Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suvendu Adhikari Oath Ceremony: सुवेंदू अधिकारींनी घेतली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

Suvendu Adhikari Oth Ceremony: सुवेंदू अधिकारी यांचा कारकिर्दीचा आलेख अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी १९९५ मध्ये नगरसेवक म्हणून आपल्या प्रवासाची सुरुवात केली.

  • By anuradha sagar
Updated On: May 09, 2026 | 12:21 PM
Suvendu Adhikari Oath Ceremony: सुवेंदू अधिकारींनी घेतली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ
Follow Us
Follow Us:
  • सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
  • शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते
  • सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली
 

Suvendu Adhikari Oath Ceremony:  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर आज (09 मे) सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते आणि राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत चार-पाच नावे आघाडीवर होती. अखेर शुक्रवारी सुवेंदू अधिकारी यांची विधानसभा पक्षाचे नेते म्हणून निवड झाली होती.

शपथविधी सोहळ्याला प्रमुख नेत्यांची उपस्थिती

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील प्रचंड विजयानंतर पाच दिवसांनी, शनिवारी बंगालमध्ये शपथविधी सोहळा पार पडत आहे. सुवेंदू अधिकारी हे बंगालचे नवे मुख्यमंत्री असतील. या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते आणि राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. शुक्रवारी सुवेंदू अधिकारी यांची विधानसभा पक्षाचे नेते म्हणून निवड झाली होती. गृहमंत्री अमित शाह यांनी अधिकारी यांच्या नावाची बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली.

West Bengal Election Results 2026 Live: भाजपसाठी पश्चिम बंगालचा ..

भाजप नेत्यांकडून पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापनेला “नव्या राजकीय युगाची” सुरुवात म्हटले आहे. हा केवळ सत्तापालट नाही, तर पश्चिम बंगालमधील एका नव्या राजकीय युगाची सुरुवात आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्षाला राज्यातील आपल्या मजबूत राजकीय अस्तित्वाचा संदेश द्यायचा असल्याची भावना व्यक्त केली आहे.

काँग्रेसपासून भाजपपर्यंत; सुवेंदू अधिकारी यांचा राजकीय प्रवास चर्चेत

पश्चिम बंगालच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व म्हणून उदयास आलेले सुवेंदू अधिकारी यांचा राजकीय प्रवास अत्यंत रंजक मानला जातो. काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यापासून सुरुवात करत त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी ओळख निर्माण केली आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश करत राज्यातील प्रमुख चेहरा म्हणून स्वतःची छाप पाडली.

सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली. त्यानंतर ते तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आणि काही वर्षांतच पक्षातील प्रभावशाली नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. विशेषतः ग्रामीण बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा विस्तार करण्यात त्यांचे मोठे योगदान मानले जाते.

मात्र, २०२० मध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी मतभेद वाढल्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर अल्पावधीतच ते बंगाल भाजपचा प्रमुख चेहरा बनले.

२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम मतदारसंघातून थेट ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणूक लढवत त्यांचा पराभव केला. या विजयामुळे त्यांची राष्ट्रीय पातळीवर मोठी चर्चा झाली आणि बंगालच्या राजकारणात त्यांचे महत्त्व अधिक वाढले.

West Bengal Election Result 2026 Live: ममता बॅनर्जींच्या गडाला सुरूंग

ग्रामीण पार्श्वभूमीतून मुख्यमंत्रीपदापर्यंत

पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले सुवेंदू अधिकारी हे कोलकात्यासारख्या पारंपरिक राजकीय केंद्राऐवजी ग्रामीण भागातून पुढे आलेले नेते म्हणून ओळखले जातात. गेल्या पाच दशकांनंतर ग्रामीण पार्श्वभूमीतून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचणारे ते पहिले नेते ठरले आहेत. यापूर्वी १९७० मध्ये अजय मुखर्जी हे ग्रामीण भागातून मुख्यमंत्री झाले होते.

दरम्यान, त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी कोलकातामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. ब्रिगेड परेड ग्राऊंडसह शहरातील प्रमुख भागांमध्ये हजारो पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते, जेणेकरून सोहळा शांततेत पार पडेल.

 

 

Web Title: Suvendu adhikari sworn in as chief minister in grand ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • Amit Shah
  • narendra modi

संबंधित बातम्या

PM मोदींची नेदरलँड्सच्या राणी मॅक्सिमा यांच्याशी महत्त्वपूर्ण बैठक; भारताच्या DPI मॉलेडवर सविस्तर चर्चा
1

PM मोदींची नेदरलँड्सच्या राणी मॅक्सिमा यांच्याशी महत्त्वपूर्ण बैठक; भारताच्या DPI मॉलेडवर सविस्तर चर्चा

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतर अमेरिकेकडून मदतीचा हात; पंतप्रधान मोदींनीही…
2

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतर अमेरिकेकडून मदतीचा हात; पंतप्रधान मोदींनीही…

Eknath Shinde : जागतिक नेतृत्वात पंतप्रधान मोदी अव्वल! लोवी इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणाचा एकनाथ शिंदेंकडून गौरव
3

Eknath Shinde : जागतिक नेतृत्वात पंतप्रधान मोदी अव्वल! लोवी इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणाचा एकनाथ शिंदेंकडून गौरव

India-US Trade Deal : Modi-Trump मैत्रीचा परिणाम? भारत-अमेरिका व्यापार करारावर लवकरच शिक्कामोर्तब होणार
4

India-US Trade Deal : Modi-Trump मैत्रीचा परिणाम? भारत-अमेरिका व्यापार करारावर लवकरच शिक्कामोर्तब होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.