाठी उपयुक्त ठरतील असे काही लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर्स आपण इथे पाहूया.
TATA Safari चा EV व्हर्जन मार्केटमध्ये येणायची शक्यता; जाणून घ्या रेंज आणि अन्य माहिती
हा देशातील सर्वाधिक विकला जाणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक आहे. TVS Motor Company च्या विश्वासार्ह ब्रँडमुळे ग्राहकांमध्ये या स्कूटरची मोठी लोकप्रियता आहे. हा iQube, iQube S आणि iQube ST अशा तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
याची किंमत सुमारे 94,999 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी सुमारे 1.61 लाख रुपयांपर्यंत जाते.
एका फुल चार्जमध्ये ही स्कूटर 94 किमी ते 212 किमीपर्यंतची रेंज देतो (मॉडेलनुसार). टॉप व्हेरिएंटमध्ये 5.3 kWh बॅटरी दिली आहे.
Ather Energy कडून येणारा हा स्कूटर त्याच्या डिझाइन आणि आधुनिक फीचर्समुळे खूप चर्चेत आहे. ही स्कूटर विशेषतः आरामदायी आणि रोजच्या वापरासाठी सोयीस्कर ठेवण्यावर भर देऊन तयार करण्यात आला आहे. एका चार्जमध्ये ही 123 ते 159 किमीपर्यंतची रेंज देऊ शकतो. याची किंमत सुमारे 1.04 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि 1.30 लाख रुपयांपर्यंत जाते.
Bajaj Auto चा हा इलेक्ट्रिक स्कूटर त्याच्या मजबूत मेटल बॉडीसाठी ओळखला जातो. इतर स्कूटर्सच्या तुलनेत हा अधिक टिकाऊ मानला जातो. हा C2501, C3001 आणि C35 अशा विविध सीरिजमध्ये उपलब्ध आहे. एका फुल चार्जमध्ये हा 113 किमी ते 151 किमीपर्यंत चालू शकतो. याची किंमत 89,500 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होऊन 1.12 लाख रुपयांपर्यंत जाते.






