Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : रखडलेल्या कामाविरोधात पाचगणी बंदची हाक! व्यापारी अन् नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा

महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. याच्या निषेधार्थ पाचगणीमध्ये बंदची हाक देण्यात आली होती. व्यापाऱ्यांनी याला पूर्ण पाठिंबा दिला.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 09, 2026 | 05:33 PM
Bandh called in Panchgani due to stalled development works full support from traders and people

Bandh called in Panchgani due to stalled development works full support from traders and people

Follow Us
Follow Us:

Satara News : वाई : पाचगणी -महाबळेश्वर मार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात पाचगणी बंदला रविवारी व्यापारी, नागरिक तसेच विविध संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील सर्वच दुकाने, आस्थापने व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण पाचगणी शहरात बंदचे वातावरण पाहायला मिळाले. (Panchgani News)

सुरूर ते पोलादपूर या महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. पाचगणी ते भोसेपर्यंत काही ठिकाणी रस्ता खोदून ठेवलेला असून कामामध्ये सातत्य नसल्यामुळे नागरिक, व्यापारी तसेच पर्यटकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था अधिकच खराब होण्याची शक्यता आहे . वाहनचालकांना धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर पाचगणी क्लब येथे सर्वपक्षीय पदाधिकारी, नागरिक व व्यापारी संघटनांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत रस्त्याच्या कामातील दिरंगाईचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाचगणी बंदची हाक देण्यात आली. या निर्णयाला शहरातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, स्थानिक नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवला.

हे देखील वाचा : बारामती अपघात प्रकरणातील मृत पिंकी माळीच्या कुटुंबियांना धमकी? राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा

रविवारी सकाळपासूनच शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या.पाचगणी परिसरातील तसेच मुख्य रस्त्यावरील तायघात, भोसे येथेही व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवत आंदोलनाला समर्थन दिले. तसेच नागरिकांनीही या बंदला सकारात्मक प्रतिसाद देत रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली.

नागरिकांनी सांगितले की, सुरूर–पोलादपूर मार्ग हा पाचगणी, महाबळेश्वर तसेच कोकण भागाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ काम रखडल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही दिवस काम सुरू तर काही दिवस पूर्णपणे बंद अशी परिस्थिती असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढत आहे.

हे देखील वाचा : बारामती तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे, तर उपसभापतीपदी…

दरम्यान, या बंदच्या माध्यमातून प्रशासन आणि संबंधित विभागाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी बंद मध्ये सहभागी नागरिकांनी केली आहे. अन्यथा यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. एकूणच पाचगणी बंदला व्यापारी, नागरिक आणि विविध संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्याने प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन रखडलेले रस्त्याचे काम गतीने पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Bandh called in panchgani due to stalled development works full support from traders and people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • daily news
  • Pachgani
  • Satara News

संबंधित बातम्या

पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदासाठी इंद्रजित भिलारे यांच्या नावाची जोरदार मागणी
1

पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदासाठी इंद्रजित भिलारे यांच्या नावाची जोरदार मागणी

Satara Municipal Council:२५ कोटींच्या नुकसानभरपाईचे सात कोटींचे गणित कसे? सातारा पालिकेच्या सभेत प्रशासनाची पोलखोल
2

Satara Municipal Council:२५ कोटींच्या नुकसानभरपाईचे सात कोटींचे गणित कसे? सातारा पालिकेच्या सभेत प्रशासनाची पोलखोल

Satara News : सातारा-जावलीच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या महत्त्वपूर्ण सूचना
3

Satara News : सातारा-जावलीच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या महत्त्वपूर्ण सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.