Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live : डिजिटल अरेस्टप्रकरणी दिल्ली, राजस्थान, गुजरातसह 7 राज्यात सीबीआयची छापेमारी

Marathi Breaking Live Marathi : राजकारण, समाजकारण, क्रीडा क्षेत्रासह देश-विदेशातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...सर्वच स्तरावरील महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी 'नवराष्ट्र'ला सातत्याने भेट द्या...

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 09, 2025 | 02:02 PM
LIVE
आजच्या ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

आजच्या ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Follow Us
Close
Follow Us:
  • 09 Oct 2025 02:02 PM (IST)

    09 Oct 2025 02:02 PM (IST)

    फेशियलशिवाय येईल चेहऱ्यावर चमकदार ग्लो!

    दिवाळी सणाला अवघे काही तास शिल्ल्क राहिले आहेत. दिवाळीच्या आधी घरात साफसफाई करून फराळातील पदार्थ बनवले जातात. सणावाराच्या दिवसांमध्ये सगळीकडे खूप जास्त घाई असते. त्यामुळे कामाच्या धावपळीमध्ये चेहऱ्याकडे लक्ष देण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. सतत काम करत राहिल्यामुळे चेहऱ्यावर अतिरिक्त तेल जमा होऊन त्वचा अतिशय चिकट आणि काळवंडल्यासारखी वाटू लागते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे फेशिअल आणि स्किन ट्रीटमेंट करून घेतात, ज्यामुळे त्वचा काही दिवसांपुरतीच सुंदर आणि चमकदार दिसते. मात्र कालांतराने पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते.

  • 09 Oct 2025 01:54 PM (IST)

    09 Oct 2025 01:54 PM (IST)

    Myanmar Attack: रक्तरंजित होळी; म्यानमार आर्मीचा नागरिकांवर हल्ला अन्…; चिमुकल्यासह 24 ठार

    म्यानमारमध्ये लष्कराने एका गावावर हल्ला केला आहे. म्यानमार लष्कराने आपल्याच नागरिकांवर हल्ला केला आहे. यामध्ये 24 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. तसेच 50 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास मध्यवर्ती भागांमध्ये सागाईंग प्रदेशातील एका गावावर लष्कराने हल्ला केला.

  • 09 Oct 2025 01:54 PM (IST)

    09 Oct 2025 01:54 PM (IST)

    Myanmar Attack: रक्तरंजित होळी; म्यानमार आर्मीचा नागरिकांवर हल्ला अन्…; चिमुकल्यासह 24 ठार

    म्यानमारमध्ये लष्कराने एका गावावर हल्ला केला आहे. म्यानमार लष्कराने आपल्याच नागरिकांवर हल्ला केला आहे. यामध्ये 24 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. तसेच 50 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास मध्यवर्ती भागांमध्ये सागाईंग प्रदेशातील एका गावावर लष्कराने हल्ला केला.

  • 09 Oct 2025 01:50 PM (IST)

    09 Oct 2025 01:50 PM (IST)

    ‘अशोक मा.मा.’ मालिकेत नवे वळण, भैरवीच्या स्वप्नांना मिळणार का अशोक मामांची साथ?

    कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘अशोक मा.मा.’ सध्या प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर करून बसली आहे. मालिकेने नुकताच ३०० भागांचा पल्ला गाठला आहे. आणि आता मालिका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. स्पर्धेत दहा लाखाचं बक्षीस मिळवल्यानंतर भैरवीच्या घरी आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. अशोक, नीलिमा आणि मुलांनी तिच्यासाठी खास सरप्राईज पार्टी आयोजित केल्याचे नव्या भागात दिसत आहे. मालिका आता नव्या वळणार जाताना दिसणार आहे.

  • 09 Oct 2025 01:40 PM (IST)

    09 Oct 2025 01:40 PM (IST)

    पुण्यात लपले दहशतवादी? कोंढवा भागामध्ये पोलिसांच्या तगडा बंदोबस्तात ATS ची मोठी कारवाई

    विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये (Pune news) दहशतवादपुरक हालचाली होत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. शहरात काल रात्री पासून मोठ्या घडामोडी घडत आहे. शहरामधील कोंढव्यासह अनेक भागांमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याचे दिसून आले आहे. कोंढवा भागामध्ये ATS चे सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे दिसून आले आहे. पुणे पोलीस (Pune Police) आणि एटीएसचे हे संयुक्त ऑपरेशन सुरु असून यामुळे पुणे शहारामध्ये नेमकं काय सुरु आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  • 09 Oct 2025 01:35 PM (IST)

    09 Oct 2025 01:35 PM (IST)

    अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; दोन्ही देशांचे संबंध मजबूत करण्याचा उद्देश

    अफगाणिस्तानचे (Afghanistan) परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत पोहोचले आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा हेतू भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध मजबूत करणे आहे. चार वर्षापूर्वी अशरफ घनी यांचे सरकार पडल्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानच्या संबंधासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी मुत्ताकी दारुल अलूम देवबंद मदरसा आणि ताजमहालला भेट देणार आहेत.

  • 09 Oct 2025 01:25 PM (IST)

    09 Oct 2025 01:25 PM (IST)

    इंग्लडचा कर्णधार Harry Brook चं पण ठरलं! चार वर्षापासून डेट करत असलेल्या गर्लफ्रेंडसोबत उरकला साखरपुडा

    इंग्लंड संघाचा कर्णधार हॅरी ब्रुक यांनी त्याच्या लहानशा आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये धुमाकूळ घातला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये त्याने टीम इंडियाच्या गोलंदाजांना हैराण करून ठेवले होते. आता त्याच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. हॅरी ब्रुक याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेआधी साखरपुडा उरकला आहे. ही माहिती त्यांनी त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याच्या दीर्घकालीन गर्लफ्रेंड सोबत त्याने लग्न केले आहे.

  • 09 Oct 2025 01:15 PM (IST)

    09 Oct 2025 01:15 PM (IST)

    बिहारच्या राजकारणात बदल होणार? ‘या’ 15% मतदारांमुळे BJP, RJD, JDU, काँग्रेस आणि जनसुराज पक्षाच्या अडचणी वाढणार?

    बिहार विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पहिला टप्पा ६ नोव्हेंबर रोजी आणि दुसरा टप्पा ११ नोव्हेंबर रोजी आहे. त्यापूर्वी, छठ सणाचा दुसरा टप्पा २८ ऑक्टोबर रोजी संपतो. दुसऱ्या शब्दांत, पहिला टप्पा छठ संपल्यानंतर नवव्या दिवशी आणि दुसरा टप्पा १४ तारखेला आहे. सर्व पक्षाचे नेते दिवाळी आणि छठसाठी येणाऱ्या स्थलांतरितांना निवडणुकीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण छठ सण आणि निवडणुकांमध्ये लक्षणीय अंतर आहे. परिणामी, सर्व पक्ष स्थलांतरितांना रोखण्यासाठी काम करत आहेत.

  • 09 Oct 2025 01:07 PM (IST)

    09 Oct 2025 01:07 PM (IST)

    छगन भुजबळ यांना मोठा धक्का; कट्टर समर्थकाने ओबीसी आरक्षणासाठी केली आत्महत्या

    राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. कुणबी प्रमाणपत्र देत सर्वच मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यात यावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. याला ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध केला जात आहे. ओबीसी नेते असलेले आणि मंत्रिमंडळामध्ये असलेल्या छगन भुजबळ यांनी देखील या मागणीला विरोध केला आहे. यावरुन मत-मतांतरे सुरु असताना भुजबळ यांना मोठा धक्का बसला आहे. छगन भुजबळ यांचा समर्थक असलेल्या व्यक्तीने आत्महत्या केली.

  • 09 Oct 2025 01:00 PM (IST)

    09 Oct 2025 01:00 PM (IST)

    कोंढवा भागामध्ये पोलिसांच्या तगडा बंदोबस्तात ATS ची मोठी कारवाई

    विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये दहशतवादपुरक हालचाली होत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. शहरात काल रात्री पासून मोठ्या घडामोडी घडत आहे. शहरामधील कोंढव्यासह अनेक भागांमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याचे दिसून आले आहे. कोंढवा भागामध्ये ATS चे सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे दिसून आले आहे. पुणे पोलीस आणि एटीएसचे हे संयुक्त ऑपरेशन सुरु असून यामुळे पुणे शहारामध्ये नेमकं काय सुरु आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  • 09 Oct 2025 12:45 PM (IST)

    09 Oct 2025 12:45 PM (IST)

    पत्नीने चेहऱ्यावर टाकले उकळते तेल, नंतर जखमांवर टाकली मिरची पूड

    राजधानी दिल्ली येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पती झोपेत असतांना त्याच्यावर उकळते तेल टाकल्याच्या समोर आले आहे. एवढेच नाही तर जखमांवर मिरची पूड टाकल्याचे देखील समोर आले आहे. या हल्ल्यात 28 वर्षीय दिनेश गंभीरीत्या जखमी झाला आहे. शेजारच्यांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सफदरजंग रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरु आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपी पत्नीला अटक झालेली नाही आहे.

  • 09 Oct 2025 12:30 PM (IST)

    09 Oct 2025 12:30 PM (IST)

    फी न भरल्याने विद्यार्थ्याला जमिनीवर बसवले

    मुंबईच्या भिवंडी येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. भिवंडी शहरातील प्रसिद्ध शाळेत फी नाही भरली म्हणून एका विद्यार्थ्याला जमिनीवर बसवण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहे. ही घटना सलाहुद्दीन आयुबी मेमोरियल इंग्लिश अँड उर्दू स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे घडली आहे. या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • 09 Oct 2025 12:20 PM (IST)

    09 Oct 2025 12:20 PM (IST)

    बॉलसाठी गेलेल्या दोन मुलांना सुरक्षारक्षकाने दोन मुलांचे हात बांधून केले मारहाण

    डोंबिवली येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. हाय प्रोफाईल सोसायटीत दोन मुलांना अमानुषपणे मारहाण केल्याचे समोर आले. केवळ बॉल अंदर आला म्हणून त्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने दोन लहान मुलांचे हात बांधून त्यांना मारहाण केल्याचे समोर आला आहे. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

  • 09 Oct 2025 12:10 PM (IST)

    09 Oct 2025 12:10 PM (IST)

    व्हॉट्सअ‍ॅपवरून देहविक्रीचा रॅकेट,पोलिसांनी सापळा रचून दलाल महिलेला केली अटक

    ठाणे शहरातील ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठं देहविक्रीचं रॅकेट उघडकीस आले आहे. एक महिला सोशल मीडियाचा वापर करून देहविक्रीचे रॅकेट चालवत होती. तिला अटक केली असून तिच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे अन्वेषण विभागाने केल्याचे समोर आले आहे.

  • 09 Oct 2025 12:01 PM (IST)

    09 Oct 2025 12:01 PM (IST)

    मुंबईतील आझाद मैदानावर कुणबी समाजाचा महाप्रचंड मोर्चा

    मुंबईच्या आझाद मैदानावर आज कुणबी समाजाने ओबीसी एल्गार मोर्चाचे नियोजन केले आहे. यावेळी अनेक ओबीसी बांधव एकत्र येऊन ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठे शक्तीप्रदर्शन करणार आहेत. मराठा समाजाला कुणबी नोंदीद्वारे ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या सरकारी धोरणाला या मोर्चातून तीव्र विरोध दर्शवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच शेकडो कुणबी कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. त्यांच्या डोक्यावर जय कुणबी लिहिलेल्या गांधी टोप्या आणि हातात निषेधाचे फलक पाहायला मिळत आहेत.

  • 09 Oct 2025 11:50 AM (IST)

    09 Oct 2025 11:50 AM (IST)

    मुंबईमध्ये PM मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांची भेट

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुंबईतील राजभवनात ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांचे स्वागत केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी हस्तोलांदोन करत भेट घेतली.

  • 09 Oct 2025 11:40 AM (IST)

    09 Oct 2025 11:40 AM (IST)

    जीवघेण्या कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक

    श्रीसन फार्मास्युटिकल्स कंपनीने तयार केलल्या कफ सिरपच्या सेवनामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये अनेक मुलांचा मृत्यू झाला आहे. यानंतर कंपनीचे मालक जी. रंगनाथन (७५) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना गुरुवारी पहाटे चेन्नईतील कोडंबक्कम येथील त्यांच्या अपार्टमेंटमधून अटक करण्यात आली.

  • 09 Oct 2025 11:30 AM (IST)

    09 Oct 2025 11:30 AM (IST)

    केदारनाथ धाममध्ये नवीन बर्फवृष्टी होण्यास सुरुवात

    उत्तराखंडमधील केदारनाथ धाम हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. केदारनाथमध्ये नवीन बर्फवृष्टी होण्यास सुरुवात झाली आहे. तापमानात घट झाली असली तरी भाविक केदारनाथ धाममध्ये दर्शनासाठी मोठ्या भक्तीभावाने येत आहेत.

  • 09 Oct 2025 11:20 AM (IST)

    09 Oct 2025 11:20 AM (IST)

    सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरोधात गुन्हा दाखल

    सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात एका ७१ वर्षीय वकिल राकेश किशोर यांनीसर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारनी कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिल्यानंतर राकेश किशोर यांची सुटका करण्यात आली. आता वकील राकेश किशोर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण राकेश किशोर यांच्याविरुद्ध बंगळुरूमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑल इंडिया अॅडव्होकेट्स असोसिएशनचे अध्यक्ष भक्तवचल यांच्या लेखी तक्रारीवरून मंगळवारी संध्याकाळी बंगळुरूमधील विधान सोधा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 09 Oct 2025 11:05 AM (IST)

    09 Oct 2025 11:05 AM (IST)

    Ratan Tata death anniversary :उद्योगविश्वातील शुक्रतारा रतन टाटा यांची पुण्यतिथी

    असे एक उद्योगपती ज्यांची जागा भारतीयांच्या मनामध्ये कायमची कोरली गेली आहे ते म्हणजे रतन टाटा. रतन टाटा यांचा जन्म मुंबई येथे एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण मुंबई आणि अमेरिकेत झाले. पदवी प्राप्त करून ते १९६१ मध्ये टाटा समूहात सामील झाले. सुरुवातीच्या काळात ते टाटा एअरलाइन्स आणि टाटा इंडस्ट्रीजमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडत गेले. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा एअर इंडिया ही भारताची आघाडीची विमान कंपनी बनली. रतन टाटा यांनी भारतीय उद्योगाला दिशा दिली आणि त्यांच्या दूरदृष्टीने टाटा समूहाला जागतिक स्तरावर नेले. मागील वर्षी आजच्या दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला. रतन टाटा हे त्यांच्या समाजसेवा आणि उद्योगनाविन्यासाठी नेहमीच स्मरणात राहतील. 

  • 09 Oct 2025 10:53 AM (IST)

    09 Oct 2025 10:53 AM (IST)

    पुतण्या अमालच्या आरोपांवर अनु मलिकने सोडले मौन

    संगीत क्षेत्रातील मलिक कुटुंबातील तणाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. प्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांनी अलीकडेच त्यांचा पुतण्या अमाल मलिकने केलेल्या गंभीर आरोपांवर पहिल्यांदाच उघडपणे प्रतिक्रिया दिली. “बिग बॉस १९” च्या घरात दिसलेल्या अमालने २००५ च्या मुंबईतील पुरात त्यांच्या काकांनी त्यांचे वडील डब्बू मलिक यांना तोडफोड केल्याचा आणि त्यांना सोडून दिल्याचा आरोप केला. आता, अनु मलिक यांनी त्यांचे मौन सोडले आहे आणि त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

  • 09 Oct 2025 10:44 AM (IST)

    09 Oct 2025 10:44 AM (IST)

    आई-बाबा रिटायर होत आहेत’ फेम अभिनेत्याने अर्ध्यातूनच सोडली मालिका

    मराठी मालिका इंडस्ट्रीमध्ये नेहमीच काम करणाऱ्या कलाकारांना वेळेवर मानधन न मिळणं, मानधन थकवने, सेटवर काळजी न घेणे, फसवणूक अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आणि यामुळे अनेक कलाकार अचानक मालिकाच निरोप घेतात आणि बाहेर पडतात. ‘पारू’ या मालिकेतील अभिनेता शंतनू गंगणेनं नुकताच याप्रकरणी आवाज उठवला होता. अशातच आता स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिनीवरील ‘आई बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेतील अभिनेता आदिश वैद्यने मालिका सोडल्याचे समजले आहे.

  • 09 Oct 2025 10:35 AM (IST)

    09 Oct 2025 10:35 AM (IST)

    Sangram Singh ने रचला इतिहास

    कॉमनवेल्थ हेवी वेट चॅम्पियन संग्राम सिंग हा युरोपमध्ये या पातळीवर स्पर्धा करणारा पहिला भारतीय कुस्तीगीर असणार आहे. त्याआधी त्याच्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. संग्राम सिंह याने आता इतिहास रचला आहे, फक्त 90 सेकंदामध्ये भारतीय कुस्तीगीर संग्राम सिंह यांने गामा आंतरराष्ट्रीय लढाई स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या अली रझा नासिरचा पराभव करून इतिहास घडवला आहे.

  • 09 Oct 2025 10:27 AM (IST)

    09 Oct 2025 10:27 AM (IST)

    प्रेमानंद महाराजांच्या आशीर्वादासाठी पोहचला एल्विश यादव

    प्रसिद्ध YouTuber आणि ‘बिग बॉस OTT 2’ विजेता एल्विश यादवने अलीकडेच वृंदावनमध्ये संत प्रेमानंद जी महाराजांची भेट घेतली. अलीकडेच, प्रेमानंद जी यांच्या प्रकृतीबद्दलचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते, ज्यामुळे त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. विविध व्हायरल व्हिडिओंपैकी, सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये बिग बॉस OTT विजेता एल्विश यादव संत प्रेमानंद जी महाराजांशी बोलताना दिसत आहेत. त्यांनी प्रेमानंद जी महाराजांची भेट घेऊन एक वचन देखील दिले.

  • 09 Oct 2025 10:23 AM (IST)

    09 Oct 2025 10:23 AM (IST)

    आता ‘हा’ स्पर्धक चालवणार Bigg Boss 19 घराची सत्ता

    निर्मात्यांनी जारी केलेल्या नवीन प्रोमोमध्ये, स्पर्धक कॅप्टनसी टास्कसाठी लढताना दिसत आहेत. दरम्यान, फरहाना आणि मालतीची लढाई देखील पाहायला मिळाली. पण आता घरातून येणारी मोठी बातमी अशी आहे की कॅप्टन म्हणून दोनदा घराची सूत्रे सांभाळणारी फरहाना पडली आहे. चला जाणून घेऊया घराची नवीन कॅप्टन कोण आहे.

    बातमी सविस्तर वाचा...

  • 09 Oct 2025 10:15 AM (IST)

    09 Oct 2025 10:15 AM (IST)

    खासगीकरणाच्या विरोधात महावितरण कर्मचारी संपावर!

    मागील काही महिन्यांपासून विद्युत क्षेत्रामधील खाजगीकरण विरोधात महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तीनही शासकीय विज कंपन्यांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी संतापलेले पाहायला मिळाले आहेत. खाजगीकरणाच्या विरोधात अभियंता अधिकारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली ८ ऑक्टोबर रोजी बुधवारी मध्यरात्रीपासून सर्व कर्मचारी हे संपावर गेले आहेत. त्यामुळे आत्ता जे त्या तीन दिवस तिन्ही कंपन्यांमधील वीज यंत्रनेचा संपूर्ण डोलारा हा कंत्राटी कर्मचाऱ्यांवर येणार आहे.

  • 09 Oct 2025 10:07 AM (IST)

    09 Oct 2025 10:07 AM (IST)

    बेथ मुनीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या हाती लागला तिसरा विजय

    १५० धावांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा पराभव होईल असे वाटत होते, पण मुनीने (११४ चेंडूत १०९ धावा) तिचे पाचवे एकदिवसीय शतक आणि तिचे पहिले विश्वचषक शतक झळकावून संघाला सावरले. तिने किंग (नाबाद ५१) सोबत नवव्या विकेटसाठी १०६ धावांची विक्रमी भागीदारी करून संघाला ९/२२१ पर्यंत पोहोचवले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. किम गार्थ (३/१४), अ‍ॅनेबल सदरलँड (२/१५) आणि मेगन शट (२/२५) यांच्या घातक गोलंदाजीमुळे पाकिस्तानला ३६.३ षटकांत फक्त ११४ धावांत गुंडाळण्यात आले. ऑस्ट्रेलियाचा हा स्पर्धेतील दुसरा विजय होता.

  • 09 Oct 2025 09:34 AM (IST)

    09 Oct 2025 09:34 AM (IST)

    बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर

    बारामती नगरपरिषदेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीतील नगरसेवक पदांसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत बुधवारी (दि.8) जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेक महत्त्वाच्या ठिकाणी महिलांचे आरक्षण पडल्याने नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला. 41 जागांपैकी 21 जागांवर महिलांसाठी आरक्षण पडले.

  • 09 Oct 2025 09:25 AM (IST)

    09 Oct 2025 09:25 AM (IST)

    ‘क्रांती’चे अध्यक्ष शरद लाड यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश

    अनेक दिवसांपासून रेंगाळलेला क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये अखेर प्रवेश झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईतील मुख्यालयात शेकडो समर्थकांसह प्रवेश केला. यावेळी समर्थकांनी ‘शरद भाऊ आगे तुम बढो, हम तुम्हारे साथ है, पलूस कडेगावमध्ये एकच भाऊ शरद भाऊ शरद भाऊ’ या घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले.

  • 09 Oct 2025 09:20 AM (IST)

    09 Oct 2025 09:20 AM (IST)

    राज्यात नवीन GR नुसार प्राध्यापक भरती; पारदर्शकतेसह गुणवत्तेला प्राधान्य

    महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाने राज्यातील सार्वजनिक (अकृषी) विद्यापीठांमधील प्राध्यापक भरतीसाठी नवीन शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे. या निर्णयामुळे भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, गुणवत्तापूर्ण आणि एकसमान निकषांवर आधारित होणार असल्याचे उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

  • 09 Oct 2025 09:12 AM (IST)

    09 Oct 2025 09:12 AM (IST)

    दक्षिण आफ्रिकेने स्मृती मानधनासाठी तयार केला खास प्लान

    भारताचा संघ आज महिला एकदिवसीय विश्वचषकाचा तीसरा सामना खेळणार आहे. हा सामना भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवला जाणार आहे. भारताच्या संघाने पहिल्या दोन सामन्यामध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये झाला या दोन्ही सामन्यामध्ये भारताच्या संघाने दोन्ही संघाना पराभूत करुन पहिले दोन विजय मिळवले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या सामन्यात इंग्लडविरुद्ध फारच निराशाजनक कामगिरी केली होती. तर दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी न्यूझीलंडच्या संघाचा पराभव करुन पहिला विजय नावावर केला आहे.

Marathi Breaking News Live Updates : सध्या सायबर फसवणुकीच्या घटना वाढताना दिसत आहे. या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी, CBI ने बुधवारी (दि.8) देशभरात मोठे छापे टाकले. दिल्ली, राजस्थान, गुजरातसह 7 राज्यात छापेमारीची कारवाई करण्यात आली.

डिजिटल अरेस्ट फसवणुकीशी संबंधित प्रकरणांमध्ये एजन्सीने एकाच वेळी दिल्ली-NCR, हरियाणा, राजस्थान, गुजरात, केरळ आणि पश्चिम बंगालमधील सुमारे 40 ठिकाणी छापे टाकले. ही कारवाई ऑपरेशन चक्र-5 अंतर्गत करण्यात आली. I4C (इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर) च्या NCRP पोर्टलवर नऊ जणांच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींद्वारे CBI ला हे प्रकरण प्राप्त झाले. तक्रारींच्या आधारे, CBI ने FIR नोंदवून तपास सुरू केला. या फसवणुकीत अनेक बनावट बँक खाती आणि टेलिकॉम नेटवर्क वापरण्यात आल्याचे तपासात उघड झाले, ज्याद्वारे आरोपी संबंधितांपर्यंत पोहोचले होते.

Web Title: Top marathi news political update sports update breaking news top marathi news live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 09:05 AM

Topics:  

  • Breaking News
  • Top Marathi News Today Live

संबंधित बातम्या

Today Marathi Breaking Updates Live : विजयादशमीचे हे पर्व जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी घेऊन येवो; मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
1

Today Marathi Breaking Updates Live : विजयादशमीचे हे पर्व जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी घेऊन येवो; मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

Marathi Breaking Updates : भारत-कॅनडा संबंध पुन्हा पूर्ववत होणार; आंतरराष्ट्रीय घडामोडींना वेग
2

Marathi Breaking Updates : भारत-कॅनडा संबंध पुन्हा पूर्ववत होणार; आंतरराष्ट्रीय घडामोडींना वेग

Top Marathi News Today: देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान विभागाने जारी केला अलर्ट
3

Top Marathi News Today: देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान विभागाने जारी केला अलर्ट

Top Marathi News Today: बंगालमध्ये पावसाचा धुमाकूळ, शाळा-कॉलेज बंद
4

Top Marathi News Today: बंगालमध्ये पावसाचा धुमाकूळ, शाळा-कॉलेज बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.