कटरामध्ये जोरदार बर्फवृष्टी (फोटो- istockphoto)
कटरा परिसरात बर्फवृष्टीला सुरुवात
वैष्णोदेवी यात्रा थांबवली गेली
भाविकांच्या सुरक्षतेसाठी मोठा निर्णय
उत्तर भारतात काही ठिकाणी बर्फवृष्टी सुरू झाली आहे. जम्मू काश्मीरमधील कटरा आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू झाल्याचे समोर येत आहे. खराब हवामान पाहता श्री माता वैष्णो देवीची यात्रा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात्रा स्थगित करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणांमुळे भाविकांना कटरामध्ये थांबवण्यात आले आहे. सतत पडणारा पाऊस आणि बर्फवृष्टी यामुळे श्री माता वैष्णो देवी संस्थानने हा निर्णय घेतला आहे.
भाविकांची सुरक्षा महत्वाची आहे. वातावरणात बदल झाल्यावर श्री माता वैष्णो देवी यात्रा पुन्हा सुरू केली जाणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्रिकुट पर्वत आणि देवीच्या मंदिर परिसरात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे या भागाला सुंदर असे रूप प्राप्त झाले आहे. या वातावरणात त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या भाविकांना हा अनुभव एकदम खास असा म्हटलं जात आहे.
जोरदार बर्फवृष्टीमुळे वैष्णो देवी यात्रा स्थगित करण्यात आली असली तरी भाविकांचा उत्साह अजूनही कमी झालेला दिसून येत नाहीये. सुरक्षा सर्वात महत्वाची असून वैष्णो देवी संस्थांनचा निर्णयांचा आम्ही आदर करतो. हवामान स्थिर होण्याची वाट पाहू मात्र देवीचे दर्शन नक्की घेऊ असे भाविकांनी सांगितल्याचे समोर येत आहे.
Pune Weather: हा खेळ हवामानाचा ! पुण्यनगरीत पुढील दोन दिवस गारठा…; कसे असणार वातावरण?
पुण्यनगरीत पुढील दोन दिवस गारठा
गेल्या दोन दिवसांपासून शहरात किमान तापमानात लक्षणीय घट नोंदविण्यात येत असून त्यामुळे गारठा वाढला आहे. पुढील दोन दिवस किमान व कमाल तापमानात फारसा बदल होणार नसल्याने हवामान स्थिर राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. परिणामी पुणे शहर आणि परिसरात गारठा पुढील दोन दिवस कायम राहणार आहे.
शहर व परिसरात मागील काही दिवसांत कमाल तापमानात वाढ दिसून येत असली, तरी किमान तापमानात सातत्याने घट होत आहे. मंगळवारी (दि.२०) शहराचे किमान तापमान १२.५ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. पहाटे व सायंकाळी हवेतील गारवा जाणवत असून दुपारच्या वेळी मात्र वाढलेल्या कमाल तापमानामुळे कडक उन्हाचा चटका बसत आहे. त्यामुळे पुणेकरांना सध्या थंड व उष्ण अशा संमिश्र हवामानाचा अनुभव येत आहे.
राज्यात थंडीचा जोर कमी?
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बोचरी थंडी ही सामान्य बाब असली तरीही मुंबईकरांना मात्र या थंडीचा अनुभव क्वचितच येतो, परंतु, रविवारी रात्रीपासूनच मुंबईचा पारा कमालीचा घसरल्यामुळे मुंबईकरांनीही बोचरी थंडीचा अनुभव घेतला. रविवारी रात्री कुलाबा येथे किमान १९ तर सांताक्रुझ येथे १५.९ अंश तापमानाची नोंद झाली, जे की या मोसमातील निच्चांकी तापमान ठरले. कुलाबा येथे २८.० अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले, जे सरासरीपेक्षा २.१ अंश सेल्सिअसने कमी होते. तर सांताक्रूझ येथे २७.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा ३.४ अंश सेल्सिअसने कमी होते. किमान आणि कमाल तापमानाच्या एकत्रित नीचांकी नोंदीमुळे मुंबईतील थंडी बोचरी ठरली.






