
Swami Avimukteshwaranand Saraswati Health Update Sixth day of the hunger strike
मागील सहा दिवसांपासून धरणे आंदोलनावर बसल्यामुळे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती प्रकृती खालावली. डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला आहे. आणि ते विश्रांती घेत आहेत. शंकराचार्यांचे राष्ट्रीय माध्यम प्रभारी शैलेंद्र योगीराज यांनी त्यांच्या प्रकृती बिघडल्याची पुष्टी केली. मौनी अमावस्येला मेळा प्रशासनाने स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची पालखी थांबवून त्यांना परत पाठवले होते. शंकराचार्यांचे शिष्य आणि संतांनी आरोप केला आहे की त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांचे केस ओढण्यात आले. तसेत शिष्यांच्या हातामध्ये असणाऱ्या त्यांची काठी हिसकावून फेकून देण्यात आली. मारहाणीमुळे साधू आणि संन्यासी देखील जखमी झाले आहेत.
हे देखील वाचा : हवामानात प्रचंड बदल अन् जोरदार बर्फवृष्टी; Vaishno Devi संस्थांनचा मोठा निर्णय; यात्रा स्थगित अन्…
शंकराचार्यांच्या पालखीमुळे झाला वाद
संतप्त शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी त्यांना त्यांच्या पालखीसह त्रिवेणी मार्गावरील त्यांच्या छावणीसमोर सोडल्यापासून ते त्यांच्या पालखीवर त्याच स्थितीत बसले आहेत. ते ठाम आहेत. प्रशासनाने जाहीरपणे माफी मागावी, त्यांना सन्मानपूर्वक स्नान घालावे आणि छावणीत प्रवेश द्यावा अशी त्यांची मागणी आहे, त्यानंतरच ते त्यांच्या छावणीत परततील असा आक्रमक पवित्रा शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी घेतला आहे.
हे देखील वाचा : शशी थरुर यांचे कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य; राहुल गांधींकडे फिरवली पाठ
अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना संगम स्नान नाकारल्याने उत्तर प्रदेशमध्ये वाद निर्माण झाला आहे. याबाबत शंकराचार्य मौन धरले असून उपवास करत असल्याची माहिती समोर येत आहेत. रविवारी घडलेल्या घटनेपासून स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी अन्न-पाणी सोडल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, माघ मेळा परिसरात स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची पालखी थांबवल्याचा मुद्दा हा पूर्णवेळ चर्चेत राहिला. याबाबत चर्चा सुरूच होत्या. पोलिस-प्रशासनाने त्यांची पालखी थांबवल्यापासून शंकराचार्यांचा संताप भडकला आहे.