काँग्रेस मध्ये शशी थरूर नाराज असल्यामुळे राहुल गांधींसोबत बैठकीला उपस्थिती लावली नाही (फोटो - सोशल मीडिया)
Shashi Tharoor upset in Congress : नवी दिल्ली : काही राज्यांमध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. यामध्ये केरळ, पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे. या निवडणुकींसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपने मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. मात्र कॉंग्रेसमध्ये (Congress) अंतर्गत नाराजी पसरली आहे. कॉंग्रेस नेत्यांमध्ये असलेल्या या नाराजीचा परिणाम निवडणुकीवर होण्याचीत्य दाट शक्यता आहे. (Shashi Tharoor)
केरळ विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आज होणाऱ्या काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी शशी थरूर यांच्या नाराजीच्या बातम्या समोर आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थरूर आज राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबतच्या प्रस्तावित बैठकीला उपस्थित राहणार नाहीत आणि सध्या ते केरळमध्ये आहेत. काँग्रेस हायकमांड आज दुपारी २:३० वाजता दिल्लीत केरळच्या वरिष्ठ नेत्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेणार आहे.
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की शशी थरूर हे राहुल गांधींच्या कोची येथे झालेल्या महापंचायत दरम्यान मिळालेल्या वागणुकीमुळे नाराज आहेत. या कार्यक्रमादरम्यान, त्यांना राहुल गांधींच्या आगमनापूर्वी त्यांचे भाषण संपवण्यास सांगण्यात आले होते, ज्याला थरूर यांनी “योग्य आदराचा अभाव” मानले. म्हणूनच ते पक्ष हायकमांडसोबतच्या या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.
दिल्ली बैठकीतील अनुपस्थिती
या घडामोडींवर काँग्रेस नेतृत्वाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वी थरूर यांची नाराजी पक्षासाठी आव्हान निर्माण करू शकते असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. शशी थरूर हे राज्यातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत आणि शहरी मध्यमवर्गीय आणि तरुण मतदारांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव असल्याचे मानले जाते. त्यामुळे, महत्त्वाच्या बैठकींमध्ये त्यांची अनुपस्थिती पक्षाच्या धोरणात्मक हितसंबंधांसाठी हानिकारक ठरू शकते.
हे देखील वाचा : ‘या’ जिल्ह्यात संध्याकाळी 6 वाजता होणार ब्लॅकऑट; सरकारची नेमकी काय आहे योजना?
सध्या, काँग्रेस नेतृत्व हे मतभेद वाढण्याआधीच सोडवण्यासाठी अंतर्गत प्रयत्न करत आहे. थरूर यांच्या अनुपस्थितीवरून हे स्पष्ट होते की पक्षातील अस्वस्थता अद्याप कमी झालेली नाही. येत्या काळात काँग्रेस ही परिस्थिती कशी हाताळते आणि थरूर यांना राजी करण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी होतात का हे पाहणे महत्त्वाचे असेल.
शशी थरूर काय म्हणाले?
शशी थरूर यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे की ते आज, २३ डिसेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या केरळ काँग्रेसच्या निवडणूक तयारीच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत. कार्यालयाकडून देण्यात आलेल्या निवेदनानुसार, थरूर सध्या आशियातील सर्वात मोठ्या साहित्य महोत्सवात सहभागी होण्यासाठी कालिकतमध्ये आहेत. निवेदनात म्हटले आहे की थरूर हे त्यांच्या नवीनतम पुस्तकावर बोलत आहेत, जे श्री नारायण गुरुवर आधारित आहे. त्यांनी पक्षाला आधीच कळवले होते की ते बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत.
हे देखील वाचा: हवामानात प्रचंड बदल अन् जोरदार बर्फवृष्टी; Vaishno Devi संस्थांनचा मोठा निर्णय; यात्रा स्थगित अन्…
‘मोदी सरकार लोकशाहीविरोधी नाही’
यापूर्वी, काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले होते, “मी असे म्हणणार नाही की मोदी सरकार लोकशाहीविरोधी आहे, परंतु ते निश्चितच नेहरूविरोधी आहे. नेहरूंना सहज बळीचा बकरा बनवण्यात आले आहे.” ते म्हणाले की, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचे आणि दृष्टिकोनाचे ते खूप कौतुक करतात, परंतु त्यांनी अवलंबलेल्या प्रत्येक विचाराचे आणि धोरणाचे निःसंशयपणे समर्थन करणे अशक्य आहे. थरूर म्हणाले की, नेहरूंच्या चुका मान्य करणे महत्त्वाचे असले तरी, देशासमोरील प्रत्येक समस्येसाठी त्यांना पूर्णपणे जबाबदार धरणे पूर्णपणे चुकीचे आणि अन्याय्य आहे.






